शब्दास्वरांचे जादुगार पं. गोविंदराव पटवर्धन

आज २१ सप्टेंबर
शब्दास्वरांचे जादुगार महान हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२३ रोजी झाला.

गोविंदराव पटवर्धन बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार! हार्मोनियमवर ज्या सफाईने त्यांची बोटं फिरत, त्यात ते स्वरालयीची जी कामगत करत ते केवळ दैवी म्हणावं लागेल.

जन्मताच सूर,ताल व लय यांची निसर्गदत्त देणगी लाभलेले गोविंदराव यांनी आपल्या मुंजीत हार्मोनियम वाजवून आपल्या सुप्त गुणाची चुणूक दाखवली होती. आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी संगीत वेणुनाद या नाटकाच्या प्रयोगाला ऑर्गन ची साथ केली होती.

विशेष हार्मोनिअमच्या साडेतीन सप्तकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या गोविंदराव यांनी वादनाचं कोणतंही तांत्रिक शिक्षण घेतलेलं नव्हतं, ते स्वतः उत्तम तबला वादकही होते. त्यामुळे लय, ताल यावर त्यांचे प्रभुत्व होते.

१९४० साली मुंबईला आल्यावर पं गोविंदराव साहित्य संघाच्या संगीत नाटकांना ऑर्गनची साथ करू लागले. त्या वेळी देवधर स्कूल ऑफ म्युझिक व मनहर बर्वे यांच्या विद्यालयात पं. कुमार गंधर्व व पं.राम मराठे यांची ओळख झाली, तेव्हा पासून अखेर पर्यत  पं गोविंदराव यांनी त्यांना साथ केली. कोणत्या स्वरासाठी कोणतं बोट वापरायचं, असं विचारलं तर ते म्हणायचे – मी फक्त वाजवतो. बाकीचं काही मला माहीत नाही. त्यातून मला आनंद मिळतो असं ते सांगायचे.

पेटीवादन हे दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे प्रत्येक स्वर सुटासुटा वाजवणं आणि दुसरा म्हणजे जोडून वाजवणं. गोविंदराव या दोन्ही पध्दतींनी वाजवायचे. हार्मोनियम व ऑर्गन वादनातला सफाईदारपणा हे त्यांच्या वादनाचं वैशिष्टय होतं. अतिशय जलद आणि सफाईदार पलटे ते वाजवत असत. त्यांची दुसरी खासियत म्हणजे ते पद वाजवताना त्यातले शब्द ऐकू आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. ते आपल्या शिष्यांना शिकवतानाही ते त्याच पध्दतीने शिकवायचे.

गोविंदराव पटवर्धन यांना पेटीवर्धन पण म्हणत असत. त्यांना गोविंदराव असे म्हणलेले रुचत नसे, ते नम्रतेने म्हणत गोविंदराव म्हणायच्या योग्यतेचे एकच पं गोविंदराव टेंबे मला नुसतेच गोविंदा म्हणा, खरेतर आपल्या गुहाघरवासीयांनी गोंद्या म्हणून हाक मारलेले त्यांना आवडायचे. अनेक संगीत कार्यक्रमांमधून, संगीत नाटकांतून त्यांनी साथसंगत केली. आलापी, तान वाजवण्यातली सफाई होती. आयुष्यभर रामभाऊ मराठे, कुमार, वसंतराव, छोटा गंधर्व यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ करून करून वादनातलं हे गायकी अंग गोविंदरावांनी आत्मसात केलं होते, व स्वत:त अक्षरश: मुरवलं होते.

गोविंदराव पटवर्धन यांच्या एकसष्ठी सत्कारात पु.ल नी त्यांच्या बरोबर हार्मोनियम वादन केले होते, तेव्हा पु.ल मार्मीकतेने म्हणाले होते, पोटात व पोटरीत गोळा येतो हे माहिती होते पण बोटातही गोळा येतो हे आज प्रथम समजले.

पं. गोविंदराव पटवर्धन यांचे पट्टशिष्य म्हणून डॉ.विद्याधर ओक यांना ओळखले जाते. त्याच्या इतर शिष्यांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, मकरंद कुडले, विघ्नेश्र्वर जोशी, अशी नावे घेता येतील. आदित्य ओक तर लहानपणापासून गोविंदराव पटवर्धन यांचे हार्मोनियम वादन ऐकत आला आहे. तो पण त्यांचाच शिष्य.

पं. गोविंदराव पटवर्धन यांचे ३० जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.

गोविंदराव पटवर्धन एक हार्मोनियम बरोबरच उत्कृष्ट ऑर्गनवादक होते. त्यांच्यासंबधी काही प्रसंग

एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि तबलजी गंधर्वाँधा कैक वेळ समेवर यायलाच देत नव्हते त्यावर छोटा गंधर्व गोविँदरावांना म्हणाले, “अरे गोविंदा माझं वय पंच्याहत्तर आहे आता मी दमलोय आता थांब” गंधर्वाँची ही वाक्य गोविंदरावानी ऑर्गनवर जशीच्या तशी उतरवली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

पूर्वी नाटकं उघड्यावर आणि बत्तीच्या उजेडात होत. असंच एका उत्सवाच्या प्रसंगी नाटकाचं आयोजन करण्यात आलं साथीला गोविंदराव होते साधारण दहाचं नाटक पण साडेनवाच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला सहाजीकच नाटक रद्द झालं त्यावर कोणीतरी म्हणालं गोविंदराव “तुमचा ऑर्गनवादनाचा कार्यक्रम देवळात होऊ दे” ते गोविंदरावानी मान्य केलं आणि हा त्यांचा कार्यक्रम तब्बल पहाटे साडेतीन वाजेपर्यँत रंगला.

पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त पु.ल.देशपांडे यांनी केलेले भाषण.

पुलंची भाषणे – गोविंदराव पटवर्धन यांच्याबद्दल

पं. गोविंदराव पटवर्धन यां चे व्हिडीओ
www.youtube.com/watch?v=0JWkKjxNGNc
www.youtube.com/watch?v=5qXM9L3bjBA
www.youtube.com/watch?v=_c-JWigeh3I


— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

 

 पूजा
poojapradhan323@gmail.com


संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1749 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…