नवीन लेखन...

पवित्र ते कुळ पावन तो देश

गिता सांगते त्याग करा,कुरान सांगते विश्वास ठेवा,बायबल सांगते प्रेम करा ,त्याग विश्वास आणि प्रेमाच्या जोरावर आज पर्यंत जग चहालत नाही तर धावत आहे.ते केवल धर्मंग्रंथाच्या शिकवणीवरच.जगाच्या पाठीवर कोनाला इतिहास असो अथवा नसो भारताला मोठा इतिहास आहे.अन्य देशाना मात्र नुसता भूगोल आहे.म्हणुनच या भारत देशात अठरापगड़ जाती जमाती, आपआपले धर्म संभाळत सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात आपआपली संस्क्रती सांभाळतात. सगूण संस्क्रारातून घड़लेल्या आणि वेगवेगळया कला गुणानी नटलेल्या या भारतात अनेक वेळा जातियतेचे विष पेरणयाचे काम झाले आहे.या विष प्रयोगातुन या भ्यमीचा माणूस शेतातिल पिकासारखा होरपळला आहे.मूरछीत पड़लाआहे.पण आता विष पेरणाराना थारा देनार नाही,असा हि तो ठाम पणे सांगत आहे.जात,पात,र्धम,पंथ हे आहेतच.पण भारतीयाचीं जात आणि धर्म हा प्रथम माणुसकीचा आहेमाणसाचा आहे,हे अनेक घतनातुन भारतियांनीच जगाला दाखवीन दिलेले आहे.

आता वेळ आलि आहे जगालाच नव्हे तर आपल्यातल्याच जातीय विषवल्ली जोपासनार्‍या जात्यांध नतद्रष्ट पैदासिंना दाखवून देणयाची.आता वेळ आली आहे जगाला एकता आणि शांततेचा संदेश देणयाची.आता वेळ आलि आहे जात,पात,धमर्,पंथापेक्षा माणुस धर्माचा जयजयकार करण्याची.अयोध्यातील वादग्रस्त जागेच्या हक्का बाबत न्यायदेवता उद्या निकाल देणे अपेक्षित आहे .हा निकाल म्हणजे भारतावर मोठे संकट आहे.भारतावर जणू काही अनूबाँम्ब फुटणार आहे.अश्याच असुरी अनंदात भारताचे काही शत्रू दात काढ़त असतिल.अशा नतद्रष्टांचे मनसुबे नेस्तनाबुत करण्या साठी त्यांची दात खीळी बसविण्यासाठी आता आम्ही भारतिय सज्ज झालो आहोत हे हि आता विसरायचं नाही.लोकांनी लोकांसाठी लोकांकरीता चालविलेल्या लोकशाहीच्या राज्यात तुम्ही आम्ही न्यायप्रणाली तयार केलळ आहे.आणि तीचा सन्मान व आदर करण्याचे काम ही आपणा सर्वांचे आहे.म्हणूनच आम्ही म्हणू अयोध्यातील वादग्रस्त जागेचा निकाल हाारतीयासाठी अनूबाँम्ब नसेल.तो नूकत्याच फुललेल्या कळीचा सुगंध असेल,आकाशात ज्या प्रमाणे इंद्रधणूष्या रचगाचीं उधळन करतात त्या प्रमाणे याचा न्यायिक रंग असेल,एवड़ेच

नव्हे तर हा निकाल लोकशाहीच्या गळयातील विजयाची माळ असेल.अयोध्याच्या या निकालावरून राज्यात आनि देशात अणेक तर्क लावले जात आहेत जात्यांध शक्ती आपआपल्या रितीने या प्रकरनाचे जातिय भांड़वल करून आपल्या स्वार्थाच्या पोळया भाजणयाच्या तयारीत असतिल ही.कोणी मंदीराच्या नावाने तर कोणी मस्जितच्या नावाने एसएमएस करत असतिल तर कोणी एसएमएस मधून आफवा पसरवित असतिल अशा नतद्रष्टाना ओळखा.त्यांच्या मुसक्या बांधणयाची आणि त्यांचे मनसुबे उधळुण ळावणताची खरी वेळ आता आलि आहे.निकाल काहिही लागला तरी देशात जातीय तेड़ निर्माण होऊ नये म्हणुन राज्य आणि केंद्र सरकार शांततेचे आवाहन करत आहे.हे आवाह
न सरकारणे करणे म्हणजे हा त्यांचा कर्म आहे .आणि निकाल काहिही लागला तरी त्या निकालाचे उत्स्फूर्त स्वागत करणे हा प्रजेचा धर्म आहे.ज्या ठीकाणी धर्म चांगला असेल कर्म चांगला असेल त्या देशाच्या भवितव्याला,त्या देशाच्या विकासाला आणि शौर्याला या भुतलावर कोणीच पराभूत करू शकत नाही.हे इतिहासाच्या पाणातुन पहावयास मिळत आलं आहे.धैर्य ठेउन संघर्ष करत राहील तर विजयाच शौर्य गाजवता येतं आणि ती धमक भारतियां मध्ये असल्यामुळे भारताचे शत्रू देशात कधी जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर आपल्यातीलच काहि गद्दाराना हाताशी धरून जातीय तेड़ निर्मान करतात.त्यांच्या या प्रयत्नाना काही प्रमानात यश ही येतं.तेव्हां कुठ त्या नतद्रष्टाना स्वताहाच्या विकासात नाही तर भारताच्या विकासाला थोड़ी खिळ बसलि म्हणुन त्यांना आंनद वाटतो .हा त्यांचा असुरी आनंद आता आपल्याला हीरावून घ्यायचा आहे.अयोध्यातील वादग्रस्त जागेचा निकाल काय लागेल? आणि त्याचे पड़साद काय उमटतिल या दहशतीखाली ,दड़पना खाली अथवा हेव्यादाव्याच्या विचारात न रहाता निकाल न्यायदेवतेचा आहे.आणि त्या निकालाचा सन्मान आम्ही करू असं म्हणत प्रतेकाने आपली संयमी भुमिका दाखवून द्यायची आहे.लोकशाहीच्या राज्यात खालच्या कोर्टाने दीलेल्या निकालाला वरच्या कोर्टात दाद मागता येते. उद्याचा निकाल ज्या लोकांना मान्य नसेल,जयावा तो अमान्य असेल त्या लोकांनी या नीकाला बाबत सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी.तसा पर्याय तयांच्याकड़े उपलब्ध आहे.याचा विचार सर्वांनी करावा निकाल विरोधात गेला म्हणुन आंदोलन उभे करायचे,तणाव वाढ़वायचा तो तणाव २१व्या शतकात महासत्तेकड़े वाटचाल करनार्‍या भारताला परवड़णारा नाही.ऐवड़ेच नव्हे तर जगाच्या पाठीवर सर्वात तरूण देश असलेल्या तुमच्या आमच्या सारख्या तरूनांच्या विकासाला खिळ घालनारा आहे.खर तर आजछया तरूण
नि असा काही निर्धार करायला हवा की जातिच्या नावावर विष पेरणार्‍या कोकांचे खायचे दात ओळखत,त्यांच्या चिथावणीला बळी न पड़ता अश्या नतद्रष्टांचे बुरखे टराटर फाड़ायला हवेत.खरं पाहील तर आज देशप्रेमाची कसोटी आहे,अंस अनेकांच मत आहे.पन आम्ही तर म्हणू आम्ही भारतीय आहोत आमची जात माणुस आहे.त्या मुळे अयोध्याचा निकाल हा आमच्यासाठी कसोटी नसेल.हो पन आमची कसोटी,आमचा संघर्ष षा विकासासाठी असेल,आमचे ध्येय हे महासत्तेचे असेल.कुठला कायदा हा हिंदु अथवा मुसलमान नसतोयाची जाणिव प्रतेकाने ठेवायला हवी.कारण ….

पवित्र ते कुळ पावन तो देश,जेथे हरी चे दास जन्म घेति

कर्म धर्म त्याचे झाला नारायन,त्याचेनी पावन तिन्हि लोका

वर्णंअभिमानें कोन जाले पावन, ऐसे द्या सांगून मजपासी

अंत्यजादि योनि तरलया हरिभजनें,तयाचीं पुराने भाटजालीं

वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार,धागा हा चांभार रोहिदास

कबीर मोमिन लतिब मुसलमान,शेणा न्हावी जाण विष्णूदास

काणोपात्रा खोदु पिंजारि तो दादु,भजणीं अभेदू हरिचे पायं

चोखामेळा बंका जातिचा महार,त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी

नामयाची जनी कोण तिचा भाव,जेवी पंढ़रिराव तियेसवें

मैराळा जनक कोन कुळ त्याचें,महिमान तयाचे काय सांगू

यातायातिं धर्म नाहिं विष्णूदासा, निर्णय हा ऐसा वएदशास्त्री

तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ,तारिले पतित नेणों किती

या भारत भुमीत पहील्या पासुनच जातीपातीला म्हत्व कधी दिलेच नाही.त्या मुळे अयोध्याच्या निकालावरून अनेक जात्यांध आपली स्वार्थाची पोळी भाजुन घेण्याच्या तयारित असतील अश्या लोकांपासुन सर्वानी सावध रहायला हव.जया इंग्रजानी जातिच्या नावावर शेकड़ो वर्ष राज्य केल त्याच पांढ़रतोड़्या इंग्रजाची रि ओढ़त आपल्यातले राजकारनी जातीच्या मोहजालात अड़कुन टाकण्याचा प्रयत्न कारत आहेत. आता बस्स झाले,या देशाच कुळ पवित्र आहे

आता वेळ आलि आहे जगालाच नव्हे तर आपल्यातल्याच जातीय विषवल्ली जोपासनार्‍या जात्यांध नतद्रष्ट पैदासिंना दाखवून देणयाची.आता वेळ आली आहे जगाला एकता आणि शांततेचा संदेश देणयाची.आता वेळ आलि आहे जात,पात,धमर्,पंथापेक्षा माणुस धर्माचा जयजयकार करण्याची.अयोध्यातील वादग्रस्त जागेच्या हक्का बाबत न्यायदेवता उद्या निकाल देणे अपेक्षित आहे .हा निकाल म्हणजे भारतावर मोठे संकट आहे.भारतावर जणू काही अनूबाँम्ब फुटणार आहे.अश्याच असुरी अनंदात भारताचे काही शत्रू दात काढ़त असतिल.अशा नतद्रष्टांचे मनसुबे नेस्तनाबुत करण्या साठी त्यांची दात खीळी बसविण्यासाठी आता आम्ही भारतिय सज्ज झालो आहोत

— गणेश सावंत

Avatar
About गणेश सावंत 1 Article
गणेश सावंत हे पत्रकार असून बीड शहरातून प्रकाशित होणार्‍या दैनिक बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादकपद २० वर्षा पासून सांभाळत आहेत. वेगवेगळ्या विषयावर ते लिहीत असतात. त्यांचा आवडता विषय हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांवर लेखन हा आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..