नवीन लेखन...

मराठी कवि बबनराव नावडीकर

मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार बबनराव नावडीकर यांचा जन्म १९ ऑगस्ट १९२२ रोजी झाला.

बबनराव नावडीकर यांचे मूळ नाव श्रीधर यशवंत कुलकर्णी. त्यांचे वडीलही कीर्तन करीत. गाण्यासाठी बबनराव दहावीत शिकत असताना कऱ्हाड येथून पळून पुण्यात आले आणि वाराने राहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेत गायन शिक्षक झाले. तेथॆ त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कारसुद्धा मिळाला. पुण्यात आले तेव्हा बबनराव नावडीकर यांना गजानन वाटवे यांच्या गायनाचे फार आकर्षण होते. त्यांना भेटण्याची अनावर इच्छा होती. घर सोडून आलेले नावडीकर एकदा पुण्यात हुजूरपागेवरील फुटपाथवर बसले होते. बाजूला कंपाऊंडची भिंत होती. बबनराव येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे बघत बसले होते. त्यांच्या वडिलांचे- यशवंत नावडीकर यांचे एक मित्र त्या रस्त्याने जात होते. त्यांनी बबनरावांना ओळखले व चौकशी केली. बबनराव म्हणाले, ‘मी घरातून निघून आलो आहे. मला गाणं शिकायचंय.’ त्यांनी बबनरावांना चार-पाच दिवस आपल्या घरी ठेवून घेतले. पुण्यामध्ये हिंडताना एके दिवशी टिळक रोडवरील गोखले बिल्डिंगमध्ये त्यांना गायक गजाननबुवा जोशी हे गुरू भेटले. त्यांच्याकडे नावडीकरांचे संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांची गजाननराव वाटवे यांना भेटण्याची इच्छा मात्र अजून पूर्ण झाली नव्हती. ते गुरूंकडेच राहत होते. तिथे असताना एकदा गजाननराव वाटवे सायकलीवरून जाताना त्यांना दिसले. या भेटीनंतर त्यांचा कार्यक्रम ऐकण्याचाही योग आला. आपले गुरूस्थान हेच आहे हे नावडीकरांना तेव्हा समजून चुकले.

शंकराचार्यांनी त्यांना भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली होती. बालगंधर्वांबरोबर त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे’ म्हणायला सांगितले होते. एकेकाळी पुण्यातील कोणताही लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकां शिवाय होत नसे. बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथपर्यंत पोचलो नसतो’ असे ते म्हणत.

बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. गंधर्वांचे फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले. ‘मी पाहिलेले बालगंधर्व’ हे पुस्तक स्वतः बबनराव यांनी लिहिले आहे. त्याचा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत.

बबनरावांचे सुपुत्र प्रा. विजय नावडीकर व दोन नाती मेधा आणि मुग्धा यांनी त्यांच्या गाण्याचा वारसा स्वरमुग्धा या संस्थेमार्फत गाण्याचे कार्यक्रम करून चालूच ठेवला आहे. ‘रानात सांग कानात’ हा खास बबनराव नावडीकरांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीदिनी होतो. त्यात बबनराव नावडीकरांची आणि त्यांच्या समकालीन गायकांची गाणी सादर केली जातात. बबनरावांचा एक नातू आनंद अरविंद नावडीकर हा सुद्धा बबनरावांचा वसा पुढे चालवीत आहे. गेली अनेक वर्षे अमेरिकेत राहून तेथे गीत रामायणातील पदे, जुनी मराठी हिंदी गीते आणि बबनरावांची भावगीते सादर करीत आहे.

बबनराव नावडीकर यांचे २८ मार्च २००६ रोजी निधन झाले.

त्यांची निवडक गाणी:

https://www.youtube.com/watch?v=W0a1nq5DHi8&index=1&list=PL759C91FA75E7FC08

https://www.youtube.com/watch?v=QHiIWXKDSs8

https://www.youtube.com/playlist?list=PL759C91FA75E7FC08

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..