नवीन लेखन...

कृष्णावळ

Krushnaval

कृष्णावळ – अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द आजकाल कोणीही वापरत नाही.

कृष्णावळ चा अर्थ कांदा ! कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे.

कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात, म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.

कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे.

आणि कांदा पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार  व  पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो.

4 Comments on कृष्णावळ

  1. लेख interesting असला की, त्यावरील विचार थांबत नाहीं.
    हा आणखी एक शब्द : सनावळ ( हा अधिकतर असा वापरला जातो : सनावळी)

  2. नमस्कार.
    आधीच्या प्रतिक्रियेनंतरची माहिती : ही अन्य कांहीं उदाहरणें –
    *जेवणावळ *पत्रावळ *वंशावळ
    *Lodging-Boarding याला रहाणावळ-जेवणावळ असें म्हणतात.
    म्हणजेच हा शब्द : रहाणावळ .
    – सुभाष नाईक

  3. नमस्कार.
    कांद्याबद्दलची मजेदार माहिती. धन्यवाद. श्रीकृष्णाचा संबंधही छान वाटला, उपयुक्तही.
    – परंतु, जोडशब्दामध्ये ‘वलय’ हा शब्द नसेल. वलय शबंद असता तर, जोडशब्द कृष्णवलय = कृष्णवल/(ळ) झाला असता.
    – ती फोड अशी होईल : कृष्ण + अवल. ‘अवल’ म्हणजे अवलि.
    – अवलि म्हणजे रांग. दीपावलि हा शब्द सर्वांच्याच परिचयाचा आहे.
    – खाणावळ म्हणजे खाण्याला (जेवण्यास) बसणार्‍यांची रांग. [ पूर्वी रांगेत पाट मांडून जेवणाच्या पंक्ती ( म्हणजे ओळी) बसत असत, हें सर्वांना माहीत आहेच ]. असाच आणखि एक शब्द : गुंतवळ.
    – तसेंच हें कृष्णावळ.
    – कांद्याच्या प्रत्येक चिरण्यात श्रीकृष्णाची आयुधें दिसतात, म्हणजेच अवलि (रांग) तयार होते, अशा अर्थानें कृष्णावळ हा शब्द वापरत असावेत काय ?
    – मात्र, फोड कांहींही असो, कृष्णावळ शब्दातली गंमत तसूंभरही कमी होत नाहीं.
    – सुभाष नाईक

Leave a Reply to सुभाष स. नाईक Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..