किती घोषणांचा पाऊस होता
माणूस गप्पांनी भिजला होता
अंधारात ज्यांना वाढवले गेले
उजेडापासून त्यांनाच दूर हटवले गेले
ज्यांनी जीवन प्रकाशमान केले
त्यांनाच घरातून दूर केले गेले
ज्यांच्या मनात चोरांची वस्ती होती
परंपरेने त्यांच्याच मंदिरात गर्दी होती
पावले या वाटेवर जितकी पडली
तितकी पायाची जखम भरली
एका मामुली भेटीचा किती अर्थ काढला
किती कथा रचल्या प्रत्येक भेटीला
कोण होते सामील या कटात
किती मुखातील घास पळवले घराघरात
आता या नव्या अंधारात जगा
कालचा शिळा प्रकाश गेला आहे.
~ लक्ष्मीशंकर वाजपेयी
(मूळ हिंदी कविता _ खूब नारे उछाले गए)
मराठी अनुवाद _ विजय नगरकर


Leave a Reply