नवीन लेखन...

पेट्रोलियम द्रावणे

पेट्रोलियम खनिज तेलापासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये हायड्रोकार्बन द्रावणांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. कमी तापमानाला ऊर्ध्वपातित होणारी ही द्रावणे इतर पेट्रोलियम पदार्थांप्रमाणे एरॉमेटिक, पॅराफिनिक व नॅफ्थोनिक हायड्रोकार्बन रसायनांची मिश्रणे असतात, तर काही द्रावणे एकाच विशिष्ट प्रकारच्या हायड्रोकार्बन्सने युक्त असतात. साधारणतः पाण्यासारखी रंगहीन दिसणारी ही द्रावणे पाण्यात अविद्राव्य असतात. परंतु ती अन्य औद्योगिक रसायनांना विरघळवितात. ज्या तापमानाच्या दरम्यान ही द्रावणे उकळतात, त्यानुसार त्यांचे चार मुख्य भागात वर्गीकरण केलेले असते.

विशेष उत्कलन बिंदूच्या दरम्यान उकळणाऱ्या द्रावणांना ‘स्पेशल बॉईलिंग पॉइंट स्पिरिट्स’ (एस.पी.एस) म्हणतात व ते ३५ अंश सेल्सिअस ते १६० अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उकळतात. औद्योगिक क्षेत्रातील विशिष्ट वापरानुसार त्यांचे उत्कलनबिंद मर्यादित केले जातात. ६४ ते ६९ अंश सेल्सिअस तापमानाला उकळणारे हेक्झेन हे द्रावण वनस्पती बियांपासून तेल मिळविण्यासाठी वापरतात. बियांचे तुकडे करून या द्रावणात मिसळतात, तेव्हा त्यात तेलाचा अंश विरघळतो. नंतर, हे द्रावण ऊर्ध्वपतनाने वेगळे करतात व तेल मिळवतात. ही तेले खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी तसेच साबण व रंग तयार करण्यासाठी वापरतात.. हेक्झेनमध्ये एरोमेटिक्स हायड्रोकार्बन्सचा अंश अजिबात नसतो व त्यामुळे खाद्यतेलापासून शरीराला अपाय होण्याची शक्यता नसते. त्याच्या उत्कलनबिंदूची मर्यादा कमी असल्यामुळे, ते सहज उडून जाते व तेल प्राप्तीसुलभ होते. याशिवाय रबरापासून चिकटपट्ट्या तयार करणे, जलरोधक तंतू करणे, निर्माण गॅसभट्टीत एल.पी.जी.ऐवजी इंधन म्हणूनदेखील हेक्झेनचा वापर होतो.

६० ते १२० अंश सेल्सिअसच्या दरम्यान ऊर्ध्वपतित होणारी स्पिरिट्स द्रावणे मुख्यतः रबर मोठ्या उद्योगातप्रमाणात वापरतात. विशेषतः गाडीचे टायर्स तयार करताना या द्रावणाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच रंग किंवा वॉर्निश तयार करताना, त्यांचा पातळपणा वाढविण्यासाठी हे द्रावण सर्रासपणे वापरले जाते. याशिवाय, कपडे ड्रायक्लीनिंग करताना वापारलेले हे द्रावण सहज उडून जाऊ शकते व कपडा त्वरित सुकण्यास मदत होते.

जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..