न्याय देवते

कुठे तु गेलीस न्याय देवते,  जगास सोडूनी याच क्षणी
अन्यायाची कशी मिळेल मग,  दाद आम्हाला या जीवनी

परिस्थितीचे पडता फेरे,  गोंधळूनी गेलीस आज खरी
उघड्या नजरे बघत होती,  सत्य लपवितो कुणीतरी

दबाव येता चोहबाजूनी,  मुस्कटदाबी होती कशी
शब्दांना परि ध्वनी न मिळता,  मनी विरताती, येती जशी

बळी कुणाच्या पडली तू गे,  मार्ग रोखीले तुझे कसे ते
अपयश येता सत्यालाही,  म्हणू कसा तूज ‘न्याय देवते’

आज न आले यश जरी,  न्याय येईल उफाळूनी
अंतिम विजय हा सत्याचा,  जाणीव आहे ह्याची मनी

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1590 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…