नवीन लेखन...

“जोजोबा” – “होहोबा”

मानवी जीवनावर बरेच दुरगामी परिणाम करण्याच सामर्थ्य अनेक वनस्पतींनी दाखवून दिलं आहे. भविष्यात वनस्पती खूप महत्वाच्या ठरवणार आहेत हे त्यांच्या सर्वंकष गुणांमुळे दिसून येत आहे. माणसापुरता विचार केला तर अन्न, वस्त्र निवारा, प्राणवायू/ऑक्सिजन या गरजा तर वनस्पतींमुळे पुऱ्या होतातच पण औषधं, पेयं, रंगद्रव्य, अन्नाला चव आणणारे पदार्थ आणि चविपरीची विविधता असणारी फळं, फुलं वनस्पती पासूनच मिळत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बारश्यापासून ते इतर सर्व खाण्याचे पदार्थ बनविण्यासाठी/वापरासाठी पदोपदी वनस्पतीजन्य पदार्थ आपण वापरीत असतो. आज आपल्याला अश्याच एका नवीन वनस्पतीची माहिती बघ्याची आहे.

अतीशुद्ध वंगणतेल मिळविण्यासाठी फार पूर्वी व्हेल माशांची मासेमारी केली जात असे. अती वेगवान यंत्रसामुग्रीत हे खास वंगण वापरीत असत. पण स्पर्मव्हेलची अशीच शिकार चालू राहिली तर ही प्राणीजमातच समुद्रातून नाहीशी होईल म्हणून व्हेलच्या शिकारीवर बंधनं घातली गेली.

वंगणतेलाची गरज पूर्ण होण्यासाठी इतर सजीवांचा शोध घेतला गेला. पण अॅरीझोनाचा दक्षिण भाग, कॅलीफोर्निया अन् वायव्य मेक्सिकोच्या वाळवंटी प्रदेशात स्थानिकलोकं होहोबाचं तेल वापरीत असत, त्याचा परिचय झाला. या झाडाच्या बिया ते भाजून खात असत किंवा पाण्यात घालून उकडून त्यातून तेल वेगळ करीत. या सुवर्णरंगी तेलाचा उपयोग स्वयंपाकात आणि औषधात करणं त्यांना माहित होतं. होहोबाच्या बियात सुमारे पन्नास टक्के तेलाचा अंश असतो. रासायनिकदृष्ट्या हे तेल म्हणजे द्रवरूप मेणच. त्याच्या रेणूरचनेच्या सांगाड्यात असणारी अणूंची साखळी त्याला उच्च तपमान अन् दाबाखाली देखील भक्कमपणा देते. म्हणूनच त्याच विघटन होत नाही. नेमक्या अश्या गुणधर्माच्या नैसर्गिक पदार्थाचा वंगण म्हणून शोध घेणं चालू होतं. वंगणाव्यतिरिक्त मेणबत्त्या, साबण, शांपू, सौंदर्यप्रसाधनं, कापडव्यवसाय, औषधी उद्योग, च्युइंगम, शाई, व्हार्निश, कातडी कमावणे आणि अश्याच इतरही उद्योगात होहोबाच्या सुवर्णतेलाचे उपयुक्त गुणधर्म फायदेशीर आहेत हे संशोधकांच्या निदर्शनास आले. वाळवंटातील सुवर्णतेलाचा जिवंत झरा म्हणजे जोजोबाचे झुडूप.

जगातील अवघ्या संशोधकांचे लक्ष वेधून घेतलं आहे ते जोजोबा किंवा होहोबा झुडुपाने. जेमतेम तीन ते साडेतीन मीटर वाढणारं हे खुरटं वाळवंटी झुडूप उद्याच्या जगात महत्वाच ठरणार आहे. सध्या अमेरिकेतील हजारो हेक्टरच्या वाळवंटी प्रदेशात याची पद्धतशीर लागवड केली जाते. मुख्य म्हणजे जमिनीची धूप त्यामुळे कमी झाल्याचे आढळून आले आहे. समुद्राच्या खारवट जमिनीत किंवा खाजणातही हे झुडूप वाढू शकते.

आपल्याला सध्या भेडसावीत असलेला खारफुटी जंगल तोड प्रश्न सुद्धा मार्गी लावता येईल आणि आपल्या भारताच्या विस्तीर्ण अश्या किनारपट्टीचा, वाळवंटी प्रदेशांचा, दुष्काळग्रस्थ भागांचा, उपयोग होहोबाच्या वनस्पतीच्या लागवडीसाठी केल्याने पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल व प्रदूषणाचे भयावह अनिष्ठ परिणाम कमी केल्याने मानवाची सेवा केल्याचे भाग्य व समाधान सर्वांस लागेल आणि त्याबरोबर आर्थिक प्राप्तीही होईल. अती वेगवान यंत्रसामुग्रीत याच्या पासून मिळणाऱ्या तेलाचा उपयोग वंगण म्हणून करता येईल. तसेच वरील विविध उद्योगांसाठी सुद्धा होईल तो निराळाच.

जगभर चालू असरणाऱ्या नव्या कल्पवृक्षांच्या शोधयात्रेत होहोबाला निश्चित स्थान प्राप्त झालं आहे. आपल्याला वयक्तिक पातळीवर व राष्ट्रीय पातळीवर नियोजकांना, संशोधकांना आणि शास्त्रज्ञांना याचा नक्की विचार करणे गरजेचे आहे. आपण अश्या गोष्टीत मागे पडून चालणार नाही. जैवविविधतेचा शोध घेऊन नवे कल्पवृक्ष शोधणे त्यांची शास्त्रीय तपासणी अन् पडताळणी करणे भविष्यात गरजेचे ठरणार आहे.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..