नवीन लेखन...

संगीतकार रवि शंकर शर्मा

रवि शंकर शर्मा यांचा जन्म ७ मार्च १९२६ रोजी दिल्ली येथे झाला. ते दिल्लीमध्ये कुचा पातीराम ह्या भागात रहात होते. त्यांचे वाडवडील हरियाणामध्ये रहाणारे होते पुढे ते दिल्लीमध्ये स्थायिक झाले. त्यांच्या आईचे नाव तारावती शर्मा आणि वडिलांचे नाव कन्हय्यालाल शर्मा होते. त्यांचे वडील सर्व्हिस करत होते

त्यावेळी ते वडील मंदिरामध्ये आणि धार्मिक ठिकाणी भजन गात असत. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी कल्कि किर्तन मंडळ हॉलमध्ये पाहिले भजन गायले. ते भजन त्यावेळच्या पुकार या चित्रपटामधले होते, त्या चित्रपटामध्ये ते भजन शीला या गायिकेने गायले होते तर त्याचे संगीत होते मीर साहब यांचे. रवि यांच्या दृष्टीने पाहिले तर त्यांचे वडीलच त्यांचे गुरु होते. त्यांच्यामुळे ते गायला आणि हार्मोनियम वाजवायला शिकले. त्यांनी संगीताचे असे शिक्षण घेतले नाही. खरे तर त्यांना गायक व्हायचे होते. त्यांचे पहिल्यांदा शिक्षण अजमेरी गेट येथील लहान शाळेत झाले. पुढे ते दिल्लीमधील दर्यागंज येथील मोठ्या शाळेत झाले. त्यानंतर ते इलेकट्रीकचे काम शिकले. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी इलेक्ट्रीशियन म्हणून काम करायला सुरवात केली. १९४५ ते १९४५ त्यांनी पोस्ट आणि टेलिग्राफ डिपार्टमेंटमध्ये काम केले. त्यावेळी ते ऑल इंडिया रेडिओमध्ये गाणे गाऊ लागले होते. १९५० मध्ये ते त्यांची पत्नी कांती वर्मा आणि मुलगी वीणा यांना दिल्लीला ठेवून ते मुंबईला आले. त्यावेळी त्यांच्या आईने तिच्या डायरीमध्ये लिहिले होते, ‘ २४.४.५० को रवि बम्बई गया.”

मुंबईला आल्यावर ते मरीन ड्राईव्ह येथील ‘ हिराबाग धर्मशाळेत ‘ राहिले. नंतर कधी गोरेगाव येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर रहात असत तर कधी रात्री दुकान बंद झाल्यावर त्याच्या बाकड्यावर झोपायचे. त्यांनी कोरस मध्ये गायला सुरवात केली. त्यांनी पहिले कोरसमध्ये गाणे एस. डी. बर्मन यांच्या ‘ नौजवान ‘ या चित्रपटामध्ये गायले. पुढे १९५१ मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीला आणि मुलीला मुंबईला बोलवले तेव्हा ते कांदिवली येथे विद्यानिधी बिल्डिंगमध्ये रहात होते. त्यानंतर संगीतकार हेमंतकुमार यांच्या ‘ आनंदमठ ‘ या चित्रटामध्ये ‘ वंदे मातरम् ‘ या गाण्याच्या कोरसमध्ये ते गाणे गायले. त्यानंतर त्यांनी हेमंतकुमार यांच्याकडे कोरसमध्ये गाणी गायला सुरवात केली. हेमंतकुमार यांनी रवि यांना त्यांचे असिस्टंट बनवले. त्यांच्याबरोबर शर्त, सम्राट, जागृती, नागीण अशा अनेक चित्रपटांमध्ये ते त्यांचे असिस्टन्ट म्हणून होते. नागिन या चित्रपटामधील बीनची धून त्यांनी बनवली. ते गाणे होते, “मन डोले. मेरा तन डोले, मेरे दिल का गया करार” त्यानंतर त्यांना स्वतंत्र चित्रपट मिळाला त्या चित्रपटाचे नाव होते ‘वचन.’ ह्या चित्रपटामध्ये त्यांनी दोन गाणी ‘ रवी शंकर ‘ या नावाने लिहिली, एक गाणे त्यांनी आशा भोसले यांच्याबरोबर गायले आणि ते त्या चित्रपटाचे संगीतकारही होते.

त्यानंतर त्यांनी देवेंद्र गोयल यांचे अनेक चित्रपट केले त्यामध्ये वचन, नयी राहे, नरसी भगत, चिराग कहा रोशनी कहा, एक फुल दो माली, दस लाख असे अनेक चित्रपट त्यांनी केले. एक दिवशी ते प्रवासामधून येत असताना एका चित्रपटाच्या संगीताचा विचार करत होते. तो चित्रपट होता, चौदवी का चाँद. त्यांच्या मनात विचार आला की अनेकजण गाण्यामध्ये चित्रपटाच्या ‘ टायटलं ‘ चे नाव टाकतात. त्यांनी फक्त ‘ चौदवी का चाँद ‘ या तीन शब्दांनाच चाल लावली होती. घरी आल्यावर त्यांनी शायर शकील बदायूंनी यांना फोन केला आणि सांगितले मला एक कल्पना सुचली तुम्ही याला का ? शकीलसाहेब त्यांच्या घरी गेले तेव्हा ते म्हणाले गुरुदत्ताजींचे रोमँटिक गाणे आपण ‘ चौदवी का चाँद ‘ पासूनच सुरु केले तर, शकील साहेबानी एक एक सेकंद विचार केला आणि म्हणाले,’ या आफताब हो ‘ त्यालाही रवि यांनी चाल लावली आणि शकीलसाहेबानी पुढील शब्द उच्चारले, ‘ जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो ‘ आणि एक अजरामर गाणे तयार झाले. या गाण्याने रविजीना जगभर प्रसिद्धी मिळाली आणि मद्रासपासून अनेक निर्माते त्यांच्याजवळ चित्रपट घेऊन आले.

बी. आर. चोप्रा यांच्या हमराज, गुमराह, आदमी और इन्सान, धुंद, निकाह, तवायफ, वक्त हे चित्रपट मिळाले. वक्त चित्रपटामधील ‘ ए मेरे जोहराजबी, तुझे मालूम नही, तू अब तक हसी और मै जवा ‘ ही कव्वाली बलराज सहानी यांच्यावर चित्रित केली होती ती खूप गाजली. त्यांनी साहिर लुधयानवी यांच्या ‘ चलो एक बार अजनबी बन जाये हम दोनो ‘ कवितेला चाल लावली आणि हे गीत अजरामर झाले. ते गाणे महेंद्रकपूर यांनी गायले होते. अशी अनेक गाणी संगीतकार रवि यांनी दिली. संगीतकार रवि यांनी सुमारे सोळा मल्याळम चित्रपट केले. त्यामधील दहा ते अकरा चित्रपट सुपर हिट गेले. त्यावेळी केरळमध्ये कुणी ‘ रवि ‘ नावाचे संगीतकार होते म्हणून संगीतकार रवि यांचे ‘ बॉम्बे रवि ‘ म्ह्णून नामकरण झाले. त्यांच्या मल्याळममधील काही चित्रपटांची नावे पंचाग्नि, नक्षथगनल, वैशाली अशी होती. त्यांच्या नक्षथगनल या चित्रपटामधील गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ते गाणे चित्रा या गायिकेने गायले होते.
संगीतकार रवि यांचे सर्वात अधिक चित्रपट ज्युबिली गेले.त्यांनी फार कमी विदेशी वाद्ये त्यांच्या गाण्यात वापरली, त्यांनी गाण्यांच्या शब्दांवर जास्त लक्ष केंद्रित केले होते.

त्यांची काही गाणी अशी होती नीले गगन के तले धरती का प्यार पले, रहा गर्दिशों में हरदम, बाज़ी किसी ने प्यार की जीती या हार दी, आजा तुझको पुकारे मेरा प्यार, इस भरी दुनिया में कोई भी हमारा न हुआ, चौदहवीं का चाँद हो या, आफताब हो, आज मेरे यार की शादी है, बाबुल की दुआएं लेती जा, औलाद वालों फूलो फलो, तेरी आँख का जो इशारा न होता, बार बार देखो हजार बार देखो, देखा है जिंदगी को कुछ इतने करीब से,दिल के अरमां आंसुओं में.

संगीतकार रवि यांना अनेकवेळा भेटता आले. एकदा भगवानदादा बरोबर असताना त्यांच्याशी गप्पा मारण्याचाही योग आला होता.

संगीतकार रवि यांना तीन वेळा राज्य पुरस्कार मिळाले, दोन फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले. त्याचप्रमाणे त्यांना भारत सरकारने पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

संगीतकार रवि यांचे ७ मार्च २०१२ रोजी मुंबईमध्ये ८६ व्या वर्षी निधन झाले.

सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..