नवीन लेखन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातच्या उत्तर भागातील मेहसाणा जिल्ह्यातल्या वाडनगर या गावी झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजूनही भारतातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.

नरेंद्र मोदी हे २६ मे २०१४ पासून भारताचे पंतप्रधान आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. त्या आधी ते ७ ऑक्टोबर २००१ ते २२ मे २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. भाजपच्या गुजरात विधानसभा २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे स्ट्रॅटेजिस्ट होते. मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. गुजरात च्या विकासासाठी मोदी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. नरेंद्र मोदी यांना सहा भावंडं आहेत. मोदींना एक मोठी बहिण आणि दोन मोठे भाऊ आहेत. तर दोन धाकटे भाऊ आणि एक लहान बहिण आहे. सर्वात मोठ्या बहिणीचं नाव शारदाबेन, त्यानंतर भाऊ सोमभाई, अमृतभाई. नरेंद्र मोदींपेक्षा लहान असलेल्या भावाचं नाव प्रल्हाद मोदी, त्यानंतर बसंतीबेन आणि मग पंकज मोदी आहे.

लहानपणापासूनच त्यांच्यावर औदार्य, शौर्य आणि समाजसेवेचे संस्कार झाले. भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात, अगदी तरुण वयाचे असताना त्यांनी रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या -येणाऱ्या जखमी जवानांची शुश्रुषा केली होती. १९६७ साली गुजरातमध्ये पुराने थैमान घातले होते. त्यावेळीही पूरग्रस्तांच्या सेवेत ते अग्रभागी होते. अप्रतिम संघटनकौशल्य आणि मानवी मानसशास्त्राची उत्तम समज असणाऱ्या श्री. मोदी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य केले आणि गुजरातमधील अनेक सामाजिक-राजकीय चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले.१९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला.१९९५ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली. भारतीय जनता पक्षाचे जहाल नेता यांच्यासारखा साधी चहाची टपरी चालवणारा कुशाग्र बुद्धीचा व महत्त्वाकांक्षी तरुण पंतप्रधानपदाचा प्रमुख उमेदवार बनेपर्यंत मजल गाठू शकतो, हे मोदींनीच दाखवून दिले.

नरेंन्द मोदींनी २६ में २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या पदावर पोहोचणारे रा.स्व.संघाचे ते पहिले प्रचारक तर दुसरे स्वयंसेवक ठरले. २०१४ मध्ये ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. एकट्या भाजपने २८२ जागांवर विजय मिळवला होता. एवढंच नाही तर उमेदवार म्हणून मोदींनी वाराणसी आणि वडोदरा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दोन्ही मतदारसंघात त्यांचा विजय झाला. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील विजय २०१४ पेक्षा फारच मोठा होता. या निवडणुकीत भाजपने तब्बल ३०३ जागांवर विजय मिळवला. ३० मे २०१९ रोजी त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
नरेंन्द मोदींचा राष्ट्रीय राजकारणाच्या पटावरील झपाट्याने झालेला उत्कर्ष अवाक करणारा आहे. फक्त २००२ मधील गुजराथ मधल्या दंगलीने त्यांच्या सर्वपक्षीय स्वीकार्यतेस ‘खो’ घातल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यांच्या चेहर्यासवरील हा काळा डाग त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकत होता. दुसऱ्या एखाद्या नेत्यास असला आरोप खचितच अतिशय महागात पडला असता, पण नरेंद्र मोदींच्या बाबतीत तसे झाले नाही. २०१४ मध्ये ते प्रचंड बहुमताने निवडून आले आणि भारताचे पंतप्रधान बनले. याच काळात त्यांनी जगभर प्रवास केला, अनेक देशांतील महत्त्वाच्या नेत्यांबरोबर पंतप्रधान म्हणून संवाद साधला. अनेक नवीन देशांशी मैत्री जमवली. याचे उदाहरण म्हणजे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन.

या अनुभवांमुळे एक वैश्विक दृष्टिकोन विकसित व्हायला तर मदत झालीच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भारतभूमीची सेवा करून सर्व राष्ट्रांमध्ये भारताला सामाजिक-आर्थिक दृष्ट्या सर्वोत्तम बनवण्याची त्यांच्या मनातली तळमळ अधिकच प्रखर झाली.

मागच्या वाढदिवसाला पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये गेले होते. सरदार सरोवर धरणावरील नर्मदा देवीच्या महाआरतीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तर ६८ वा वाढदिवस त्यांनी आपला मतदारसंघ वाराणसी मध्ये साजरा केला होता.

मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांच्या कार्यशैलीची भुरळ पडल्यामुळे भारतीय तसेच परदेशी लेखकांनीही मोदी यांच्याविषयीचे विपुल लेखन केले आहे. मुख्य म्हणजे ही सर्व पुस्तके २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वीची आहेत. काही पुस्तकांचे स्वतंत्र लेखन झाले असून काही पुस्तकांचे अनुवादन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पक्षाकडून १७ सप्टेंबर २०२१ पासून पुढचे तीन आठवडे म्हणजेच ७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यासोबतच भाजपकडून ‘सेवा आणि समर्पण’ मोहीम राबवण्यात येणार आहे. ७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून संवैधानिक जबाबदारी निभावताना यंदा मोदी २० वर्षांची कारकीर्द पूर्ण करत आहेत. त्यामुळे ‘सेवा आणि समर्पण’ मोहिमेची सांगता ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.आपल्या समूहातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..