नवीन लेखन...

परदेशात जातेय येलदरीची कोळंबी

 

परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी सिध्देश्वर जलाशयातील कोळंबी (झिंगा) आणि कतला, मरळ या माशांना चीन व जपानमधून मोठी मागणी आहे. गेल्या वर्षी येलदरीच्या गोडय़ा पाण्यातील कोळंबीची हवाबंद डब्यातून चीन व जपानला निर्यात झाली. रोज सुमारे ३० क्विंटल कोळंबी पाठविली गेली. या कोळंबीला ९०० ते ११०० रुपये

किलो भाव मिळाला. पूर्णा मत्स्यव्यवसाय सोसायटीने चीनबरोबरच जपानलाही कोळंबीची निर्यात केली आहे.कोलकाता व मुंबईतूनही कोळंबी, कतला आणि मरळ या माशांना मोठी मागणी आहे. येलदरीचा जलाशय ४२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेला आहे. जलाशयाची साठवणक्षमता ९३४ दक्षलक्ष घनमीटर एवढी आहे. या जलाशयात मासेमारीचे कंत्राट मिळालेल्या पूर्णा मत्स्य सोसायटीचे प्रमुख पुंडलिकराव नागरे यांना परभणीचा मासा देशात व विदेशातही प्रसिध्द करण्याचा चंग बांधला आहे. संस्थेने त्यासाठी जिंतूर येथे बर्फ निर्मितीचा कारखाना उभारला आहे. जलाशयातून गोळा केलेली मासळी आणि कोळंबी बर्फामध्ये घालून मुंबईला पाठविली जाते. मुंबई येथे कोळंबी आणि मासे हवाबंद डब्यात टाकण्याची प्रक्रिया केली जाते आणि तेथून त्यांची निर्यात होते.येलदरी जलाशयात गेल्या हंगामात पाच ते आठ फूट लांबीचे आणि पाच ते सात किलो वजनाचे मासे आढळले होते. या वर्षी साडेतीन ते चार फूट लांबीचे तसेच तीन ते चार किलो वजनाचे मासे आढळत आहेत. कतला, मरळ, काऊशी या जातींबरोबरच रोहू, मिरगल, सिंगड, बलव, सिव्हलर, ग्रास्का, सार, स्कायस्क्रीन या जातीचे मासेही येथे आढळतात. पूर्णा सोसायटीने गेली पाच वर्ष सातत्याने विविध प्रकारची मत्स्यबीजे जलाशयात सोडलेली आहेत. कतला, मरळ आणि काळूशी माशांना मुंबईच्या बाजारपेठेत ६०० ते ८०० रुपये तर कोलकात्याच्या मार्केटमध्ये एक हजार ते १२०० रुपये भाव प्रतिकिलो मिळतो आहे. केरळमध्येही गोड
ा पाण्यातील या जातीच्या माशांना मोठी मागणी आहे.येलदरीच्या यशकथेपासून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील डोंगरतळा, कर्परा, बेलखेडा, मासोळी, लोअर-दुधना, गोदावरी नदीवरील बंधारे तसेच अन्य

मध्यम आणि लघु तलावामध्ये मत्स्यव्यवसाय हळूहळू उभारी घेऊ लागला आहे.

— बातमीदार

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 95 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..