नवीन लेखन...

महाराष्ट्रातील पैठणी विणकरांच्या समस्या !

महाराष्ट्रात पैठणीसाडी पैठण येवला पुणे व मालेगावमध्ये विणली जाते. पैठण व येवल्याच्या पैठणी त्यांचे विविध रंग कलाकुसर व कपडयाच्या पोतासाठी प्रसिद्ध आहेत. २००० वर्षापूर्वी सातवहाना काळातील राजा शालीवाहाना पासून महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्हयातील पैठण या गावी पैठण्या मिळत असत असा इतिहास आहे. पैठणीचे अंग विविध रंगाच्या शुद्ध रेशमाच्या धाग्या पासून विणले जाते तर कलाकुसरीचे काम पैठणीचा पदर व काठावर केले जाते. पैठणीची शोभा वाढविण्यासाठी शुद्ध सोन्याच्या व चांदीच्या बारीक तारेचा वापर केला जातो त्या तारेला ‘जर’ म्हणतात.आपल्या देशात कामगारांचे बरेच प्रश्न अनु कामगार कायदे आणि आर्थिक निकशावर अवलंबून आहेत. तसेच काही प्रश्न हे संघटीत कामगार संघटनांवरही निर्भर आहेत.औरंगाबादेतील पैठण या शहराचे महत्व संत परंपरे बरोबर पैठणीच्या दृष्टयाही खूप आहे. ते आपल्या राज्य व देशापूरते मर्यादीत न राहाता सर्व जगभर प्रसिद्ध आहे. पैठणी बनविण्यासाठी शुद्ध रेशीम सोने व चांदीची ‘जर’ तसेच काही रसायनं वापरली जातात. रेशीम हे बंगळूरू येथून विकत घेतले जाते तर सोने व चांदीची ‘जर’ ही गुजरात मधून मागविली जाते. रेश्मावर काही रासायनीक प्रक्रिया केली जाते. बहुदा मजुर हे घरातीलच असतात कारण हा पिढयांनपिढया चालत आलेला व्यवसाय आहे. कच्च्या मालाच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती सरकारचे पैठणी विणकरांच्या प्रति असलेले उदासिन धोरण व व्यवसायात नकली मालाची घुसखोरीने हा व्यवसाय धोक्यात आला आहे.भारतात अनेक ठिकाणी मशिनवर विणलेल्या किंवा नकली पैठणींमुळे पिढयांपिढया चालत आलेल्या कारागीरांचा व कलेच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पैठण शहरातील सर्वच कारागिरांचे म्हणणे आहे की मशिनवर पैठणी विणण्याचा उद्योग अनेक राज्यात केला जातो त्यावर सरकारने बंदी आणल त
बर्‍याच विणकरांना उद्योगाच्या संधी उपल्बध होतील आणि मुख्य म्हणजे हा उद्योग टिकून राहिल व आम्हांला आर्थिक फायदा होईल.“प्रतिष्ठान

विणकर असोसिएशन” औरंगाबाद यांच्या कायदेविषयक मंडळाने असा निर्णय घेतला आहे की पैठणी साडयांसाठी कायद्याने विशेष अधिकार पत्र किंवा पेटन्ट मिळवायचे जेणे करून नकली पैठण्या विकि्रस व बनविण्यास आळा बसेल आणि पैठणीला देशात व परदेशात चांगली बाजारपेठ उपल्बध होईल आणि खेडेगावांतून हा व्यवसाय कायम टिकून राहिल तसेच देशातील महिला खरेदीदारांची फसवणूक होणार नाही व पैठणी योग्य किंमतीला विकता येतील.“ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी” (GMGC) जी “बौधिक मालम(IPR – Intellectual Property Rights) संबंधात प्रचार व प्रसार करून जनजाग्रण करते यांनी पैठणीला पेटन्ट मिळावे म्हणून “भोगोलिक चिन्ह किंवा खूण नोंदणी ऑफिस” Geographical Indications Registry कडे अर्ज केला आहे व त्यांनी तो स्विकारला आहे. त्याला कोणाचा विरोध झाला नाही तसेच बौधिक मालमत्ता हक्क आणि भौगोलिक चिन्हाच्या कायद्याच्या तरतूदी अटी व शर्ती पुर्‍या केल्या तर पैठणीला पेटन्ट मिळवण्याचा प्रयास चालू आहे.पैठण मधील एका पैठणीविणकर आणि वितरकाचे म्हणणे आहे की आजच्या नव्या फॅशनच्या दुनियेत सुद्धा पैठणी सर्वच वयोगटातील स्त्रीयांना तेवढीच आकर्षीत करते. त्याचे असेही म्हणणे आहे की ऐवढया सगळया दिव्यातून जाऊन सुद्धा पैठणी कलाकार व विणकर अजून पैठणी बनवितात. सरकारने आम्हांला यात सवलती व बाजारपेठ मिळवून द्यावी. एक पैठणी हॅन्डलुमवर बनविण्यासाठी ८ ते १५ दिवस लागतात.पैठण्या येवला नागदे बालहेगाव कोठमगाव सुकी व पैठणच्या आसपासच्या गावात विणल्या जातात. जवळ जवळ २५०० हॅन्डलुम्स व ७०० ते ८०० कुटुंबे या व्यवसायात कार्यरत आहेत.वर्षानु वर्षे एका पिढीकडुन दुसर्‍या पिढीकडे परंपरागत चालत आलेला हा ैठ
ी व्यवसाय सध्या बरेच चढ उतार अनुभवत आहे. बंगळुरू व दक्षिणेकडील काही शहरात पॉवरलुमवर बनविलेल्या नकली व कमी किंमतीत मिळणार्‍या पैठणी याला कारणीभूत आहेत. खर्‍या पैठणींपेक्षा नकली व कमीकिंमतीच्या व प्रतिच्या या पैठणीसाडया खरेदिदारांना आकर्षित करीत आहेत. या पैठण्या कमी प्रतिच्या असूनही त्यांचे रंग व दिसणे अगदी खर्‍या पैठणींसारखे दिसते. या व्यवसायात ३००० विणकर आणि ८००० इतर माणसे ही उत्पादन विक्री व इतर संबंधीत कामात गुंतलेली आहेत यावर सरकारचा काही र्निबंध व अंकुश नाही.१९६२ साली शासनाने ‘महाराष्ट्र लघु ऊद्योगिक प्रगती महामंडळ मर्यादित’ ची स्थापना केली. मंडळ विणकरांना शिक्षण आणि मार्गदर्शन करीत असते तसेच शासन वेळोवेळी या लघु उद्योगाला वाहीलेल्या कुशल कामगारांना “कलारत्न” व “कलानिधी” सारख्या पारितोषकाने सन्मानित करते. पैठणी विणकरांना केंद्र सरकारने “Intellectual Property Rights” (IPR) “बौधिक मालमत्ता हक्क” बहाल केला. या हक्कामुळे त्यांच्या मालाला योग्य भाव व बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. असे असुनही आज महाराष्ट्रातील पैठणी कामगार पुरता हबकला आहे व त्याला वरील सर्व कारणांमुळे त्याचे व येणार्‍या पिढीचे भवितव्य धुसर दिसत आहे.या पत्रा व्दारे केंद्र व राज्य शासनाला विनंती आहे की पैठणीसारखा पारंपारीक लघुउद्योगावर आज कैक कुटुंबांचे जीवन अवलंबून आहे त्या व्यवसायाच्या पुर्नजीवनाची जबाबदारी शासनाने घ्यावी व त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर त्वरीत कार्यवाही करावी. महाराष्ट्राचे व देशाचे नाव जगात उज्वल करणारा व परदेशी चलन मिळविणारा व्यवसाय असाच वार्यावर सोडून दिला तर कुशल पैठणीविणकर कारागिर व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रश्नात अधीकच भर पडेल.जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..