नवीन लेखन...

पनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं?

आपण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यावी आणि ती म्हणजे रोज रात्री झोपण्याच्या दोन तासांआधी रात्रीचं जेवण करावे किंवा काही खाल्ल्यावर लगेच झोपू नये. कारण झोपण्याआधी दोन तासांपेक्षा कमी अंतराने जर आपण काही खाल्लं तर वजन वाढतं, म्हणूनच जेवण आणि झोप ह्यामध्ये कमीत कमी दोन तासांचे अंतर हवे.पण वजन वाढण्याच्या भीतीमुळे अनेक लोक बऱ्याचवेळा जेवण खाणे टाळतात. जे चुकीचं आहे. आता आम्ही अशा एका पदार्थाबाबत सांगणार आहोत, ज्याचं सेवन योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात केल्यास वजन न वाढता आपल्या शरीरातील फॅट बर्न होण्यास त्याची मोठ्या प्रमाणात मदत होते आणि हा पदार्थ खाण्यासाठीही स्वादिष्ट असून ह्या पदार्थाचे नाव आहे पनीर!! तर आपण आता ह्या पनीरचे फायदे पाहुयात
Eat paneer at night before sleep controls weight | पनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं?
वजन कमी करण्यासाठी 
आपण एक गोष्ट येथे ध्यान्यात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे या दोन्ही गोष्टी व्यक्तीच्या मेटाबॉलिजमवर अवलंबून असतात. त्यामुळे आपल्याला बऱ्याचवेळा असे दिसून येते की, दोन व्यक्तींचं वजन एकप्रकारेच आणि एकाचवेळेत कमी होत नाही, त्यामध्ये थोडाफार फरक जाणवतो. जे लोक वजन कमी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत त्यांच्यासाठी पनीर हा योग्य आणि उत्तम पर्याय ठरू शकतो. अमेरिकेतील एका यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, झोपण्याआधी आपल्या जेवणातून पनीरचा समावेश केल्याने मेटाबॉलिजमचा स्तर वाढण्यास मदत होते आणि त्याचमुळे त्या व्यक्तीचे वेगाने फॅट बर्न होतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते.
झोपण्याआधी खावे पनीर
अमेरिकेतील एका यूनिव्हर्सिटीमध्ये पनीरचा अभ्यास १० महिलांवर करण्यात आला. त्यांना वजन कमी करण्याच्या आव्हानात सहभागी व्हायचं होतं. ह्या रिसर्च दरम्यान ह्या सर्व महिलांची रात्री झोपण्याआधीची स्थिती आणि सकाळी झोपून उठल्यानंतर शरीराची ऊर्जा तपासणी केली गेली. या सर्व महिलांना झोपण्याच्या अगोदर त्यांच्या जेवणामध्ये पनीरचे काही तुकडे खायला दिले गेले. जेव्हा या महिला झोपून उठल्या तेव्हा त्यांच्या शरीराची ऊर्जा पातळी ही त्यांच्या पूर्वीच्या म्हणजेच रिसर्च पूर्वीच्या दिवसांपेक्षा जास्त होती. तसेच त्यांचा मेटाबॉलिजमचा स्तरही वाढला होता आणि फॅट बर्न करण्याची क्रियाही वेगाने झाली होती.
मेटाबॉलिजम स्तर वाढवून फॅट बर्न करतं पनीर
मेटाबॉलिजम स्तर वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पनीरमध्ये कॅसीन हे महत्त्वाचं प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं. जे आपल्या शरीराचा मेटाबॉलिजम आणि फॅट वेगाने बर्न करण्यासाठी मदत करते. पनीर हे एक लो फॅट चीज असून, जे वजन न वाढवता ते कमी करण्यास मदत करते. आज जास्तीत जास्त लोक वजन कमी करण्याच्या नादात चीज म्हणजेच पनीरचं अजिबातच सेवन करत नाहीत. अशांसाठी ही एक चांगली बातमी असून पनीर अशा लोकांसाठी अत्यंत  फायदेशीर आहे. त्यामुळे आता वजन कमी करायचं असेल तर आपल्या आहारात योग्य प्रमाणात पनीरचा समावेश नक्की करावा.
Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..