नवीन लेखन...

आधुनिक मराठी नट, दिग्दर्शक, पार्श्वनाथ यशवंत आळतेकर (अळतेकर)

१९२४ पासून त्यांनी अनेक मूकपटांत भूमिका केल्या तसेच काही मूकपटांचे दिग्दर्शनही केले. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १८९८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथे झाला. ‘इंपिरियल’, ‘सरस्वती सिनेटोन’ ‘रणजित’ ‘नटराज फिल्म्स’ इ. चित्रपट संस्थांमधून नट व दिग्दर्शक म्हणून त्यांनी कामे केली. अनेक हिंदी, मराठी तसेच कन्नड व तमिळ बोलपटांचेही त्यांनी दिग्दर्शक या नात्याने काम केले. रेझिसाँर (दिग्दर्शक/ नाट्यव्यवस्थापक) आळतेकरांनी नंदू खोटे यांच्या ‘रेडिओ स्टार्स’ (१९३२) या नाट्यसंस्थेत सहभागी होऊन, तिच्याद्वारा श्री. न. बेंडे यांची बेबी व चाली, टिपणीस यांचे स्वस्तिक बँक व ठाकरे यांचे खरा ब्राह्मण ही नाटके रंगभूमीवर आणली.

कालांतराने ‘रेडिओ स्टार्स’ ही संस्था सोडून आळतेकरांनी ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेत नट व सहकारी अशा नात्यांनी नाट्यविषयक मौलिक कार्य केले. पुढे त्यांनी ‘नॅशनल थिएटर अॅतकॅडमी’ ही नाट्याभिनयाचे व आवाज जोपासण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी संस्था चालविली. याच संस्थेतील काही विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांनी इंग्लं डमधील ‘लिट्ल थिएटर्स’ व अमेरिकेतील ‘कम्युनिटी थिएटर्स’ यांच्या धर्तीवर ‘लिट्ल थिएटर’ ही संस्था स्थापून (१९४१) तिच्यातर्फे माझ्या कलेसाठी (१९४२),सारस्वत (१९४२) यांसारखी वरेरकरांची काही नाटके रंगभूमीवर आणली.

रंगभूमीवरील त्यांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये ‘अण्णासाहेब’ (आंधळ्यांची शाळा), ‘रामशास्त्री’ (भाऊबंदकी),‘बापूसाहेब’ (रंभा) वगैरेंचा उल्लेख करता येईल. आधुनिक पाश्चात्य नाट्यप्रणालींचे मराठी रंगभूमीवर प्रयोग करण्याचे आणि अभिनय व दिग्दर्शन यांत अभिनवता आणण्याचे श्रेय आळतेकरांस आहे. आळतेकरांच्या स्मरणार्थ ‘अभिनय’ या संस्थेमार्फत मुंबईच्या परिसरातील हौशी नाट्यसंस्थांसाठी १९६४ पासून नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. पार्श्वनाथ आळतेकर यांचे कोल्हापूर येथे २२ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..