जाणून घ्या तांब्याचे आरोग्यदायी फायदे

सध्याच्या धावपळीच्या युगात, विज्ञानाने केलेल्या प्रगतीने आपण खूप सुख सोयींचा उपभोग घेत आहोत. त्याबरोबरच प्रत्येक क्षेत्रातील चढाओढीमुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या चांगल्या सवयींना बगल देऊन नावीन्याच्या मागे लागत आहोत. नवीन बदलांबरोबर आपण जुन्या, चांगल्या गोष्टीचा योग्य मेळ साधणं ही काळाची गरज आहे. पूर्वी आपण जेवणासाठी मातीची, काचेची, स्टील अथवा तांबे, पितळ, अल्युमिनियम इत्यादी अशी धातूंची भांडी सर्रास वापरत होतो. माती, काच किंवा कुठल्याही धातूंची भांडी वापरल्याने त्यातील नैसर्गिक घटकांचा आपल्या शरीराला फायदा मिळतो. आता आपण सर्वच प्लास्टिकच्या आहारी गेलेलो आढळून येतो. सहज मिळणारे, वापरायला सोपे म्हणून घरातील बहुतेक जागा प्लास्टीकच्या वस्तुंनी व्यापलेली आढळून येते. आता सर्वांनाच माहित झालेले आहे की, प्लास्टिक किती पर्यावरणाला पर्यायाने आपल्या शरीराला घातक आहे. प्लास्टिकचा वापर आपण मर्यादित स्वरूपात करणे गरजेचे आहे.

आजकाल आपण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या सर्रास वापरताना आढळून येतो. खरं पाहता, पाणी हे केव्हाही माती, काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यातून पिणे उत्तम ठरते. काचेच्या भांड्यातून पाणी पिण्याने पाण्यामध्ये कुठलाही बदल घडत नाही. मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याने मातीतील गुणधर्म तर मिळतातच, पण त्याबरोबर नैसर्गिकरित्या थंड पाण्याचा आस्वाद घेता येतो, त्यामुळे सर्दी, खोकला अशा विकारापासून सहज दूर राहता येते.

Image result for copper crockery

सर्वात उत्तम पर्याय म्हणजे तांब. तांब ह्या धातूचा वापर पूर्वी आपल्या घरात मोठ्या प्रमाणात होत असे. तांब्याची  सर्व प्रकारची भांडी, तांब्याची पाण्याची टाकी प्रत्येक घरात आवर्जून असायची. काळाच्या ओघात, नवीन बदलांमध्ये तांब्याची भांडी घासणे हे सर्वांनाच डोईजड वाटायाला लागले. सोयीचे पडते म्हणून तांब्याच्या भांड्याना बगल देऊन त्याजागी नवीन, सोयीची वाटणारी प्लास्टिक किंवा तत्सम प्रकारची भांडी वापरत येऊ लागली. सोन, चांदी नंतर तांबे ह्या धातूचा नंबर लागतो. तांबे ह्या धातूमध्ये खूप गुणकारी घटक आहेत ज्याची आपल्या शरीराला आवश्यकता असते.

आज आपण जाणून घेऊयात तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्यामुळे कुठले आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला मिळतात:

१) तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये तांब्याचा अंश उतरल्याने पाण्यातील रोगजंतू मरतात, म्हणूनच तांब्यातील भांड्यातील पाणी पिणे आरोग्यदायी ठरते.

२) तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्यामुळे शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. तांब्यातील खनिजं शरीरातील थायरॉईडग्रंथींचे कार्य सुरळीत पार पडण्यास मदतशीर ठरतात. सहजच थायरॉईड्च्या आजारापासुन आराम मिळण्यास मदत होते.

३) तांब्यामध्ये दाह दूर करण्याची क्षमता असल्याने, संधिवातासारखे आजार बरे होण्यास मदत होते.

४) तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

५) तांब्यामुळे हाडं आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

६) शरीरातील विविध कार्य सुरळीत होण्यासाठी तांब्यामधील घटकांचा उपयोग होतो. शरीरातील नवीन पेशींच्या निर्मितीसाठी तसेच पदार्थातील लोह आणि खनिज शोषून घेण्यासाठी तांब्याची मदत होते. म्हणूनच अ‍ॅनिमिया असणाऱ्या लोकांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे उपयुक्त ठरते कारण तांबे शरीरातील रक्तामधील लोह वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.

७) आजकाल कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याने तांब्यात असलेल्या अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकांचा, कर्करोग  होण्याचे मुख्य कारण असणाऱ्या शरीरातील फ्री-रॅडिकल्सशी सामना करण्यासाठी मदत होऊ शकते. संशोधकाच्या अभ्यासांनुसार तांब्यातील काही घटकांमध्ये कर्करोगाशी लढण्याचे सामर्थ्य असल्याचे निदर्शनास आले आहे.

८) तांब्यामधील घटकांमुळे हृदयरोग व रक्तदाबासारखे आजार आटोक्यात ठेवण्यास मदत होते. तांब्यामुळे कोलेस्ट्रोलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहणारा रक्तपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होते.

९) तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. कारण ह्या पाण्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता असल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

१०) तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे शरीरातील पचनसंस्थेला चालना मिळण्यास मदत होते. तांब्यामध्ये असलेल्या जंतूनाशक गुणधर्मामुळे, पोटातील जिवाणूंचा नाश होण्यास मदत होते तसेच, पोटातील जळजळ होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे पचनक्रियेचा सुरळीत होऊन पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. म्हणूनच पित्त, अल्सर किंवा वरचेवर पोटामध्ये गॅस होणाऱ्यांसाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे अत्यंत उपयुक्त ठरते.

११) तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. तांब्यातील घटक शरीराला आवश्यक असलेला मेद शोषून घेतल्यानंतर चरबी वाढवणारे अनावश्यक मेद शरीराबाहेर बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

१२) तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल असल्याने शरीरातील जखमा भरून काढण्यास मदत होते.

अशा ह्या बहुगुणी तांब्याचा उपयोग आपण नक्की करून घेतला पाहिजे. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊन नक्कीच आपण आपल्या शरीराला विविध फायदे मिळवून देऊ शकतो.

संकेत रमेश प्रसादे
About संकेत रमेश प्रसादे 37 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…