नवीन लेखन...

ऑफसेट छपाईची प्लेट करण्याच्या पद्धती

एग अल्युमिनियम, गम डीप एच, वॉटर डीप एच, पीएस प्लेटस, सीटीपी इत्यादी पद्धतींनी प्लेट तयार करता येते. ह्यापैकी काही ठिकाणी वॉटर डीप एच ही पद्धत लहान प्लेट्स बनविण्यासाठी वापरतात. बाकी पद्धतींपैकी फक्त पीएस प्लेट्स व सीटीपी आता वर्तमानपत्रात वापरल्या जातात. पीएस प्लेट्स म्हणजे प्री सेंसीटाईज्ड प्लेट्स व सीटीपी म्हणजे कम्प्युटर टू प्लेट्स.

हल्ली अक्षर जुळणीचे काम सगळीकडे संगणकावर होते. संगणकावर प्रथम अक्षरजुळणी करुन त्याची छपाई लेझर प्रिंटरवर करण्याच्या प्रक्रियेला डीटीपी म्हणतात.

डीटीपीमध्ये अक्षरे, मजकूर व पाने जुळविण्याचे काम होते. छायाचित्रांचे स्कॅनिंग होते. डीटीपीमुळे अक्षरांचे आकार लहान मोठे करणे, निरनिराळ्या अक्षरांच्या वळणांचा (फॉंट) उपयोग करणे, तिरपी अक्षरे (इटॅलिक्स) घेणे या गोष्टी सहज करता येतात. या विविध सोयींमुळे अगोदरचे हॉटमेटल तंत्रज्ञान (टाइप मेटलचा वापर) सगळीकडे आता बंद झाला आहे.

संगणकावर तयार केलेल्या पानाची एक प्रत लेझर प्रिंटरवर एका पारदर्शक कागदावर म्हणजे ट्रेसिंग पेपरवर घेतली जाते. तो कागद पीएस प्लेटवर ठराविक वेळ उघडयावर ठेवतात. पीएस प्लेटवर संवेदनशील अशा पॉलिमराइज्ड पदार्थाचा थर दिलेला असतो. मेटल हॅलॉइड किंवा झेनॉन दिव्याने तो कागद प्लेटवर उघडयावर ठेवल्यावर एका रसायनाने धुतात. त्यामुळे प्लेटवरील फक्त प्रतिमेच्या जागेवरील रसायन राहते. बाकी कोऱ्या जागेवरील रसायन निघून जाते. ही कोरी जागा पाणी आकर्षणारी व शाई दूर लोटणारी बनते आणि प्रतिमा असणारी जागा शाई आकर्षणारी आणि पाणी दूर लोटणारी बनते.

सीटीपी या उपकरणातुन संगणकातले पान परस्पर प्लेट बनण्याएवढे परिपूर्ण होते. छपाई कोणत्या रंगात हवी तशा रंगाची शाई टाकीत भरायची असते. रंगीत छपाई असे ज्याला आपण म्हणतो ती निळया, पिवळया, लाल आणि काळया अशा चार रंगात होते.या चार रंगांच्या मिश्रणातून अनेक छटा निर्माण करता येतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..