नाती- गोती कसली

नाती- गोती कसली,?
करती कशी रक्तबंबाळ,
जीव’च नाही, आत्माही,
होती सारेच घायाळ,–!!!

कुठले मित्र,कसले सखे,
कशाशी खातात मित्रत्व,
स्वार्थ भांडणे वाद ,—
एवढीच जगण्याची तत्वं,–!!!

कसली नीती कशाची मत्ता,
एक दुसऱ्याचा गिरवी कित्ता, खरेपणाची बूंजच नसता, असत्याचीच इथे सर्व सत्ता,–!!!

माझी पोळी, तुझेच तूप,
नव्हे, तुझी पोळी तुझेच तूप,
झाले माझेच ते,तू कितीही खप,
तू खोटा, बाप खोटा,जरा जप,–!!

कोणता भाऊ कोण बहीण-?
कोण भार्या,कोण विहीण,
नणंद, जावा, भावजया,
हरेक भासे विषारी नागीण,–!!!

कसले घर अन् कसले घरपण,
परस्परांवर तुटून पडती,
विसरुन आपुले पुरते बालपण,
विसरुन सगळी नाती,–!!!

आखाडाच तो घर कसले,
करुन टाकती त्याचे रणांगण,
पैसा जोडी, पैसा तोडी,
सत्तालोलूप मानव खोडी,
कामना, लालसा, ईर्ष्या
घालती माणुसकीला बेडी,–!!!

हिमगौरी कर्वे.©

Avatar
About हिमगौरी कर्वे 106 Articles
मी मराठी भाषेची शिक्षिका असून मला काव्यलेखनाची खूप आवड आहे. माझा ज्योतिषाचा छंद असून मी व्यावसायिक ज्योतिषीही आहे. अमराठी लोकांना मराठी शिकवणे असे खास काम करत असते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील असतात. बाहेरच्या राज्यातून येणारे अमराठी लोक शिकतात. क्वचित प्रसंगी परदेशी लोकही शिकतात. मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक *काव्यप्रेमी* बाई आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…