नवीन लेखन...

“आधार” ची पोस्टमार्टेम !

Postmortem of AAdhar - Unique Identification Number

‘आधार’ ची सदोषनोंदणी प्रक्रिया सामान्यांना फारच त्रासाची झालेली आहे. आधार कार्डाचा उपयोग काय आणि कुणाला? त्याची सक्ती कशाला? याबाबतची पोस्टमार्टेम करावीशी वाटते ती अशी

(१) ज्यांच्याकडे स्वपरिचयाचा आधार नसेल अशा सामान्यांचा आधार क्रमांक ही सर्वमान्य ओळख असल्याने “आधार नोंदणी ही मोफत आणि स्वैच्छिक आहे/aadhar enrollment is a free and voluntary” अशी ठळक सूचना आधार नोंदणी फोर्मवर नमूद आहे तर मग “महाराष्ट्र शासन पत्र क्र.बैठक २०१२/प्रक्र३५१/झोपुसू-१ दि.०९/०८/२०१२ नुसार सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी अर्जदारास “आधार कार्ड” सादर करणे आवश्यक राहील. आधार कार्ड सादर केल्याशिवाय सदनिकेचा ताबा देण्यात येणार नाही” अशी सक्तीची अट म्हाडाने गिरणी कामगारांना घालणे कितपत योग्य आहे? आणि अनेक शासकीय/निमशासकीय कामांसाठी, निव्वळ ओळख सांगणार्‍या आधार कार्डाची सक्ती नागरिकांवर शासनाकडून का लादली जात आहे?;

(२) आधार नोदणीकर्त्या संस्थेने नागरिकांना नोदणीपासून ६० ते ९० दिवसांत ‘आधार’ क्रमांक जारी करण्याचे बंधन असतांना एक वर्ष उलटून गेले तरीही कित्येकांना आधार क्रमांक आजतागायत का मिळालेला नाही?;

(३) आधार क्रमांक हा विशिष्ट १२ अंकीचा असेल आणि त्यात प्रत्येक व्यक्तीचे छायाचित्र, हाताच्या बोटांचे ठसे व बुब्बूळाचे छायाचित्राची नोंद असेल तेव्हा स्वत:चा १० अंकी भ्रमणध्वनी क्रमांक कित्येकांच्या आठवणीत राहत नाही त्याठिकाणी आधारकार्ड हरवल्यास १२ अंकी क्रमांक नागरिकांच्या कितपत आठवणीत राहील? आणि केवळ व्यक्तीचे छायाचित्र, हाताचे ठसे आणि बुब्बूळाच्या छायाचित्राचा वापर करून दुय्यम आधार कार्ड मिळवता येईल का?;

(४) राजकीय सत्तांतरानंतर आणखी कुठच्या तरी सर्वमान्य ओळखकार्डचा जावई शोध लावून ते कार्ड अंमलात आणले तर त्यावेळेस या आधारकार्डचा कितपत उपयोग होईल? कारण सत्तांतरानंतरही आधार कार्डाची मान्यता कायम राहील आणि केवळ ओळख सांगणार्‍या आधार कार्डासारखा दुसरा पर्याय अंमलात आणता येणार नाही अशी तरतूद केलेली आहे का? नसेल तर मग इतर पर्याय असतांना कशाला हवी ही खटाटोप आणि सक्ती?.

सुभाष रा. आचरेकर, वांद्रे (पूर्व).

 

Avatar
About सुभाष रा. आचरेकर 1 Article
वृत्तपत्रलेखक म्हणून गेली कित्येक वर्षे विभागातील समस्यांना विविध वृत्तपत्रातून मांडून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम केले. मोफत आरोग्य, नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन. ८५० गरजूंना मोफत चष्मा वाटप. जवळपास ४५० जेष्ठांचा शाल देवून सत्कार केला. व्ही.एन.देसाई महापालिका रुग्णालयाला ९ इमर्जन्सी विद्युत संचांची देणगी. महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून २० दिवस मोफत जातीचे, उत्पन्नाचे, नोन-क्रीमिलेअर, डोमिसाईल, जेष्ठ नागरिक कार्ड, स्थानिक वास्तव्याचे दाखले मिळवून देण्याचे काम सुद्धा केलेले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..