नवीन लेखन...

मराठा मोर्चा

मराठा मोर्चा सर्व महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे, होणारच, कारण ज्यांच्या मताने गेली चार पाच दशके मराठा सरपंचा पासून मराठा मुख्यमंत्री या राज्याच्या सिंहासनावर बसून शासन करत होते, ते सर्व आज पूर्ण मराठा समाजाला, वेठबिगारी बनवून सत्तेसोबत मालमत्तेची मलई आपल्या ताटात ओढून या अभागी जनतेला देशोधडीला लावण्यास कारणीभूत ठरले हे सूर्यप्रकाशाइतके सत्य उघड झाले.

हे असे का झाले, याचा कानोसा घेतला तर दिसते कि,

मराठा धनदंडग्यांनी अर्थात सत्ताधारी आमदार, खासदार, मंत्री, संत्री, यांनी जवळपास सर्व सहकारी बँका बुडवल्या. याच सहकारी बँकेत अश्या गरीब मराठा लोकांचा पैसा जो त्यांनी काबाड कष्ट करून मिळवला तो ठेवलेला होता, त्यांची नावे सर्वाना माहित आहेत. भाबडेपणाने मराठा लोक आपले भाऊ, आण्णा, तात्या, असे बिरुद लावणारे बँकेचे चेअरमन आपल्या जातीचे आहेत, सर्व डायरेक्टर आपलेच जातभाई आहेत, आपल भल करण्यासाठीच हि बँक त्यांनी सुरु केली, या गोड गैरसमजुतीत राहिले, आणि पैसा घालवून बसले, दोष तरी कुणाला द्यायचा, आपलेच दात आणि आपलेच ओठ. असे चेअरमन, आजही ताठ मानेने एक कोटीच्या गाडीतून फिरतात व वर्षातून दोन तीन वेळा हवापालट करण्यासाठी विदेश वारी करतात, जेव्हा कि त्यांना कारावासाची हवा मिळायला पाहिजे.

महाराष्ट्रातील पन्नास टक्के मराठा आमदार, खासदारांनी त्यात पवार कुटुंब आहेच, आपल्या नातलगांना भरमसाठ कर्जे दिली, आणि बँक बुडवल्या, उदाहरण देऊ का, सुनील केदार ने गरीब जनतेचे 155 कोटी बँक बुडवुन फस्त केले, हे कुणाचे पैसे आहेत, कधी विचार केलात? आपल्या माजी राष्टपती यांनी प्रतिभा महिला बँक बुडवली, चौकशी करा, त्यात कुणाचा पैसा होता, अहो गरीब मराठयांचा होता, कुणी खाल्ला, त्यांच्या भावाने व भाच्याने. का नाही त्यांच्या घरावर मोर्चा काढत? या सर्व कार्यकाळात मराठा मुख्यमंत्री होते, याचा अर्थ काय. म्हणजे या ठेवीदार मराठ्यांची हि दशा कुणी केली, इतर जातींनी नक्कीच नाही, मग सध्याच्या सरकारवर का दबाव आणण्याचा का प्रयत्न करताय? मराठीत याला साप साप ओरडून दोरखंडाला काठीने मारणे म्हणतात. आज सुनील केदार तोंड वर करून फिरतो, निवडणूक लढवतो, आणि हे मराठे आपला माणूस म्हणून त्याला आजही भरगोस मतदान करतात, याला हसावं का रडावं हेच कळत नाही.

उसाला हेच साखर कारखानदार योग्य भाव देत नाहीत, व मराठा शेतकऱ्याची गळचेपी करतात. सर्व सहकारी साखर कारखाने जाणूनबुजून आजारी केले आहेत, हे त्रिवार सत्य असताना पिचलेला मराठा का त्यांना शरण जातो, काय मोहिनी हे लोक करतात हेच समजत नाही? जे प्रायव्हेट साखर कारखाने चालवले जातात ते उसाचा भाव या सहकारी करखान्यांपेक्षा खूप जास्त देऊन सुद्धा नफा दाखवतात, भागधारकांना भरगोस लाभ देतात, मग असा लाभ सहकारी कारखाने का देत नाहीत? दरवर्षी नुकसान का दाखवतात? मला नेहेमी प्रश्न पडतो, हा नुकसानीचा धंदा असूनही हे नेते लोक जीवाचा आटापिटा करून कारखान्याची सत्ता हातात घेण्यासाठी आसुसलेले का असतात. सामान्य माणसे नुकसान होत असेल तर धंदा बंद करतात, मग हे नेते का निवडणूक लढवतात?

आजही आपल्या देशात मारवाडी, सिंधी, गुजराथी, बोहरा मुस्लिम हे स्वतःच्या गरीब जात बांधवाना व्यवसाय करण्यासाठी पैसे गोळा करून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देतात, ते ना आरक्षण मागतात, न भीक मागतात. मराठा समाजातील जे मागासवर्गीय राहिले, त्यांना इतर श्रीमंत मराठयानी वर येण्यासाठी मदत करायला पाहिजे कि नको? तसे हे धनदांडगे का करत नाहीत? तुम्हाला आरक्षण देऊन पोसणे हे सरकारचे काम नाही, हेच या मोर्चे काढणाऱ्याना समजत नाही, इथेच तुमची गफलत होते आहे. लक्ष्यात घ्या फाळणी नंतर सिंधी समाज फक्त अंगावरच्या कपड्यांनी हिंदुस्तानात आला, देशभरात विखुरला, आणि आज अरबो रुपयांच्या संपत्तीचा मालक बनला आहे, तेही फक्त 70 वर्षात. तुमच्याकडे तर गेल्या चारशे वर्षापासून जमिनी आहेत, तुम्हाला सिंधी समाजासारखा घरदार सोडून जावे लागले नाही, मग तरी तुमच्यावर आज आरक्षण मागायची वेळ का यावी? होळकर, शिंदे, गायकवाड उत्तर हिंदुस्तानात काही एकटे गेले नाहीत, त्यांच्यासोबत मोठया संख्येने मराठे स्थलांतरित झाले, त्यांच्यावर अशी वाईट वेळ आलेली दिसत नाही, ते मराठे गुजरात, मध्यप्रदेशात राहतात, पण आरक्षण मागत नाहीत.

आज जो प्रकार चालू आहे त्याला आपली लत्करें वेशीवर टांगणे म्हणतात. यदाकदाचित शिवाजी महाराज आज परत आले आणि त्यांनी हे सर्व पहिले, तर सर्वात प्रथम तुमच्या साहेबांपासून सर्व साखर व शिक्षण सम्राटांना तोफेच्या तोंडी देतील, मग या मोर्चेकऱ्यांचा छडीचे समाचार घेतील, आणि म्हणतील कष्ट करून, घाम गळून पैसा कमवा, आणि तो पैसा सरकारी बँकेत ठेवा. मनगटात जोर असताना भीक का मागता, असे म्हणून दोन फटके जास्त लावतील.

मीही किती स्वप्नाळू, म्हणजे मूर्ख आहे, कि या नासलेल्या जगात महाराज पाय ठेवतील अशी भाबडी आश्या बाळगतोय, अशक्य आहे ते. माफ करा महाराज, मोर्चा असाच सुरु राहूदे, विनाश काले विपरीत बुद्धी यालाच तर म्हणतात.

— अभागी मराठा

फेसबुकवरील पोस्ट 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..