नवीन लेखन...

लोकनायक….. राज ठाकरे !

 
सामाजिक जाणिव असो अथवा नसो, राजकारणात कोणताही एक नेता दुसऱ्या नेत्याला मात देतच नसतो. मात्र जो लोकांच्या भावना उत्तमप्रकारे जाणून त्यावर परखडपणे बोलणारा उत्तम वक्ता असलेला नेता असतो तो एकाच वेळी अनेक नेत्यांना सहजपणे मात देवू शकतो. सध्या तरी राज ठाकरे यांच्याकडे उत्तम वक्ता असलेला नेता हा किताब कोणीच नाकारू शकत नाही. कारण राज ठाकरे यांची भूमिका कायमच लोकभावना व आधुनिकता यासोबतची आहे. कोणतीही सत्ता नसताना किंवा कोणत्याही प्रकारे सत्तेत सहभागी नसताना राज ठाकरे यांचा दरारा प्रत्येक गावात, शहरांत व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात दिसतो.  त्यांचे विचारच ग्रामीण व शहर या दोन्ही मुलभूत बाजूवर आधारित अाहेत. भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला नक्कीच वाव आहे.  राज ठाकरे यांच्या सारख्या नेत्याचा सध्या महाराष्ट्रातील जनता शोध घेतेय हे मात्र नक्की !  एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला सुद्धा आता फक्त राज ठाकरे यांच्याकडूनच अपेक्षा आहेत, ज्या इतर सर्वसामान्यांना आहेत.
सत्तेच्या राजकारणात निवडणूका या अत्यंत महत्वाच्या असल्या तरी जनमाणसांच्या मनात आपुलकीचं नातं निर्माण करणारा नेता हाच खरा लोकनायक समजला जातो. प्रत्येक राजकीय पक्षाला संघर्ष हा करावाच लागतो. निवडणुकीत जय – पराजय हा नित्याचाच आहे. उतार चढाव हा तर राजकारणाचा स्थायीभावच आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. आणि सध्या अशा संघर्षातून राज ठाकरे नावाचा योद्धा तावून सुलाखून बाहेर पडत आहेत.
जुने मित्र-मैत्री, सोबती, पदाधिकारी, कार्यकर्ता व जनभावनांना सर्वोच्च स्थान देणाऱ्या प्रत्येक नेत्याच्या पदरी सुरूवातीला अपयश हे येतेच. हा इतिहास आहे. मागील काही नेत्यांच्या बाबतीत विचार केला तर ह्या गोष्टी पटतात. परंतु इतक्या होरपळण्यांनंतर देखील त्यावर जो कायम टिच्चून राहतो तोच नेता भविष्यातला खरा किमयागार ठरतो, असे माझे ठाम मत आहे. नाहीतरी सत्ता-पैसा- सत्तापिपासू माणसं जवळ टिकत नाहीत हे राज ठाकरे यांचे खरं संचित आहे. सच्या दिलाच्या राज ठाकरे नावाच्या राजासोबत जे आहेत ते प्रेमाने, आपुलकीने झपाटलेले जिवलग मित्र व त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते !
महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात सध्या राज ठाकरे सारखा दुसरा युवा नेता नाही. राज ठाकरे यांच्याकडे दातृत्वाची, वक्तृत्वाची व नेतृत्वाची जी अखंड शक्ती आहे. ती अपवादानेच सध्याच्या युवा नेत्यांमधे दिसते.  खरा रयतेचा राजा, लोकांचा कैवारी किंवा लोकनायक, लोकनेता होण्याची जी कुवत आहे ती राज ठाकरेंशिवाय इतर कुणातही नाही. कोणत्या तरी एका ज्योतिषाने याआधी सांगितलं आहे त्यानुसार राज ठाकरे यांच्या नेतृत्वाचा आलेख २०१९ नंतर खऱ्या अर्थानं उंचावत जाईल यात शंकाच नाही. परंतु ज्या पद्धतीने राज ठाकरेंची वाटचाल सुरू आहे, लोकांमध्ये जो विश्वास निर्माण झाला आहे, हे पाहता भविष्यात राज ठाकरेंशिवाय महाराष्ट्राला पर्यायच नसेल हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची अवशक्यता नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जो नेता समाजाच्या व्यथा व भावना एका व्यंगचित्रात चपखल रेखाटू शकतो त्याचा समाजाकडे पाहण्याचा डोळस विचार हीच सामान्य जनतेची भावना असते. आणि सध्यातरी राज ठाकरे नावाचं वादळ नव्हे चक्रीवादळ या सर्व कसोटीवर भारी पडते. दुसऱ्याच्या जीवावर मोठे होणारे तर कित्येक आहेत, वडिलोपार्जित ज्यांना मिळालंय त्यावर फुशारक्या मारणारेपण अनेक आहेत, मात्र स्वतःच्या हिमतीवर व कार्यकर्तृत्वावर स्वतःलाच घडवणारे राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत. आणि ही गोष्ट त्यांचे विरोधक पण नाकारु शकत नाहीत.
— डॉ. शांताराम कारंडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..