नवीन लेखन...

या कारणांमुळे महिलांमध्ये वाढतो मधुमेहाचा धोका!

तुम्हाला कदाचित हे ऐकून नवल वाटेल की आजच्या धकाधकीच्या काळात पुरूषांच्या तुलनेत महिलांना मधुमेहाचा धोका अधिक प्रमाणात आहे. हल्लीची जीवनशैली, तणाव आणि लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे हल्लीच्या जवळ जवळ सर्वच वयोगटातल्या महिलांमध्ये मधुमेहाची लक्षणं जास्त आढळून येत आहेत. याच कारणांबाबत अनेक तज्ञांनी आपल्या अहवालात असे नमूद केले आहे की, अनेक महिला आपल्या प्रकृतीपेक्षा आपल्या कुटुंबाच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष देताना आढळून येत आहेत. अशामुळे  घरातील सर्वांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करता करता आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडे मात्र लक्ष द्यायला हल्लीच्या महिलांना वेळ मिळत नाही आहे. याव्यतिरिक्त असेही आढळून आले आहे की अनेक महिला आपल्या वैद्यकीय चाचण्या करत नाहीत. त्यामुळे अनेकदा काही आजारांची लक्षणं लक्षात देखील येत नाहीत.
सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, तसेच सतत कामाचा असलेला ताण यांमुळे अनेक लोक आजच्या काळामध्ये डिप्रेशनमध्ये जगत आहेत. या आजाराचे परिणाम पुरूषांच्या तुलनेत मधुमेहाने पीडित असलेल्या महिलांवर जास्त प्रमाणात होताना तज्ञांना आढळून आलेले आहेत. त्यांनीं केलेल्या अनेक रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, डिप्रेशनमुळे अनेक महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत मधुमेहाचा धोका अधिक वाढल्याचे दिसून आले आहे.
खासकरून प्रेग्नन्सीच्या वेळेस काही महिलांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. अशा महिलांना भविष्यात मधुमेह होण्याचा धोका अधिक पटीने वाढतो. आतापर्यंत तज्ञांच्या झालेल्या अनेक प्रकारच्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, मधुमेहाने पीडित असलेल्या पुरूषांच्या तुलनेत महिलांना हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोका अधिक असतो. सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये अनेक महिलांना पीसीओडीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. एका अभ्यासातून असंही समोर आलं आहे की, पीसीओडीचा त्रास असणाऱ्या महिलांमध्ये मधुमेहाचा धोका अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते.
— संकेत रमेश प्रसादे 
Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..