ईश्वरी इच्छेनेच

वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन  ।

घटना घडल्या जीवनामध्यें,  राही त्यांची आठवण  ।।

चालत असतां पाऊल वाट,  जीवन रेषे वरची  ।

स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा,  भावी आयुष्याची  ।।

परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें,  पुरता गुरफटलो  ।

फिरणाऱ्या त्या  वर्तुळातूनी,  बाहेर येवूं न शकलो  ।।

कल्पिले होते नियतीनें,  तेच घडविले तिनें  ।

भंग पावले स्वप्नचि सारे,  तिच्याच लहरीनें  ।।

असेच घडते जीवनीं सदा,  अघटीत-अवचित  ।

समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा,  स्वीकारी आनंदात  ।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1366 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…