नवीन लेखन...

जसे कराल तसे भराल

‘जसे कराल तसे भराल ’ हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय-नीती-धर्माने वागत असतो, त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्म अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे, जीवनात मौज-मजा करत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते.

हे सतत पाहिले की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते व वाटते की कर्म सिद्धांत ही एक भ्रामक कल्पना आहे आणि म्हणून आपण ही अनीती अथवा अन्य अधर्माने पैसा मिळवण्यास प्रेरित होतो. परंतु आपला हा फार मोठा गैरसमज आहे. नेहमी पुण्याचे फळ सुख व पापाचे फळ दुःखच असते. असे असता काही वेळा पाप करणारा माणूस आपल्याला सुख-समृद्धीत वावरताना दिसतो, ते त्याच्या सांप्रतच्या पापकर्माचे फळ नसून त्याने पूर्वी त्याने पूर्वी केलेली काही पुण्य कर्मे त्यांच्या संचितात जमा असतात, ती आता परिपक्व होऊन सांप्रत त्याला सुखरूपी फळे देत असतात आणि सध्या तो करीत असलेली पापकर्मे त्याच्या पूर्व पुण्याईचा जोर असल्याकारणाने फळ दिल्याविना त्याच्या संचितात जमा होऊन राहतात आणि पूर्व पुण्याईचा जोर ओसरताच प्रालब्ध बनून त्याच्यासमोर उभी ठाकतात. पूर्व पुण्याईचा जोर असेपर्यंत पाप कर्मे माणसाला आपला प्रभाव दाखवू शकत नाहीत.

संत कबीर म्हणतात

‘ कबीरा तेरा पुण्यका जब तक रहो भंडार ।
तब तक अवगुण माफ है, करो गुनाह हजार ।।

एकदा दोन व्यक्ती रस्त्यावरून जात होत्या. त्यामध्ये एक खूप चालाख तर दुसरा इमानदार होता. चालता-चालता त्यांना रस्त्यामध्ये एक पाकीट पडलेले दिसते. त्याने ते पाकीट उघडून बघितले, त्यात १,०००/- रुपये होते. इमानदार व्यक्ती हे सगळे बघत होता. चालाख व्यक्ती म्हणतो की आपण दोघांनी या पाकीटाला बघितले आहे म्हणून ह्याची अर्धी-अर्धी वाटणी करूया. इमानदार व्यक्ती म्हणतो, ‘ ज्याचे हे पाकीट आहे, कदाचित त्याचा आज वेतनाचा दिवस असेल, घरी जाताना चुकून रस्त्यात पडले असेल. जेव्हा त्याला हे समजेल, बिचारा खूप दुःखी होईल. कदाचित त्याने पोलिसांकडे तक्रार केली असेल. जर त्याला हे पाकीट मिळाले तर तो खूप खुश होईल. किती त्याचे आशीर्वाद मिळतील.’ ह्यावर चालाख व्यक्ती म्हणतो, ‘ बघा बुवा, हे आपल्या नशिबामध्ये होते म्हणून त्याचे पाकीट पडले असेल. नाहीतर आत्तापर्यंत ह्या रस्त्यावरून कितीतरी लोक गेली, त्यांना का नाही हा बटवा दिसला. आपल्या नशिबात होते म्हणून तो आपल्याला दिसला. ह्याला प्रसाद समजून स्वीकार करायला हवे. जर आपण पोलीस स्टेशनला हे जमा केले आणि त्या व्यक्तीच्या नशिबातच नसेल तर पोलीस आपापसात वाटून खातील. त्याला तर मिळणार नाही. आणि असं पण आपण चोरी थोडी केली आहे. आपल्याला तर हे असेच मिळाले. ह्या पाकीटामध्ये त्याचा पत्ता पण नाही, जे आपण त्याला परत करू. म्हणून माझा तर विचार आहे की ह्या पैशांना आपण वाटून घेऊ. जर तुला नसेल घ्यायचे तर मी हे सर्व पैसे घ्यायला तयार आहे.’ इमानदार व्यक्ती बोलतो की ‘ नाही, मला हे पैसे नको.’ चालाख व्यक्ती ते सर्व पैसे आपल्याकडे ठेवतो. जसे दोघ पुढे जातात, इमानदार व्यक्तीच्या पायामध्ये जोरात काटा रुततो. चालाख व्यक्ती लगेच टॉन्ट मारतो, ‘ बघितलं खूप इमानदारीच्या गोष्टी करतोस ना म्हणून तुझ्या पायात काटा रुतला. बेईमानीसे जिओ तो पर्स मिलेगा हाच दुनियेचा हिशोब आहे.’

काही देवता आकाश मार्गाने जात होते. ते हे सर्व काही दृश्य बघतात आणि आपापसात चर्चा करतात की ‘ हे काय चाललंय ? चालाख व्यक्तीला बटवा मिळतो आणि इमानदार व्यक्तीला काटा टोचतो. वाटते की चित्रगुप्ताच्या हिशोबामध्ये काहीतरी गडबड आहे. सगळे जण लगेच ईश्वराकडे जातात आणि सांगतात की आम्ही भूतलावर विचित्र दृश्य बघितले. असे वाटते की चित्रगुप्ताच्या हिशोबामध्ये गडबड आहे. ईश्वर सांगतो की, ‘ चित्रगुप्ताच्या हिशोबामध्ये गडबड होऊच शकत नाही.’ तेव्हा देवता बघितलेले दृश्य ईश्वराला सांगतात. देवतांच्या संतुष्टीसाठी ईश्वर चित्रगुप्ताला बोलावतात आणि दोघांच्या कर्माच्या हिशोबाची वही आणायला सांगतात. जेव्हा दोघांची हिशोब वही बघितली तर असे आढळून येते की आटा जो चालाख व्यक्ती आहे तो पाहिले खूप इमानदार होता आणि त्याच्या इमानदारीच्या फलस्वरूपामध्ये खूप मोठी प्रालब्ध मिळणार होती. त्याने चांगले कर्म केले होते, इतकी इमानदारी होती की त्याच्ये भले मोठे भाग्य प्राप्त होणार होते. पण ते भाग्य प्राप्त होण्याआधी त्याची अंतिम परीक्षा त्याच्यासमोर आली. ह्या परीक्षेमध्ये मात्र त्याचे धैर्य समाप्त होते आणि तिथून त्याच्या जीवनाचा मार्ग बदलतो आणि तो बेईमानीचा रस्ता अवलंबतो. हा चुकीचा रास्ता निवडल्याने ती प्रालब्ध कमी होता-होता इतकी कमी होते की फक्त त्याला १,००० /- रुपये मिळतात. ज्याच्या साठी तो बोलतो की हे मला नशिबाने प्राप्त झाले आहे. आणि जेव्हा इमानदार व्यक्तीचा हिशोब बघितला तेव्हा असे आढळले की तो पाहिले खूप चालाख होता, त्याच्या ह्या कर्मामुळे त्याला मोठ्यात मोठी शिक्षा मिळणार होती. परंतु शिक्षा मिळण्याआधी एकदा सुधारण्याचा लास्ट चान्स त्याला दिला. त्याने तो मोका घेतला. तिथून त्याने आपले जीवन सुधारले आणि खूप सुंदर इमानदारीने जीवन जगणे सुरु केले. त्याची शिक्षा कमी होता होता फक्त एक काटा टोचण्या इतकीचं उरते. त्याला जो काटा टोचला तो त्याच्या इमानदारीचे फळ नसून पूर्वीच्या चालाखीच्या जीवनाची शिक्षा होती. त्याला तेवढीच शिक्षा मिळणे बाकी होते. आणि चालाख व्यक्तीला जे हजार रुपये मिळाले ते त्याच्या बेईमानीचे नाही परंतु इमानदारीने पुण्य जमा होते त्याची प्राप्ती आहे.

या जन्मी न्याय-नीतीने वागणारी कित्येक माणसे दुःख-दारिद्रयात पिचत असताना दिसतात. त्याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे त्यांची पूर्वकृत दुष्कृत्ये आता आपला प्रभाव दाखवीत असतात. त्यांची या जन्मातील सत्कृत्ये कालांतराने या वा पुढील जन्मी त्यांना सुख-सुमृद्धी देणारच यात तिळमात्र ही संदेह नाही कारण कर्म-कायदा हा एकमेव कायदा आहे ज्यात अणू-रेणू त्रुटी नाही, म्हणून प्रत्येकाने वर म्हटल्याप्रमाणे जगात काही तात्कालिक विपरीत असे प्रत्ययाला आले तरी कर्म-सिद्धांत कायद्यावर आपला शंभर टक्के विश्वास ठेवावा आणि निर्धारपूर्वक न्याय-नीतीचा सच्चाईचा राजमार्ग स्वप्नातही सोडू नये.

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..