पद्य आणि मृत्युविचार : भाग – ९ / ११

गीत  :  ( भावगीत, सिनेगीत, ग़ैरफ़िल्ली गीत, लोकधारा, पोवाडे, आरत्या, उखाणे इ. ) –

गीत हें खरें तर पद्यच आहे. लयबद्ध काव्य चालीवर गाइलें की त्याचें गीत होतें, तें भावगीत असो, सिनेगीत असो, लोकधारेमधील गीत असो वा अन्य कसलेंही असो. भावकविता आणि भावगीत हे किती एकरूप आहेत हें आपल्याला माहीतच आहे. ( भावकविता आधी आली, म्हणजे १९२२-२३ला आली ,  नंतर भावकवितांचें गायन सुरूं श्रोत्यांसमोर सुरूं झालें. भावकवितांचें recording सुरूं झाल्यावर त्यांना lyric असें म्हणूं लागले,  ज्याचें मराठी प्रतिनाम झालें ‘भावगीत’. पहिली recorded भावकविता आहे १९२६ ची ). भावगीतगायक गजाननराव वाटवे तर स्वत:ला ‘काव्यगायक’च म्हणत  व तशी पाटीही त्यांनी दारावर लावली होती. ( संदर्भ – विनायक जोशी यांचा भावगीतांवरील कार्यक्रम).

आपण विविध गीतांमधील, मृत्यूच्या उल्लेखाची कांहीं उदाहरणें पाहूं.

आज जाने की ज़िद ना करो

हाय ! मर जाएँगे, हम तो लुट जाएँगे,

ऐसी बातें किया ना करो

 • एक प्रसिद्ध उर्दू नग़्मा (गीत)

निरांजन पडलें तबकात

बाळ तर गेला समरात.

– एक जुनें भावगीत.

इथें, अशुभ-शकुनाशी,  सैनिक-मुलाच्या well-being बद्दल व संभाव्य मृत्यूबद्दल आईच्या मनात असलेल्या भीतीची सांगड घातलेली आहे.

मरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा ।

 • ग.दि. माडगूळकर ( गीत रामायण )

कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेलां ।

 • लता मंगेशकर यांनी गाइलेलें एक गीत

एकाच  या जन्मीं जणूं

फिरुनी नवी जन्मेन मी  ।

 • एक सिनेगीत ( पुढचं पाऊल )

भगवान एक क़ुसूर की इतनी बड़ी सज़ा !

दुनिया तेरी यही है तो दुनिया से मैं चला ।

– एक सिनेगीत (गहरा दाग़)

सौ बार जनम लेंगे, सौ बार फ़ना  होंगे

ऐ जाने वफ़ा फिर भी हम-तुम न जुदा होंगे ।

(फ़ना – मरण )

– एक सिनेगीत ( उस्तादों के उस्ताद )

ये इश्क़ इश्क़ ….

… मीरा, पी गई विष का प्याला

– एक सिनेगीत ( साहिर : बरसात की रात )

आज फिर जीने की तमन्ना है

आज फिर मरने का इरादा है ।

– एक सिनेगीत ( गाइड)

उड़ उड़ के कहेगी ख़ाक सनम

ये दर्दे मुहब्बत सहने दो ।

– एक सिनेगीत (जंगली)

शरीराची ख़ाक  मेल्यावरच होते. उर्दू  काव्यात अशाप्रकारवा उल्लेख अनेकदा मिळतो.

ये माना हमें जाँ से जाना पड़ेगा

पर ये समझ लो,

तुमने जब भी पुकारा,

हमको आना पड़ेगा ।

जो वादा किया वो निभाना पड़ेगा  ।

 • एक सिनेगीत ( साहिर : ताजमहल )

ज्या व्यक्तीनें आपलें प्राणप्रिय माणूस  गमावलें आहे, अशा व्यक्तीला, ‘जाणार्‍या व्यक्तीनें अशा प्रकारचा वायदा करावा आणि पुनर्भेटीचें आश्वासन द्यावें’, असें खचितच वाटेल, आणि त्या नुसत्या वाटण्यामुळेसुद्धा कितीतरी दिलासा मिळेल.

हिंदी सिनेगीतांमध्ये उर्दू शायरीचा ( व हिंदी कवितेचा ) रंग दिसतो, यात नवल नव्हे, कारण पूर्वीच्या त्या काळात अनेक उर्दूतील शायर हिंदी सिमेमांमधील गीतें लिहीत होते, तसेंच  हिंदीतील कवीही. म्हणूनच, अनेक सिनेगीतें साहित्यिक दर्जाची आहेत , आणि त्यांत जीवन-मरणाचे उत्कृष्ट उल्लेख मिळतात.

युद्धाच्या, देशभक्तीच्या  संदर्भातील गीतांमध्ये तर मरणोल्लेख येणे अगदी साहजिक आहे. पहा –

अभिमान धरूं, बलिदान करूं, खिंड खिंड अडवूं

उत्तुंग आमची उत्तर-सीमा इंच-इंच लढवूं  ।।

 • एक ‘सैनिक-गीत’

ऐ मेरे वतन के लोगो, ज़रा आँख में भर लो पानी

जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो क़ुर्बानी ।

– कवि प्रदीप (ग़ैरफ़िल्मी गीत )

कर चले हम फ़िदा जानोतन साथियो

अब तुम्हारे हवाले वतन साथियो ।

(फ़िदा – न्योछावर, निसार )

– सिनेगीत ( हक़ीक़त)

वतन की राह पे वतन के नौजवाँ शहीद हों

 • सिनेगीत

श्रेष्ठ संगीत-समीक्षक डॉ. अशोक रानडे यांनी म्हटलें आहे की, सिनेसंगीत म्हणजे त्या त्या काळचें एक प्रकारचें लोकसंगीतच आहे. पं. मुकुल शिवपुत्र यांचेंही तसेंच मत आहे.( संदर्भ : लोकसत्ता मुंबई आवृत्ती, २६.०३.२०१७).  म्हणून आपण असें म्हणायला हरकत नाहीं की, सिनेगीतरूपी लोकगीतांमध्येंही मृत्यूचा उल्लेख असतो.

लोकगीतांचा आणखी एक प्रकार म्हणजे, पोवाडा. पोवाडे तर शौर्याचेच असतात. त्यात लढाईचें वर्णन आलेंच, अन् अर्थात् मृत्यूचेंही. अफझलखान-वधाचा अज्ञानदासानें (अगीनदासानें)  लिहिलेला पोवाडा, तसेंच तुळशीदासाचा तानाजी मालुसर्‍यांवरचा पोवाडा हे तर शिवरायांच्या काळचे आहेत. आधुनिक काळातील, शाहीर नानिवडेकर त्यांच्या पोवाड्यात ‘नरडें येईल फोडाया । …. वीरांची आदिमाया ’ अशी गर्जना करतात .

 

मध्ययुगातील बोलचालीत, आणि त्या काळातील साहित्यातही, ‘लढाईत मरणें’ याचा, ‘कामीं आला’ असा उल्लेख होत असे.  अशा उल्लेखामुळे, अंतिम हेतूच्या विचारानें, ( जसें की स्वराज्य-रक्षण),   मृत्यूला उपयुक्त व उदात्त मानलें गेलेलें आहे. भगवद्.गीतेतही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोच की – ’हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम्’ .

हिंदी, उर्दू, पंजाबी यांमध्ये, बोलभाषेतही मरणोल्लेख अगदी सहज येतात. जसें – ‘.. तो मेरा मरा मुँह देखोगे’ अशा आणाभाका व धमक्या येतात, ‘आज से मेरे लिये तुम मर गए’ असा ultimatum येतो . मराठीतही, ‘मी त्याच्या नांवानें आंघोळ केली’ असा जीवित-माणसाचा मरणोल्लेख येतो.

पहा हिंदीतील एक शेर  –

न बिजली, न पानी, एक ठो है गाँव

मरे सब की नानी, एक ठो है गाँव ।

 • मनोज सोनकर

मराठीतील ‘मेल्या’, ’मुडद्या’ , ‘मढं गेलं तुझं’ अशा प्रकारचें अपशब्द मरणाशी संबंधित आहेत. ते लावण्यांमध्ये, गीतांमध्ये, आणि काव्यातही येतात. उदा.

कसा रोखून बघतोय् मेला ।

आपल्याला बोलीभाषेत व काव्यातही, ‘हाय ! मैं मर गई !’ , ‘हाय ! मर जावाँ’ या प्रकारचे मरणाशी संबंधित बोल आढळतात . आधी एका उर्दू नग्म्याचें उदाहरण दिलेलेंच आहे. ( .. हाय ! मर जाएँगे, हम तो लुट जाएँगे.. ) . आतां, एक सिनेगीत, उदाहरण म्हणून पाहूं या – ( फिल्म :  ‘तीसरी मंज़िल’ ) –

और ये नाज़नीं हैं मेरी …

मैं इनपे मरता हूँ ।

अर्थात्, अशा उल्लेखांमध्ये, ‘मरण’ याचा वाच्यार्थ घ्यायचा नसतो हें खरें ; मात्र, मरणाचा उल्लेख तिथेंही येतो , हेसुद्धां तितकेंच खरें.  इतका जीवन आणि प्रेम यांचा  मरणोल्लेखाशी अन्योन्यसाधारण संबंध आहे.                                               –

‘ज़िंदा लाश’  या संकल्पनेचा वापर  उर्दू काव्यात बराच होतो.  इंग्रजीतही ‘Walking dead’ , zombie, अशा संज्ञा आहेत. ‘जिंदा लाश‘ची संकल्पना वापरलेल्या या मराठीतील कांहीं ओळी पहा –

मी एक प्रेत आहे

जिवंत, पण मेलेलं

….

मी एक प्रेत आहे

बोलणारं अन् चालणारं

 • मनीषा भोळे

‘मर के भी ज़िंदा है (कीर्तीरूपानें) , अशा प्रकारच्या  उल्लेखांत व वाक्.प्रचारांमध्ये मरणाचा उल्लेख येतो, आणि त्याचा उल्लेख पद्यातही होतो. ‘मरावें परी कीर्तिरूपें उरावें’ ही प्रसिद्ध उक्ती तर पद्यमयच आहे.

*

आरतीत देव-देवतांच्या महतीचें वर्णन असतें, त्यांची आळवणी असते; पण आरत्यांमध्येही मरणोल्लेख येतो.

वारी वारी जन्म-मरणातें वारी

हारीं पडलो आतां संकट नीवारी ।

 • देवीची आरती

प्रसन्न होवोनी आशिर्वाद दिधला

जन्म-मरणाचा फेरा चुकवीला ।

 • दत्ताची आरती

 

नरसिंह-अवताराची आरती तर हिरण्यकश्यपूच्या वधाशीच जोडलेली आहे.

‘उखाणा’ हा तर पतीचें नांव घेण्यासाठीच असतो, पण तिथेंही मरणोल्लेखाचें हें एक उदाहरण पहा .

(संदर्भ – ‘बेलभाषा’, सुमन बेलवलकर) . नारायण सीताराम फडके ( ऊर्फ ना.सी. फडके ) यांच्या प्रथम पत्नी मनोरमाबाई यांनी असा उखाणा एकदा घेतला होता  ( ‘नारायण’ या शब्दावर pun साधत ) –

शेवटचा आला मुक्काम, शेवटचं आलं गांव

अशा वेळी माणूस घेतं नारायणाचं नांव ।।

थोडक्यात काय, कसलाही काव्यप्रकार असो, गीतप्रकार असो , किंवा लोकधारेतील पद्यप्रकार असो, आपल्याला मरणाचा उल्लेख पहायला मिळतो.

*

(पुढे चालू) ….

— सुभाष स. नाईक
Subhash S. Naikसुभाष नाईक
About सुभाष नाईक 213 लेख
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची तीन पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. ‘The Earth In Custody’ हे पुस्तक ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी कवितांचें पुस्तक आहे. इतर दोन पुस्तकें ही, ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर आणि इतर अनेक वृत्तपत्रांत/नियतकालिकांत, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…