नवीन लेखन...

प्रयोगशील गायिका नीला भागवत

हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल शैलीतील बंदिशींच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणा-या एक प्रयोगशील गायिका नीला भागवत यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ रोजी पुणे येथे झाला.

कृष्णराव पंडीत व शरच्चंद्र आरोलकर हे त्यांचे गुरु. त्यांची मीराबाई व कबीराच्या भजन गाण्याबद्धल विशेष प्रसिद्ध आहेत. जयपूर आणि ग्वाल्हेर अशा दोन्ही घराण्यांमधली गायकी त्या शिकल्या, ती आत्मसात केली आणि अवलंबलीही, मात्र ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल (खयाल-कल्पना) गायकीमध्ये त्या मनापासून रमल्या. ग्वाल्हेर घराण्यात बोलाला सर्वाधिक महत्त्व आहे. बोलात सगळंच अंतर्भूत असतं, या कल्पनेनं झपाटलेल्या नीला यांनी ख्यालाचा मूळ पिंड कधीच सोडला नाही. त्या व्यवसायाने प्राध्यापक व भाषांतर कार आहेत. आजही पारंपरिक गायिकीसोबतच जीवनातील अनुभव बंदिशींमधून मांडत नवता, प्रयोगशीलताही त्या जपत आहेत. शास्त्रीय रागांसह ‘पियानो’सारख्या पाश्चिमात्य वाद्याबरोबरही त्या जितक्या एकरूप होतात, तितक्याच परदेशी मूकबधिर मुलांना गायन शिकवतानाही होतात.

संत कबीर, मीराबाई, चोखामेळा, संत तुकाराम, महात्मा फुले ते अगदी महात्मा गांधी यांसारख्या संत आणि महापुरुषांच्या विचारांवर, काव्यांवर बंदिशी बांधून त्यांचं सांगीतिक चित्र समाजापुढे मांडत आहेत. आज वयाच्या पंच्याहर्या वर्षीही नीला भागवत यांचा नवनिर्मितीचा, सृजनशीलतेचा उत्साह कायम आहे. त्यांना एसएनडीटी विद्यापीठ आणि वायएमसीए संस्था यांच्यातर्फे ‘कॉन्ट्रिब्युशन टू विमेन्स कल्चर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच
केंद्र सरकारतर्फे संगीतातील संशोधनासाठी मानद शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली आहे.

नीला भागवत यांचे साहित्य.
मोनोग्राफ ऑन कृष्णराव शंकर पंडित (१९९२)
तिहाई (कवितासंग्रह) (१९९२-९३)
कबीर गाता गाता (२००४)
शरच्चंद्र आरोलकर – लेणे प्रतिभेचे (२०१२)

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट https://www.youtube.com/watch?v=0WLgyPkL5dI https://www.youtube.com/watch?v=Ukghy6LIqlA

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..