नवीन लेखन...

ओळख मूलांकाची – मूलांक ४

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ४ असतो.

अंक शास्त्रीय दृष्ट्या मूलांक ४ : अंकशास्त्र ही भविष्य कथनाची एक स्वतंत्र शाखा मानली जाते.ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या प्रमाणे राशींनुसार (Zodiac Signs) माणसाचा स्वभाव कळतो. त्याचप्रमाणे, अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव ओळखला जातो. त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा, व्यक्तिमत्व तसेच, आवडीनिवडी ओळखल्या जातात. त्यानुसार, आज आपण मूलांक ४ च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांचा स्वामी ग्रह राहू आहे. मूलांक ४ चे लोक अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय, तांत्रिक क्षेत्रात कुशल आणि कल्पक असतात. या व्यक्तींचे जीवन अनेकदा चढ-उतारांनी भरलेले असते, पण त्या कठोर परिश्रमाने यश मिळवतात.

मूलांक ४ ची वैशिष्ट्ये:
स्वामी ग्रह: राहू – हे अनपेक्षित बदल, तांत्रिक प्रगती आणि क्रांतिकारी विचारांचे प्रतीक आहे. प्रचंड हट्टी स्वभावाचे असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक – ठरवलेली गोष्ट करतात साध्य, मग ते करिअर असो वा लाईफ पार्टनर.

स्वभाव: शिस्तप्रिय, हट्टी, व्यावहारिक, कल्पक आणि दूरदर्शी असतात. हे लोक एकदा ठरवलेले काम पूर्ण करूनच थांबतात.

करिअर: तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, कंत्राटदार, राजकारण, संशोधन आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात हे लोक खूप यशस्वी होतात.

नकारात्मक बाजू: कठीण स्वभावामुळे कधीकधी स्वतःचेच नुकसान करून घेतात, तसेच अचानक प्रगती किंवा पडझड होण्याची शक्यता असते.

सुसंगत अंक: १, २, ५, ६, ७, ९ हे अंक मूलांक ४ साठी शुभ मानले जातात.

व्यक्तिमत्व: ४ हा मूलांक असलेल्या व्यक्तींचे एकूण व्यक्तिमत्व विशाल असते. पण कधी कधी हे अगदी याउलट निदर्शनास येतात. यांचे स्वतचे असे एक वेगळेच व्यक्तिमत्व असते. कुठल्याही गोष्टीकडे पाहताना हे एका वेगळ्या नजरेतूनच पाहतात.

4 मूलांक असलेल्या व्यक्ती अति विचारशील आणि अतिकल्पनाशील असतात. अर्थात बऱ्याचदा विरोधकही यांचे विचार नंतर स्वत मान्य करतात. परंपरा आणि कायदा सुव्यवस्था यांच्यासंदर्भात अनेक मतभेद होऊ शकतात. यांचे जीवनही अस्थिर असून, कधी हे राजाप्रमाणे जगतात, तर कधी रंकाप्रमाणेही यांना जगायला लागते. यांच्या आर्थिक स्थितीमध्येही झपाटय़ाने बदल होत असतात. कधी श्रीमंत तर कधी गरीब असे बदल यांच्यात बऱ्याचदा दिसतात. नवीन विचार आणि नवीन काही उपक्रम करण्यात हे कायम अग्रेसर असतात. यांचे जीवन सामान्य कधीच नसते, सतत काही ना काही मोठय़ा घटना किंवा गोष्टी यांच्या आयुष्यात घडत असतात. यांच्या डोक्यातून अनेक नव्या सुपीक कल्पना सतत जन्म घेत असतात. परंतु याचा लाभ मात्र यांना स्वतला होत नाही. दुसऱ्या व्यक्तींना मात्र यांच्या विचाराचा खूप फायदा होतो.

गुण: दुसऱ्यांच्या दुखामुळे यांना खूप त्रास होतो. विचारशीलता हा यांचा गुण ठरतो तर अतिविचार हा यांच्याकरता अवगुणही ठरतो. अतिविचार करण्यामुळे ते स्वतःची कार्यक्षमता गमावून बसतात. प्लॅनिंग करण्यात तरबेज असतात:
या जन्मतारखेचे लोक प्लॅनिंग करण्यात फार तरबेज असतात. कोणतंही काम करण्याआधी हे लोक नीट विचार करतात तसेच, योग्य प्लॅन आखतात. तसेच, या जन्मतारखेचे लोक वेळेचे पक्के असतात. यांना प्रत्येक विषयाची माहिती असते.

विचारांवर ठाम असतात:
या जन्मातारखेच्या लोकांना एकदा जर निर्णय घेतला तर ते आपल्या विचारांवर ठाम असतात. तसेच, एकदा हाती घेतलेलं काम ते पूर्ण करुनच सोडतात. त्यामुळेच अनेकदा इतरांना यांच्याकडे पाहून आश्चर्यचकित वाटतं.

फिरण्याचे असतात शौकीन:
या जन्मतारखेच्या लोकांना स्वत:वर पैसे खर्च करायला फार आवडतात. त्याप्रमाणेच हे लोक आपल्या कपड्यांवर, शॉपिंगवर खर्च करतात. या लोकांना फिरायला देखील फार आवडतं. अनेकदा लोक यांच्या या सवयीमुळे त्रस्तदेखील होतात. मात्र, हे आपली पॅशन सोडत नाहीत.

स्पष्टवक्तेपणा:
या जन्मतारखेच्या लोकांना कोणतीच गोष्ट मनात ठेवायला आवडत नाही. तसेच, जे मनात आहे ते ओठांवर आहे. त्यामुळे हे लोक बोलताना कधीच लाजत नाही. तसेच, आपल्याला न आवडलेली गोष्ट हे लोक तोंडावर देखील बोलून दाखवतात. थोडक्यात सांगायचं तर, यांना स्पष्टवक्तेपणा आवडतो.

4 हा अंक अतिविचारशील व रचनात्मक मूलांक आहे. या अंकाचा स्वामी हर्षल असून,याला इंग्रजीमध्ये युरेनस असं म्हटलं जातं. हर्षल हा ग्रह अतिविचार करणारा ग्रह मानला जातो. नवे काही विचार किंवा परंपरा सुरू करण्यात हर्षलचा हातखंडा असतो.

स्वरूप: 4 हा मूलांक कधी खूप आकर्षक तर कधी अति अनाकर्षक वाटतो. छान मूडमध्ये या व्यक्ती आकर्षक दिसतात. मूलांक ४ असलेल्या व्यक्ती उत्तम व्यापारी, ट्रान्सपोर्टर, इंजिनीअर, ठेकेदार, उद्योगपती, राजकारणी, पायलट, डिझायनर, डॉक्टर किंवा वकील बनू शकतात. कोणत्याही विभागाचा प्रमुख बनले तर या व्यक्ती त्याठिकाणी मोठा बदल करु शकतात.

स्थिर बसू शकत नाहीत:
मुळांक चार असलेले लोक एकाठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत. हे नेहमी काही न काही तरी करत राहतात. यांना सामाजिक आणि धार्मिक कार्यात जास्त रुची राहते. हे लोकांना चांगल्याप्रकारे प्रभावीत करू शकतात. हे आपल्या रहस्य गुपित ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु यामध्ये जास्त यशस्वी होत नाहीत. सहजपणे कोणाशीही मैत्री करत नाहीत परंतु एकदा मैत्री केली तर प्रामाणिकपणे शेवटपर्यंत मैत्री जपतात. सामाजिक सन्मान मिळवण्याच्या नादात शत्रूही निर्माण करून घेतात.

‘ही’ आहे यांची खासियत:
ज्या लोकांचा मूलांक 4 असतो. अशा लोकांना ,सामाजिक क्षेत्राची विशेष आवड असते. हे लोक इतरांना लाभ देतात. पण, मनात कधीच स्वार्थी भाव ठेवत नाहीत. तसेच, या जन्मतारखेचे लोक आपल्या गोष्टी इतरांबरोबर कधीच शेअर करत नाहीत. तसेच, पटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत. मात्र, यांच्या डोक्यात एकाच वेळी बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात. या जन्मतारखेच्या लोकांची तर्क-वितर्क क्षमता फार चांगली असते.

हे लोक पटकन लोकांच्या प्रभावाखाली येतात आणि त्यामुळे वाईट संगतीत अडकण्याची शक्यता अधिक असते. काही वेळा नैतिकतेच्या चौकटीबाहेर जाऊन निर्णय घेण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत असं अंकशास्त्रात म्हटलं आहे.

शुभ तारीख: १, २, ४, १०, ११, १३, १९, २०, २२, २८, २९, ३१ या प्रत्येक महिन्याच्या शुभ तारखा आहेत. यादिवशी महत्त्वाची कार्ये करावीत.

अशुभ तारीख: ३, ९, १२, १८, २१, २७ या तारखांना महत्त्वाचे कार्य करू नये.

भाग्यशाली दिवस: शनिवार, बुधवार

भाग्यशाली वर्ष: १०, ११, १३, १४, १९, २०, २८, २९, ३१, ३७, ३८, ४१, ४६, ४७, ५०

शुभ चिन्‍ह:
यांच्यासाठी शुभ दिशा नैऋत्य, क्षुब्ध धातू चांदी, शुभ रंग काळा, आकाशी, हिरवा, पिवळा आणि निळा आहे.

भाग्यशाली मंत्र:
ॐ वं वरद मूर्तये नम।
ॐ ही घृणि सुर्याय आदित्य श्री श्रीं श्रीं।
ॐ ऐं हीं क्लीं श्रीं क्लीं हीं ऐं ॐ

मूलांक ४ साठी उपाय:
राहूचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी गणपतीची पूजा करणे फलदायी ठरते. कुत्र्यांना पोळी किंवा बिस्किटे देणे शुभ मानले जाते. नकारात्मकता टाळण्यासाठी योगा आणि ध्यान करावे.

जन्मांक ४ च्या जातकांसाठी २०२६ चे भविष्य:
आरोग्य (Health):  वर्षी तुमचे आरोग्य सामान्यतः उत्तम राहील, परंतु काही महिन्यांत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. १३ फेब्रुवारी ते ४ एप्रिल या काळात तब्येतीकडे लक्ष द्या. हाडांचे विकार आणि बीपीचा त्रास होऊ शकतो. मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी नोव्हेंबर महिना थोडा कठीण असू शकतो. फेब्रुवारी, एप्रिल, जून आणि जुलै महिन्यात आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवू शकतात.

नोकरी आणि व्यवसाय:
विधी, एमबीए आणि तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. ऑफिसच्या कामासाठी परदेश प्रवासाचे योग आहेत. आयटी, मीडिया आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील लोकांसाठी १३ एप्रिल नंतरचा काळ अनुकूल आहे. १० मार्च ते २० नोव्हेंबर दरम्यान पदोन्नती किंवा नोकरी बदलण्याचे चांगले मार्ग मोकळे होतील. चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरेल.

प्रेम आणि वैवाहिक जीवन:
तुमचे लव्ह लाईफ यशस्वी राहील आणि जोडीदाराची साथ मिळेल. तुम्हाला प्रेमाचे रूपांतर विवाहात करायचे असेल, तर जानेवारी ते १८ मार्च आणि १३ मे ते १८ जुलै हा काळ अतिशय शुभ आहे. वैवाहिक आयुष्य सुखद असेल, मात्र फेब्रुवारी, सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

आर्थिक स्थिति:
गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२६ मध्ये तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत असेल. हे वर्ष तुम्हाला धन आणि ऐश्वर्य मिळवून देईल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचे प्रबळ योग आहेत. फेब्रुवारी, मे, जून आणि नोव्हेंबरमध्ये आर्थिक आवक चांगली राहील. तुम्हाला शुक्र आणि बुधाचे पूर्ण सहकार्य मिळेल.

शुभ काळ:
फेब्रुवारी, मार्च ते १३  आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)जुलै आणि १० सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी सर्व दृष्टीने शुभ आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
१५.०२.२०२६

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 117 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..