नवीन लेखन...

ग्रोव्ह्युअर पद्धतीने छपाई

ग्रोव्ह्युअर छपाई पद्धतीत प्रतिमा कोऱ्या जागेपेक्षा खोलगट भागात असते. या खोलगट भागावरून छपाई करण्याच्या पद्धतीला इंटाग्लिओ पद्धत म्हणतात. प्रथम संगणकात प्रतिमा तयार करून एक पॉझिटिव्ह तयार केली जाते. एका तांब्याच्या सिलेंडरभोवती ही पॉझिटिव्ह गुंडाळून उघडयावर ठेवली जाते. […]

छपाईत रंगीत छायाचित्र थोडे हलल्यासारखे का वाटते?

रंगीत चित्र किंवा छायाचित्र हे मूळ चार रंगात छापले जाते. प्रथम छायाचित्र स्कॅनर उपकरणावर लावून ते संगणकावर घेतले जाते. पूर्ण पानातल्या चारपैकी प्रत्येक रंगाचा भाग निरनिराळा केला जातो. उदाहरणार्थ पान क्र. एकवरील लाल शीर्षक, जाहिरातीमधील लाल रंगाचा भाग, एखादे केशरी रंगाचे फूल असेल तर त्यातला पिवळ्या रंगाचा हिस्सा न घेता लाल रंग वगैरीची प्रतिमा, काळया रंगातली प्रामुख्याने मजकुरातली अक्षरे, छायाचित्रातल्या काळ्या रंगाचा हिस्सा घेऊन या प्रमाणे चार रंगाच्या चार प्रतिमा तयार करण्याला रंग विभागणी करणे म्हणतात. […]

ऑफसेट छपाईची प्लेट करण्याच्या पद्धती

एग अल्युमिनियम, गम डीप एच, वॉटर डीप एच, पीएस फ्लेटस,सीटीपी इत्यादी पद्धतींनी फ्लेटस तयार करता येते. ह्यापैकी काही ठिकाणी वॉटर डीप एच ही पद्धत लहान फ्लेट्स बनविण्यासाठी वापरतात. बाकी पद्धतींपैकी फक्त पीएस फ्लेट्स व सीटीपी आता वर्तमानपत्रात वापरल्या जातात. […]

ऑफसेट पद्धतीने छपाई

लिथो पद्धतीने छपाई यशस्वी होऊ लागली पण तिचा वेग अत्यंत कमी होता. साधारण तीन दशकापूर्वीच लिथो छपाई नामशेष झाली. ऑफसेट छपाईत दगडाची जागा जस्ताच्या पत्र्याने घेतली. यंत्राच्या ठरलेल्या आकाराला, ठरलेल्या जाडीचा जस्ताचा पत्रा बसवून त्यावर रासायनिक प्रक्रिया करुन त्याच्या ऑफसेट फ्लेट्स तयार होऊ लागल्या. […]

फ्लेक्सोग्राफीने छपाई कशी होते?

रिलीफ छपाईत आणखी एका छपाई यंत्राचा समावेश होतो. तो म्हणजे फ्लेक्सो. पान किंवा इतर प्रतिमा एका विशिष्ट रबरावर घेऊन ब्लॉकप्रमाणे नायट्रिक अॅसिडची प्रक्रिया केली जाते. हे रबर शीट सिलेंडरभोवती गुंडाळून लेटर प्रेसपद्धतीने छपाई केली जाते. ज्याचे पुनर्मुद्रण करायचे आहे अशा प्रकारची छपाई या पद्धतीने होते. […]

विविध प्रकारच्या मुद्रण यंत्रांचे काम कसे चालते?

फाऊंड्रीमध्ये धातुंचे ओतकाम करताना ज्याप्रमाणे प्रथम पॅटर्न तयार करुन नंतर साचा करतात व त्यातून हजारो नग बनवतात. त्याप्रमाणे जे छापायचे त्याच्या प्रतिमेसाठी माध्यम तयार करुन त्याला छपाई यंत्रावर लावून हजारो प्रती छापता येतात.इतिहासजमा झालेल्या रिलीफ छपाई पद्धतीतील लेटर प्रेसवर चित्रे आणि छायाचित्रांसाठी ब्लॉक्स आणि मजकूरासाठी खिळे वापरत. […]

मुद्रण (छपाई) करण्याचे निरनिराळे प्रकार

आपल्याला जे छापायचे आहे त्याची प्रतिमा प्रथम एका माध्यमावर घ्यावी लागते. ते माध्यम नंतर छपाई यंत्रावर लावून त्यावरुन कागद किंवा इतर गोष्टींवर छपाई होते. नेहमीच्या वापरातील माध्यमे म्हणजे ब्लॉक्स, टाइप, ऑफसेट फ्लेट्स, दगड, क्रिन इत्यादी. माध्यमामुळे छपाईचे तीन प्रकार पडतात. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..