केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे !

दिनांक १४ ऑगस्ट २०१७ ला दैनिक प्रत्यक्षच्या राष्ट्रगंगेच्या तीरावर मधील सिद्धार्थ नाईक यांचा ‘हरेकाला हजब्बा यांची शाळा’ आणि निशिगंधा खांबे यांनी लिहिलेला लष्करी शिस्तीचे ‘अटूस’ हे दोन्ही लेख खूप आवडले.

कर्नाटकच्या नेवापाडू गावात राहणारे व्यापारी हरेकाला हजब्बा यांचा संत्री विक्रीचा व्यवसाय असतो आणि ते हा व्यवसाय तीस वर्षापासून करत असतात. परंतु एक दिवस संत्री विक्रीचा व्यवहार न झाल्याने त्यांना खूप वाईट आणि वैषम्य वाटते. कारण काय तर त्यांच्या गावात संत्री खरेदी करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांची इंग्रजी भाषा न आल्याने आणि ते काय विचारतात ते न समजल्याने संत्री विक्रीचा व्यवहार होत नाही. आणि हीच सल हजब्बांच्या मनात घर करून बसते. व्यवहार झाला नाही म्हणून तर असतेच पण भविष्यात आपल्या गावातल्या तरुण मुलांवर अशिक्षितपणामुळे आर्थिक व्यवहारात आणि कामात अशी अडचण येऊन नये तसेच शिक्षणाने वंचीत राहण्याची वेळ येऊ नये हेही कारण असतं. यासाठी हरेकाला हजब्बा गावातील मुलांच्या शिक्षणाच्या पूर्तीसाठी गावात महत कष्टाने शाळा सुरु करतात. एवढ्यावरच समाधान न मानता महाविद्यालय उभारण्यासाठी निधी जमवतात. एवढी धडपड का तर गावातील मुलांना अडाणी राहू द्यायचं नाही. त्यांची जिद्द, तळमळ, प्रेम यातून व्यक्त होतं. एखाद्याने यावर विचारही केला नसता पण त्यांची समाजाप्रती असलेली प्रामाणिक बांधिलकी आणि मनातील भाव कुठेही गाजावाजा न करता व्यक्त करण्याची पद्धत खूपच काही सांगून जाते. आज अशी माणसे समजत खूप कमी बघायला मिळतात.

निशिगंधा खांबे यांनी लिहिलेला लष्करी शिस्तीचे ‘अटूस’ लेख एका वेगळ्या कारणासाठी भावाला ते कारणही वेगळे आहे. भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन पाकिस्तानने अनेक वेळा करून भारतात दहशतवादी घुसवाण्यापासून जवानांवर आणि नागरिकांवर उखळी तोफा आणि मोर्टर्सचे भ्याड हल्ले केले आहेत आणि त्यात कित्येक जवानांना हुतात्म्य आले आहे आणि बऱ्याच नागरिकांनां प्राण गमवावे लागले आहेत.

उत्तर प्रदेशातील ‘अटूस’ गावातील दशरथ सिंग २००० सालच्या पाकिस्तानी हल्यात शहीद होतात एवढ कमी की काय म्हणून पाकिस्तानी सैनिकांनी त्यांचा शिरच्छेद करतात आणि त्यावर कडी म्हणजे शवावर स्फोटके लावून ठेवतात. या घटनेला १७ वर्ष उलटून गेली पण या अपमानाचा बदला त्या गावातील लोकांनी अनेकविध हिंसक कारणांनी घेतला असता पण तसे न करता शहीदांचं बलिदान कधीही व्यर्थ जाऊ नये म्हणून गावकरी आपल्या वेगळ्याच कृतीतून सिद्ध करण्याचा प्रयास करतात. आजही या गावाच्या घराघरामध्ये पाकिस्तानविषयी प्रचंड संताप व घृणा पाहायला मिळते. गावातल्या मुलांना लहानपणापासूनच लष्करात भरती होण्यासाठी प्रेरित केलं जातं. त्यांना युद्धाच्या कथा ऐकविल्या जातात. मुख्य म्हणजे लष्कर भरतीसाठी तरुणांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार केलं जातं. या गावात संपूर्ण दारू बंदी आहे. दारू माणसाला शरीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवते आणि हे आपल्या गावासाठी आणि देशासाठी उपयुक्त नाही याची जाणीव गावकर्यांना आहे. दारू प्यायल्यास जबर दंड आणि दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला पंचायतीसमोर कानशिलात लगावली जाते. याचा अर्थ समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे त्याचबरोबर समस्येची उकलही सर्वांना एकत्र करून त्यांच्यातील उणिवांची जाणीव करून देऊन त्या सोडविण्याचा सकारात्मक प्रयत्न होताना दिसतो हेच गावातील मंडळींची एकी, समज आणि समस्येच्या मुळाशी जाऊन सोडविण्याची कल्पकता दिसून येते.

खरोखरच वरील दोन घटनांचा सखोल अभ्यास केल्यास एखाद्या कठीण प्रसंगी किंवा परिस्थितीत आपण आपल्या देशासाठी आणि नागरिकांच्या भल्यासाठी कसे सकारात्मक निणर्य घ्यायचे यातून शिकता येईल. आपल्या देशाला आज अश्याच देशभक्तांची गरज आहे.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..