नवीन लेखन...

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (२) – (अ) /११

  • मोरे यांच्या लेखातील कांहीं statements च्या योग्यायोग्यतेची चर्चा केल्यानंतर, त्या लेखावरील प्रतिक्रियांचा विचार करणेंही आवश्यक आहे. (लोकसत्ता दि. १३ मे, लोकमानस ; १४ मे चा विशेष लेख ;       व २० मे आणि २१ मे च्या लोकसत्तामधील प्रतिक्रिया).

भाग – () – (अ)

  • निखील जोशी, बंगळूरु यांच्या प्रतिक्रियेबद्दल :
  • तमिळनाडु , व आधीचाकाळ :

निखिल जोशी यांनी जुन्या (इ.स. १००० पर्यंतच्या) काळापूर्वीच्या परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केलेला आहे.  त्यासंबंधी आपण पाहूं या. अन्य संदर्भांमधून माहिती उपलब्ध असली , तरी आत्तां मी हेतुत: मुख्यत्वें, के. ए. नीलकंठ शास्त्री या दाक्षिणात्य गृहस्थांच्या ‘ The Illustrated History of South India’  या ग्रंथाचा संदर्भ घेऊन माहिती मांडत आहे.

  • दाक्षिणात्य संस्कृतीत अगस्त्य मुनींचें फार महत्व आहे. ऋग्वेदातही अगस्त्य यांचा उल्लेख आहे ; त्यांच्या ऋचा ऋग्वेदामध्ये आहेत. अगस्त्य विंध्य ओलांडून दक्षिणेला आले व तिकडेंच स्थायिक झाले. त्यांचा आश्रम ‘मलय’ पर्वतावर होता, अशी आख्यायिका आहे ( जो सह्याद्रीचा दक्षिणेचा भाग आहे).

– दाक्षिणात्य परंपरेप्रमाणें, अगस्त्य यांना Father of Tamil मानलें जातें. (आपण याचा अर्थ असा तरी नक्कीच घेऊं शकतो की, अगस्त्य यांनी तमिळच्या बाबतीत कांहींतरी महत्वपूर्ण कार्य केलें आहे. काय, तें आपण पुढे पहाणारच आहोत). ‘मणिमेखलई’ या इ.स. च्या सुरुवातीच्या काळच्या पुरातन ग्रंथाच्या लेखकाला अगस्त्य माहीत आहे.

– तोळकप्पयन यानें इ.स.च्या सुरुवातीच्या काळात तमिळ भाषेच्या व्याकरणावर ग्रंथ  लिहिला आहे. तो अगस्त्य यांचा शिष्य होता, अशी मान्यता आहे.

– तमिळ व्याकरणाचा सर्व base म्हणजे ‘ऐन्द्र‘ व्याकरण. ऐंद्र हा शब्द ‘इंद्र’पासून निधालेला आहे, हें स्पष्ट आहे. इंद्र ही वैदिक देवता आहे, हें आपल्याला माहीत आहे. इंद्र नांवाचे एक ऋषिही होते. तैतिरीय संहिता सांगते की, इंद्र ऋषि हे प्रथम वैयाकरण होत.

तमिळमध्ये प्रचलित असलेलें मूळ व्याकरण, ऐन्द्र व्याकरणावरच आधारित आहे, असें म्हणतात. (मूळ ऐन्द्र व्याकरणाचा ग्रंथ आतां उपलब्ध नाहीं, त्यामुळे त्याबद्दल अधिक कांहीं सांगतां येत नाहीं ) .

– अगस्त्य यांच्या ग्रंथाचें नांव आहे ‘अगत्तीयम्’ ( हा ग्रंथ बहुधा आतां उपलब्ध नाहीं). तमिळमधील ‘संगम’ साहित्याच्या व्याकरणाच्या संदर्भात या ग्रंथाचा संबंध येतो, व या ग्रंथाचा उल्लेखही संगम साहित्यात येतो.

– जसा ‘प्रथम-संगम’ साहित्याशी अगत्तीयम् चा संबंध आहे, तसाच ‘द्वितीय-संगम’ च्या संदर्भात तोळकप्पियम चा संबंध येतो. संगम साहित्याचा काळ इ.स. ची पहली तीन-चार शतकें असा आहे.

– संगम साहित्यात संस्कृत शब्द येतात, व त्यांच्यासाठी तमिळमध्ये विशेष अक्षरें आहेत. ती अक्षरें फक्त संस्कृत शब्दांसाठीच वापरली जातात, इतर तमिळ शब्दांसाठी नाहीं.

  • चेर ( Chera) वंशाचा प्रथम राजा (काळ इ.स. १३०) यानें कुरुक्षेत्रावरील युद्धात, दोन्ही बाजूंच्या सैनिकांसाठी भरपूर अन्नधान्य पुरवलें होतें अशी आख्यायिका आहे. श्री. नीलकंठ शास्त्री म्हणतात की, कदाचित तसें त्याच्या पूर्वजानें केलें असेल.

तें काय असेल तें असो, पण ज्या अर्थी अशा प्रकारची आख्यायिका आहे, त्या अर्थी त्या पुरातन काळींही  महाभारत हें, दक्षिण-भारताला चांगलेंच माहीत होतें.

  • पांड्य राजांची राजधानी ‘मदुरा’ ही होती. मदुरा हा शब्द ‘मथुरा’ यावरूनच बनलेला आहे, असें नीलकंठ शास्त्री सांगतात . ( टीप : आपल्याला दिसून येईल की, ‘मदुरा’ हा मथुरा या शब्दाचा दाक्षिणात्य उच्चार आहे ). नीलकंठ शास्त्री हेंही सांगतात की, मथुरा नांवाचें नगर सिलोन (श्रीलंका) तसेंच जावाजवळही होतें.

ज्या अर्थीं मथुरा हें नांव दक्षिणेत आलें, त्या अर्थी ‘हरिवंश’ हा संस्कृत ग्रंथ,  (जो महाभारताचें ‘खिल’,  एक परिशिष्ट, एक additional भाग आहे) , दक्षिणेत चांगलाच माहीत असला पाहिजें.

  • इ.स. १००० च्या सुमारास तमिळनाडुमध्ये उत्तरेकडून कांहीं कुटुंबें आणण्यात आली. त्यांचे वंशज अय्यर व अय्यंगार आहेत, ही गोष्ट मला त्यांच्यापैकीच एकानें सांगितलेली आहे.

हा सांस्कृतिक समन्वयच नाहीं काय ?

  • डॉ. एस्. कल्याणरामन् हे चेन्नईस्थित विद्वान , ( त्यांच्या ‘सरस्वती’ नदीसंबंधीच्या पुस्तकामध्ये ), पी. एस्. एस्. शास्त्री यांच्या तमिळवरील ग्रंथाचा संदर्भ देऊन काय म्हणतात, तें पहा :  ‘It would be clear … that during the Sangam Age there had already been intensive infusion of vedic culture in South India’.
  • जैन साहित्यिकांनी आधी साहित्य अर्धमागधीमध्ये निर्माण केलें, व मग महाराष्ट्रीमध्ये. लोकभाषांमधून त्यांना लोकांशी संवाद साधायचा होता हें उघड आहे. म्हणून त्यांनी, ज्या भागात ते प्रसार-प्रचार करत होते, तेथील लोकभाषा वापरली. जेव्हां त्यांना दक्षिण भारतात प्रचार करायचा होता, तेव्हां त्यांनी कन्नडमध्ये रचना केल्या. परंतु, इतर भागांशी समन्वय साधण्यासाठी त्यांनी संस्कृतमध्ये रचना केल्या. ही गोष्ट इ.स. १०५० पासून ते १५५० पर्यंत झालेली दिसते. (एक संदर्भ : Essays on Mahabharata, Edited by Arvind Sharma). याचें कारण स्पष्ट आहे की, त्या भूभागातील लोकांना अर्धमागधी किंवा महाराष्ट्री भाषा उमगली नसती. म्हणून त्यांनी, कन्नडमध्ये ,तसेच संपर्क-भाषा (Link Language) अशी असलेल्या संस्कृतमध्ये रचना केल्या.
  • आपण जर संस्कृत कवि व नाटककार पाहिले तर, त्यांतील कांहीं महत्वाचे कवी दक्षिण भारतातील आहेत.

– भारविचा उल्लेख चालुक्यांच्या inscriptions मध्ये कालिदासाबरोबर  येतो. हा उल्लेख     इ.स. ६३२ च्या कर्नाटकातील ऐहोळे येथील शिलालेखात आहे. दंडीनेंही भारविचा उल्लेख केला आहे. भारविचें किरीतार्जुनीय , याला आधार महाभारत आहे.

– दंडीचा संबंध पल्लवांशी होता. त्याचें दशकुमारचरित व अन्य ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

– भास याचा उल्लेख कालिदासानेंही केलेला आहे, यावरून तो कालिदास-पूर्वकालीन आहे. त्याचें सर्व साहित्य दक्षिण भारतात सापडलें आहे, यावरून तो दाक्षिणात्य होता, असें म्हणायला हरकत नाहीं. असें माझ्या वाचनात आलेलें आहे की भास हा केरळ भागातील होता. भासाची रामायण व महाभारत यांवर आधारित नाटकें आहेत.

  • तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील, शंकराचार्य हे केरळ भागातील नंबुद्री होते. रामानुजाचार्य हे तमिळ भागातील होते. मध्वाचार्य हे कर्नाटक भागातील होते. वल्लभाचार्य हे तेलंगण भागातील होते. या सर्वांच्या रचना संस्कृतमध्ये आहेत.
  • रामायण व महाभारत हे ग्रंथ, मध्ययुगात प्रादेशिक भाषांमध्येही लिहिले गेलेले आहेत. कोणी अशी शंका घेऊं शकतो की, याचा संस्कृतशी काय संबंध आहे ? पण एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की, त्या-त्या कवींनी संस्कृत काव्य वाचलेले होते, व तें ज्ञात असल्यामुळे ते प्रादेशिक भाषेत रचना करूं शकले. उदा. एकनाथांचें भावार्थ रामायण, तुलसीदासांचें रामचरितमानस.  असेंच तमिळमध्ये कंबन रामायण आहे. तेलगूमध्येही  असेच आहे. उदा. नान्नपा चें महाभारत.
  • सिंधीमध्येही महाभारताची पुरातन प्रत आहे.
  • भांडारकर इनस्टिट्यूट नें महाभारताची चिकित्सक आवृत्ती सिद्ध करतांना अशा प्रादेशिक प्रती वापरलेल्या आहेत, अगदी जावा प्रतही. त्यांनी महाभारताची दक्षिणेतील  ‘कुंभकोणम प्रत’ही वापरलेली आहे.
  • मुख्य म्हणजे श्रीलंका (सिलोन) , जावा, बाली, ब्रह्मदेश (म्यानमार) , इंडिनेशिया, मलाया (मलेशिया), कांपुचिया वगैरे देशांमध्ये रामायण-महाभारताची परंपरा आहे, व त्या-त्या देशांतील भाषांमध्ये ती लिहिली गेलेली आहेत. सगळीकडेच बौद्धांकडून ही परंपरा पोचलेली नाहीं. (त्यातून, बौद्ध साहित्यात रामायण-महाभारत यांचा उल्लेख limited च आहे). ‘अँकोर वॅट’ चा राजा सूर्यवर्मन् हा हिंदू होता. म्हणजेच, संस्कृतमार्फतही/च ही संस्कृती  तिकडे पोचलेली आहे.
  • श्रेष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी एक महत्वाच्या बाबीचा उल्लेख केलेला आहे. ती गोष्ट अशी : आपला असा अपसमज असतो की संस्कृत साहित्य देवनागरीतच लिहिलेले असेल. पण तसें नाहीं. वेगवेगळ्या प्रदेशातील प्रादेशिक लिप्या दीर्घ काळपर्यंत संस्कृत भाषेचें वाहन ठरलेल्या आहेत. शेकडो शिलालेख संस्कृत भाषेत पण प्रादेशिक लिप्यांमध्ये कोरलेले सर्रास आढळतात. तसेंच, त्या-त्या प्रदेशात प्रादेशिक लिप्यांमधून देवनागरीत व देवनागरीतून प्रादेशिक लिप्यांमध्ये लिप्यंतरही झालेलें आहे.

यावरून आपल्याला संस्कृत व संस्कृती ही वेगवेगळ्या भारतीय भागात, तेथील प्रादेशिक लोकांशी कशी संबंधित होती, कशी मिसळत होती, हें कळेल.

  • निखिल जोशी यांनी .. १००० च्या कालमर्यादेचा उल्लेख केला आहे. ( त्याच्याच आगेमागे विक्रम संवत् आनी सालिवाहन शक यांचेंही एक सहस्त्रक पूर्ण झालें ) . पण अशी कालमर्यादा ही एक कृत्रिमलक्ष्मणरेषा आहे. त्यावेळी कांहीतरी आगळेवेगळें महत्वपूर्ण झालें असलें, तर गोष्ट वेगळी. (जसें की पुरातन- काळातील कुरुक्षेत्रावरील युद्ध. किंवा नंतरच्या काळातील, महमूद गझनवीचें लुटीसाठी हल्ले, अथवा महंमद घोरीचें आक्रमण, आणि त्या घटनाही इ.स.१००० च्या नंतर एकदोन शतकामधलल्या आहेत ) . विशेषकरून, संस्कृतच्या संदर्भात,  किमान  , . . च्या सुरुवातीपासून ते अठरावें शतक , या संपूर्ण-कालखंडात काय झाले, हें  आपण पहायला हवें.  खासकरून, दक्षिण-भारताच्या संदर्भात   तर , इ.स १००० अशी ‘लक्ष्मणरेषा’ मानायचें कारणच नाहीं.

मात्र, वर उल्लेखलेल्या अनेक उदाहरणांवरून, संस्कृत-भाषा व संस्कृती यांचा दक्षिण- भारताशी  यांचा स्पष्ट संबंध दिसतो.

  • ‘मॅक्सम्युलर चें मत तमिळ भाषेच्या इतिहासतज्ञांकडून तपासून घ्यावे (इति निखिल जोशी) :

– मॅक्सम्युलरला त्याचा रिसर्च करण्यासाठी इंग्लंडमधून ग्रँट मिळाली होती. मॅक्सम्युलरनें त्याच्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलेलें आहे की, त्याला भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार व्हायला हवा होता. तेव्हां, आज मॅक्सम्युलरचचें मत सर्वांनींच तपासून घेतलेलें बरें.

( मात्र, हेंही नमूद करायाल हवें की, त्याची कांहींकांही मतें योग्यही आहेत. )

– हडप्पा व मोहेनजोदारो या स्थळांचें उत्खनन होऊन सिंधु संस्कृतीची माहिती जेव्हां पुढे आली,  तेव्हां पाश्चिमात्य विद्वांनांनी ‘आर्य आक्रमणा’चा व ‘आर्य-द्रविड’ हा सिद्धांत पुढे आणला ,      व त्यामुळे, उत्तर भारतीयांबद्दल (ते ‘आर्य’आहेत असें मानून)  दक्षिण-भारतीय, म्हणजे खास करून तमिळभाषियांच्या मनांत दुरावा निर्माण झाला, ही वस्तुस्थिती विसरून चालणार नाहीं. तेव्हां तमिळभाषी विद्वान दुसरें काय सांगणार ?  [ आजही, सिंधु-सरस्वती संस्कृतीची भाषा संस्कृत की तमिळ , यावर ( ‘साधार’ decipherment वरून) वाद सुरूं  आहे ] .

– पण, आपण वर पाहिलें आहे , त्याप्रमाणें, उत्खननात सापडलेल्या पुरातनकालीन-हाडांच्या जेनेटिकल अभ्यासावरून  हें स्पष्ट झालेलें आहे की, भारतात, आर्य किंवा द्रविड असे भिन्न वंश नव्हतेच. आपण हेंही पाहिलें आहे की, दक्षिण भारत, व त्यातील तमिळ प्रदेश , यांचा पुरातन काळीं व मध्य-काळातही संबंध संस्कृत व संस्कृत-संस्कृती यांच्याशी होता.

– पण , अनैतिहासिक ‘आर्य-द्रविड divide’ सिद्धांतामुळे निर्माण झालेले undue biases जायला वेळ लागेलच.

 

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

(पुढे चालू )

 

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..