“माणूस”

उजाड  रस्ता, 

मोकळा पण भकास सूर्य 

आणि उध्वस्त दिशा !

वाट नजरेच्या टप्प्यात आहे ,

पण पावलंच नाहीयेत ,

तरीही मला जायचंय

रांगत का होईना  

मला जायचंय..


सगळं वाळवंट आहे.

तप्त उष्ण वाळू,

चटके बसतायत पावलांना,

गिधाडं घिरट्या घालतायत.

पाणी दिसतंय मला ,

पण फक्त डोळ्यातलं.

मला पळायचंय 

वाचवायचंय स्वतःला…


काय सांगतोस ?

तो पण अडकलाय ?

अरे रे, तो ही अडकलाय,

हो मला कळलं

सगळेच अडकलेत.

बंधनात,

नात्यात, 

प्रेमात

आणि व्यवस्थेत!

हळूहळू पोखरतेय ती मला.

कुरतडतेय माझी बोटं,

बधिर करत चाललीये माझी प्रत्येक नस,

जेणेकरून मी विसरेन मला, 

मी विसरेन तुला, 

मी विसरेन माणूसपणाला,

होईन एक प्राणी,

सर्कशीतला एक प्राणी, 

“माणूस” नावाचा!

About जुईली आदेश म्हात्रे 2 Articles
जुईली आदेश म्हात्रे या कवियत्री आहेत. शब्दरांजण (shabdaraanjan.blogspot.in) या ब्लॉगवर त्या लिहितात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…