नवीन लेखन...

अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी भाभा

अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९  रोजी झाला.

भारतीय संस्कृतीत अनेक मानवतावादी, सुसंस्कृत माणसे तयार झाली. विधायक मनोवृत्ती असलेला एक कुशल इंजिनियर,प्रख्यात शास्त्रज्ञ, कलाप्रेमी व माणूस म्हणून, थोर विचारवंत म्हणून ‘होमी जहागीर भाभा’ यांचे नाव भारतात मोठ्या आदराने व प्रेमाने घेतले जाते. स्वतंत्र भारताला समर्थ व बलवान करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले.

होमी भाभा यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरीस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तीमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते. त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रातच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरींगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली.

वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रीज विद्यापिठातून १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. होमी भाभांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली,तेव्हा मुल कण, नवे सिद्धांत नवे तंत्रे उदयास आली होती. त्यात भाभांनी भर टाकली. अंतराळातून येणाऱ्या विश्वकिरणात समुद्रासपाटीला असलेल्या वातावरणातील कवच फेटून इलेक्ट्रान कसे पोहोचतात आणि विश्वकिरणांचा एवढा मोठा वर्षाव कसा होतो,याचा कॉस्केड थिअरीने करण्यात त्यांना यश मिळविले प्रचंड ऊर्जेच्या इलेक्ट्रोनची पदार्थाशी आंतरक्रिया होताच त्यातून गॉमा किरण बाहेर पडतात. त्या किरणांमुळे इलेक्ट्रोन वा पॉझिट्रौन यांचे विकरण कसे होते, याचा सिद्धांत मांडतांना वेगवान मिझॉन कणांचे आयुर्मान मोजताना अल्बर्ट आईस्टाईच्या सिद्धांतानुसार होणारी कालवृद्धी लक्षात पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले.

त्यांनी अनेक संस्था उभारल्या. तुर्भ,तारापूर अणुशक्ती केंद्रे ही त्यांची खरी स्मारके आहेत. टाटा मुलभूत संशोधन संस्था परमाणु आयोग,ऊर्जा आयोग,अवकाश संशोधन, कॉन्सर संशोधन अशा मानवकल्याणकारी संस्थातून अणुशक्तीचा विधायक कार्यासाठी चांगला उपयोग करता येतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.

भारत सरकारने १९५४ साली ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते. त्यांच्या निधना नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले.

होमी भाभा यांचे २४ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले. आपल्या समुहा कडुन होमी भाभा यांना आदरांजली.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..