नवीन लेखन...

क्रुरांची भूक

मी कंदिल पेटऊन तो बाकड्यावर ठेवला.
बाबा :- “विश्या जरा कंदिलाचा उजेड कमी कर”
मी उजेड कमी केला आणि आंथरून घेऊन बाहेर गेलो.
बाहेरच्या वरांड्यात अंथरुन टाकून उगाच आकाशाकडे पाहत पडलो, विचार करत होतो की ” या चांदण्यांच्या जंगलात ताई कुठे असेल?, कशी असेल?, ती मला पाहत असेल का? असे अनेक प्रश्न मनात घर करत होते.”
तेवढ्यात बाबा तिथं आलें
मी :- बाबा झोपला नाहीत तुम्ही?
बाबा :- झोप लागत नाही रे!, मग विचार केला जरा तुझ्याशी गप्पा मारल्या तर बर होईल.
मग बाबा माझ्या शेजारी येऊन बसले, माझं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवायला लागले.
पण मी पुन्हा गाढ विचारात गुंतून गेलो, हे पाहून बाबा म्हणाले “काय रे विश्या काय विचार करतोयस, ताई ची आठवण येतेय का?”
मी :- नाही बाबा!
आणि माझ्या डोळ्यांच्या काठेवरून पाणी ओघळल, मी जरा बाजूला सरकलो आणि उशी घेऊन पुन्हा आभाळाकडे पाहू लागलो.
बाबा :- बर! मला सांग विश्या “माणूस मरतो म्हणजे काय होत रे?”
मी थोडा वेळ विचार करून म्हणालो “बाबा तुम्हीच सांगा ना!’
बाबा :- हे बग! देवाला ज्या व्यक्ती आवडतात, ज्या व्यक्ती खूप गोड असतात आणि ज्यांच मूल्य देव जाणतो त्या व्यक्तींना देव स्वतः जवळ घेऊन जातो.
“तुझी ताई शारदा पण देवाला खूप आवडली म्हणून ती पण गेली देवाघरी” आणि हा सृष्टीचा नियम आहे.

मला जाणीव होती की “ताईच्या गेल्याने बाबा स्वतः मधून तुटले आहेत, पण मला आणि स्वतःच्या मनाला समज दयावा, धीर दयावा म्हणून ते अस बोलत आहेत”
पण माझं मन कासाविस व्हायच काही केल्या थांबेना, नराहवत बाबांना म्हणालो
मी :- बाबा एक विचारू?
बाबा :- हो बाळा! बोल ना (बाबांच्या आवाजात भय, भिती आणि न व्यक्त केलेल दुःख जाणवत होतं)

मी :- बाबा “पण ताई देवाघरी तर देवाच्या इच्छेने गेलीच नाही, तिला पाठवलं ना देवाघरी” मग ती देवाची इच्छा कशी काय?
बाबा माझ्याकडे पाहतच राहिले जणू त्यांना काही सुचत नव्हतं.
पण क्षण ओलांडला आणि बाबांच्या डोळ्यातून जणू आभाळ खाली पडल.
बाबा दरवाज्याजवळ जाऊन रडू लागले.
मी पण रडू लागलो!
“कळत नव्हतं की त्यांना धीर दयावा की स्वतःला?”

एका मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्या नंतर तिच्या घरच्यांवर वर दुःखाचा डोंगर कोसळतो आभाळ फाटत.
जणू एकाचा नाही तर पूर्ण परिवाराचा जीव जातो. आणि हे सर्व फक्त काही क्रुरांची भूक भागवण्यासाठी.

हे लेखन काल्पनिक आहे, तरी काही चुकलं तर क्षमा असावी
तुमचं अमूल्य मत नक्की कळवा

— मंगेश कळसे
(पानचींचोली,लातूर) 9689219594

4 Comments on क्रुरांची भूक

  1. हा लेख काल्पनिक जरी असला तरी वास्तवर्शी आहे सर…
    लेख वाचुन डोळ्यांत पाणी आल…
    Sir,
    तुम्ही या काल्पनिक लेखाद्वारे समाजातिल वास्तविक परिस्थितीची जाणीव करुन दिली आहे…

    • धन्यवाद सर आपल्या अमूल्य मतासाठी🙏

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..