नवीन लेखन...

रहस्यकथा लेखक बाबूराव अर्नाळकर

रहस्यकथा लेखक बाबूराव अर्नाळकर यांचा जन्म. ९ जून १९०६ रोजी झाला. मा. बाबूराव अर्नाळकर हे मूळचे वसई तालुक्यातील अर्नाळा गावचे. पुढे रहस्यकथा लिहिताना हेच गाव त्यांच्या टोपणनावात अगदी फिट्ट बसले. चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ मा.बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे १४८० रहस्यकथा लिहिल्याने गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्सचमध्ये नोंद झालेले पहिले मराठी साहित्यिक.

बाबूरावांचे मुंबईतील गिरगावात चष्म्याचे दुकान होते. सुरुवातीला तेथे बसून बाबूराव रहस्यकथा लिहीत. दुकानात चष्मा खरेदी करण्याऐवजी लोक रहस्यकथा लेखक बाबूरावांना पहायला येत. बाबूराव जेपी (जस्टिस ऑफ पीस) होते; ते स्वातंत्र्य सैनिकांच्या संघटनेचेही काम करीत. त्यामुळे त्यांना खूप फोन येत, याचा आणि बाहेरील वर्दळीचा त्रास होऊ लागल्याने ते अनेकदा एखाद्या गुप्त ठिकाणी जाऊन लेखन करीत.

“मनोरंजन’ मासिकात “सतीची समाधी’ नावाची बाबूरावांनी आयुष्यात पहिल्यांदा लिहिलेली कथा प्रसिद्ध झाली. ‘डिटेक्टिव्ह रामराव, धनंजय, सुदर्शन, फु मांचू यांसारखे सुमारे १०० मानसपुत्र बाबूराव अर्नाळकरांनी आपल्या रहस्यकथांमधून जन्माला घातले होये. त्यातील जास्त नावाजले गेलेले म्हणजे झुंजार, काळा पहाड.

मा.बाबूराव अर्नाळकर यांनी खर्‍या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली. चार आणे मालांपासून त्यांनी सुरुवात केली. त्यांचे नायक झुंजार, धनंजय-छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग हे मराठी घरांघरांतून फिरले. बाबूरावांनी नाटके लिहिली आहेत, ललित साहित्यही लिहिले आहे.

बाबूराव अर्नाळकर आणि मंगेशकर कुटुंबीयांमध्ये स्नेहबंध होते. मुंबईत ग्रँटरोड पश्चिमेला १९व्या शतकामध्ये नाना शंकरशेठ यांनी स्थापन केलेले शंकराचे देऊळ आहे. या देवळाच्या परिसरात पूर्वी धर्मशाळा होती. गंधर्व नाटक मंडळीचा मुंबई दौरा असेल तेव्हा त्या नाटक कंपनीचा मुक्काम याच देवळाच्या शेजारी असलेल्या धर्मशाळेत असे. या देवळाशेजारीच जी एक चाळ होती त्यामध्ये मंगेशकर कुटुंब त्यांच्या संघर्षकाळात वास्तव्य करून होते. मंगेशकर कुटुंबीय राहात होते त्या खोलीच्या शेजारीच बाबूराव अर्नाळकर राहात होते. बाबूरावांची मुलगी व उषा व लता मंगेशकर त्या वेळी लहानग्या होत्या. त्या दोघी एकत्रित गाणे शिकायला जायच्या.

मा.बाबूराव अर्नाळकर यांचे ५ जुलै १९९६ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.बाबूराव अर्नाळकर यांना आदरांजली.

संजीव वेलणकर 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..