नवीन लेखन...

“इंटरनॅशनल फिल्म” मधील मराठी नक्षत्र

सध्याच्या काळात “डॉक्युमेंट्री” खुपच लोकप्रिय ठरताहेत, कारण म्हणजे ऑफबीट विषयांची केलेली मांडणी! त्यामुळे आशय अगदी प्रभावीरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहचून त्यातून होणारे प्रबोधन सुध्दा महत्त्वाचा भाग ठरतोय. या निमित्ताने नव टॅलेंट समोर येत असून, या कलेकडे नवोदीतांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते आहे. विशेष म्हणजे या डॉक्युमेंट्री मेकींग मध्ये मराठी मुलांचा ओघ वाढत असल्याचं दिसून येतयं. याच विभागामध्ये काहीसे वेगळे म्हणजेच समलिंगी संबंधांवर किंवा LGBT या विषयांवर आधारीत नक्षत्र बागवे या तरुणाने वेधक अश्या प्रकारचे “शॉर्ट फिल्म्स” तसंच डॉक्युमेंट्री बनवून प्रेक्षकांसोबतच समीक्षकांकडून देखील दाद मिळवलीय, त्याची दखल आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामांकीत फिल्ममेकर कडून घेतली जात आहे. इतकचं नाही तर लेखनासोबतच अनेक कलांवर प्रभुत्त्व असलेल्या नक्षत्रसाठी आता “इंटरनॅश्नल फिल्म्स”चे दरवाजे देखील खुले झाले आहेत . त्याच्या “शॉर्ट फिल्म मेकींग” आणि आगामी उपक्रमां विषयीची ही खास बातचीत फक्त मराठीसृष्टी.कॉम वर….

प्रश्न) कलाकार किंवा फिल्ममेकर म्हणून तुझ्या कारकीर्दीची सुरुवात कशी झाली ?

नक्षत्र बागवे – कलाकार म्हणून वयाच्या पाचव्या वर्षापासून! मी तेव्हापासून स्टेजशो करतोय. पण फिल्ममेकर म्हणून सांगायचे तर वयाच्या विसाव्या वार्षापासून आणि ती सुध्दा योगायोगाने सुरुवात झाली. त्याबाबतीत सुध्दा एक मस्त किस्सा आहे, सहज म्हणून मी “फेसबुक डेटींग” वर फिल्म बनवली होती. अगदी प्राथमिक स्तरावरील बनवलेली ती फिल्म होती त्याचे शुट मी स्वत: केले होते, थोडक्यात सांगायचे तर ती शॉर्ट फिल्म “झीरो बजेट”ची होती आणि ती फिल्म मी फेसबुकवरुन रीलीज केली. त्यावेळेला माझ्या मनात एकच इच्छा होती की माझ्या मित्रांनी ती फिल्म पाहावी. आणि ती फिल्म “कशीश फिल्म फेस्टीवल”च्या टीमने पाहिली आणि त्यांना ही फिल्म आवडल्यामुळे मला त्यांच्या कडून विचारणा झाली की आम्ही ही शॉर्ट फिल्म रीलीज करू का ? मी होकार कळवला आणि त्या “शॉर्ट फिल्म”साठी मला “ऑडियन्स चॉइस अॅवॉर्ड” रसुल पोक्कुटींच्या हस्ते मिळाला. दुसरे म्हणजे त्या स्पर्धेतील अनेक शॉर्ट फिल्म्सला माझ्या डॉक्युमेंट्रीने मोठ्या फरकाने इतर प्रोफेशनल शॉर्ट फिल्म्सना कॉम्पीट करुन त्या स्पर्धेत यश संपादन केलेलं, एक आणखीन मला नमुद करावेसे वाटते की अभिनेते अनुपम खेर या फिल्म फेस्टीव्हलच्या “क्लोसिंग सेरिमोनी” ला आलेले आणि या सर्व शॉर्ट फिल्म्स पाहून खुप कौतुक वाटले, आणि लगेचच पन्नास हजार रुपयांची स्पॉन्सरशिप देऊ केली जेणेकरुन नवीन पिढी अधिक जोमाने करु शकतील व नवनव्या शॉर्ट फिल्म्सची निर्मिती करु शकतील तेव्हा पासून आजतागायत ही स्पॉन्सरशिप सुरु एका अर्थी आनंद ही वाटतोय की माझ्यमुळे ही बाब शक्य होऊ शकली!

प्रश्न) पहिली शॉर्ट फिल्मची निर्मिती आणि त्याचं “डायरेक्शन” करतानाचे अनुभव ?

नक्षत्र बागवे – खरं सांगायचे तर ही खुपच “फन प्रोसेस” होती. म्हणजे विषय वेगळा होताच पण फिल्म शुट झाल्यावर एडिटींग, पब्लिशिंग हा सुध्दा छान असा अनुभव होता. प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया ऐकताना आपल्या शॉर्ट फिल्म मध्ये असलेला विषय कसा वेगळा आहे ते कळून आले थोडक्यत, सहज आणि साध्या मांडणीमुळे अनेकांना ती भावली होती. त्यानंतर जे पुरस्कार मिळाले तर तो आनंद काहीसा सुखद धक्का होता हे सुध्दा मला आवर्जुन सांगायला हवं.

प्रश्न) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंट्रीज बनवताना बर्‍याचदा व्यावसायिक गणितं जुळून आणणं कठीण असतं, तर यावेळी उद्भवणार्‍या समस्या कोणत्या ?

नक्षत्र बागवे – मी जेव्हा पाच शॉर्ट फिल्म्स बनवल्या त्या “लेजिबीटी कम्युनिटी” (LGBT COMMUNITY) साठी होत्या तर पैसे कमवणे हा हेतू माझ्या मनात नव्हताच, कारण त्यांवे प्रश्न, त्यांच्या समस्या मला या शॉर्ट फिल्म्सच्या माध्यमातून मांडायच्या होत्या! दुसरं म्हणजे त्या शॉर्ट फॅल्म्स ना बर्‍याच लाईक्स आणि हिट्स मिळणं आणि त्याही पुढे जाऊन फेस्टीव्हलला माझी शॉर्ट फिल्म प्रदर्शित होणं हे देखील माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते, . पण फिल्ममेकर म्हणून मी एक सांगेन की तांत्रिक बाजू, “कास्टींग फॅक्टर” या सर्वात मोठ्या अडचणी असतात. एकतर छायाचित्रणाची बाजू अतिशय प्राथमिक स्तरावरची असल्यामुळे तुमची शॉर्ट फिल्म रिजेक्ट होण्याची शक्याता असते व “टेक्निकल इक्विपमेंट्स”ची कमतरता , तसंच फारसे मानधन मिळत नसल्यामुळे सहजासहजी कुठलेही कलाकार यामध्ये भूमिका करण्यासाठी तयार होत नाहीत. आणि फेस्टीव्हल्स शिवाय युट्युब सारख्या “सोशल व्हिडीओ साईट्स”च्या पलिकडे तुमच्याकडे ते लोकांसमोर मांडण्याचे दुसरं माध्यम नाही; तर या काही प्रमुख अडचणी आहेत शॉर्ट फिल्म्स बनवताना.

प्रश्न) तुझ्या डॉक्युमेंट्रीज मधून “रियालिस्टीक लाईफ” दिसून येते तर या मागचे प्रमुख कारण कोणते ?

नक्षत्र बागवे – याचं कारण म्हणजे विनोदी बाज आणि “फिक्शन बेस्ड सिनेमा” हा कधीही माझ्या व्यक्तीमत्त्वाला भावणारा नव्हता. मला आजूबाजूला घडणार्‍या घडामोडींमध्ये जास्त स्वारस्य असल्यामुळे आणि फक्त निरीक्षण या गुणामुळेच तश्याप्रकारच्या “शॉर्ट फिल्म्स” माझ्या कडून घडत गेल्या.

प्रश्न) मॉडेलिंग, अभिनय आणि दुसर्‍या बाजुला लेखनाची धुरा तू कशी सांभाळली ?

नक्षत्र बागवे – खरं सांगायचे तर मला लहानपणापासूनच निरनिराळ्या कलांची आवड असल्यामुळे, आणि लेखन हा सुध्दा कलेचा आणि फिल्म मधील प्रमुख अंग असल्यमुळे मला त्यासाठी जुळून घेणं भाग होतं; आणि लेखन करतना कठीणता न जाणवणे यामागील आणखीन एक कारण म्हणजे मी “बी.एम.एम” चा विद्यार्थी होतो त्यामध्ये लेखन या विषयाचा समावेश असल्यामुळे मी ते सहज जमुन आणले.

प्रश्न) अभिनयाचे बारकावे तू या आधी कोणाकडून शिकलास?

नक्षत्र बागवे – खरंतर लहानपणापासूनच मी लहान-सहान नाटकांमधून भुमिका करतोय, त्याशिवाय सुक्ष्म निरीक्षण करण्याची वृत्ती माझ्यामाध्ये आहे. एखादी व्यक्तीरेखा साकारयची असेल तर ती व्यक्ती कशी रिअॅक्ट होईल याचा मी बारकाईने विचार करतो. दुसरं म्हणजे ती भूमिका समजुन घेऊन त्याप्रमाणे परफॉर्म करतो. म्हणून विशेष असं शिक्षण किंवा मार्गदर्शन अभिनयासाठी नाही घेतलं.

प्रश्न) या क्षेत्रात गेल्या काही काळापासून तू कार्यरत आहेस, तर यासाठी घरातून कसा पाठिंबा मिळाला ?

नक्षत्र बागवे – खरं सांगायचे तर जेव्हा मला शॉर्ट फिल्मसाठी विविध पुरस्कार मिळाले त्यावेळी घरच्यांना असे वाटले की कॉलेज प्रोजेक्ट मध्ये यश मिळवळल्यामुळे अनेक बक्षीसं मिळत असावीत. पण जेव्हा मी या क्षेत्रात करियर करु पहातोय हे ज्यावेळीस त्यांना समजले तेव्हा काहीशी चल-विचलता त्यांच्या मनात निर्माण झाली होती. कारण इतक्या बेभरवश्यच्या क्षेत्रात कारकीर्द घडवु शकेल का हा ? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते. पण जेव्हा मी माझ्या कामाचे सविस्तर स्वरुप आई-वडिलांना समजून सांगितले आणि कालांतराने मला प्रसिध्दी व उतपन्न मिळू लागले त्यावेळी काही प्रमाणात तरी घरुन विरोध मावळला होता .

प्रश्न) मराठी मध्ये डॉक्युमेंट्रीज यशस्वी ठरत नाही अशी ओरड केली जाते तर या बाबत तुझा “टेक” काय ? आणि मराठी भाषेत तुला कोणत्या विषयावर डॉक्युमेंट्रीज किंवा शॉर्टफिल्म्स बनवायला आवडतील ?

नक्षत्र बागवे – मराठी मध्ये “शॉर्ट फिल्म्स” आणि “डॉक्युमेंट्री”ला मिळणारा अल्प प्रतिसाद हे त्यामागचं प्रमुख कारण आहे.पण मला सामाजिक विषयांवर आधारीत सर्व प्रकारच्या शॉर्ट फिल्म बनवायला आवडतील, ज्यांचा संबंध मानवी भावनेशी आहे. आणि केवळ मराठीच नाही तर कोणत्याही भाषेत करायला आवडेल ज्यामधून प्रेक्षकांचं प्रबोधन होईल. उगाचच कोणती तरी शॉ़र्ट फिल्म बनवून ती यु-ट्युब वरुन मला रिलीज करायची नाही. त्याशिवाय समांतर अश्या पध्दतीच्या चित्रपटांधून भुमिका साकारायच्या आहेत ज्या माझ्या म्हणजेच “LGBT” कम्युनिटी साठी उपयोगाच्या ठरतील.

प्रश्न) आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय स्वरुपाचे चित्रपट तू चित्रपट करतोयस तर काय विषय आहे नेमका ?

नक्षत्र बागवे – सध्या मी ज्या फिल्म करतोय त्या “LGBT” या विषयांभोवती फिरणारी आहे आणि त्यामध्ये माझे लीड कॅरेक्टर आहे “माय सन इज गे” असं त्याचे नाव आहे आणि त्याचे शुट चेन्नईला पूर्ण झाले असून तो रिलीजच्या मार्गावर आहे तसंच या सिनेमा मध्ये माझ्या आईची व्यक्तीरेखा साकारली आहे दक्षिणेतील अनुपमा कुमार या सुप्रसिध्द अभिनेत्री यांनी. या व्यतिरीक्त मी “हार्टस्” या “हॉलीवुड फिल्म” मध्ये भुमिका करतोय, त्याशिवाय एक “रोमॅण्टीक म्युझिकल अल्बम” मध्ये सुध्दा काम सुरु आहे जो लवकरच तुमच्या समोर येईल.

प्रश्न) समांतर आणि व्यावसायिक चित्रपट बनवण्याकडे तुझा कल किती आहे असं तुला वाटतं ?

नक्षत्र बागवे – अभिनेता म्हणून मला दोन्ही प्रकारचे चित्रपट करायला आवडतील ! सध्या मी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय या फिल्म्स मध्ये काम करतोय जे “कम्प्लिट कमर्शियल” आहे पण ते समांतर अश्या प्रकारचा चित्रपट आहे, यामध्ये “मोठी स्टारकास्ट” नाही, पण “सेन्सिबल कथानक” आहे. त्याशिवाय कमर्शियल सिनेमांमधून सुध्दा नक्कीच काम करायला आवडेल. पण व्यक्तीगतरित्या मला समांतर चित्रपट करायला आवडतील याचे कारण म्हणजे मला सतत प्रयोग करण्याची आवड आहे. मी जर चित्रपटांमध्ये प्रयोगशीलता दाखवली नसती तर कदाचित माझ्या चित्रपटांमध्ये तुम्हाला वैविध्य दिसले नसते, आणि मला असे वाटते की यशस्वी अभिनेता आणि फिल्ममेकर होण्यासाठी प्रयोगशीलता खुपच महत्त्वाची आहे, आज त्यामुळेच मला फिल्मच्या ऑफर मिळताहेत, बहुधा समांतर चित्रपटांमुळे हे शक्य होऊ शकले असं माझं मतं आहे !

प्रश्न) एक यशस्वी डॉक्युमेंट्री डायरेक्टर आणि अभिनेता होण्यासाठी, असे कोणते गुण तुझ्यात आहेत ज्यामुळे तुला किर्ती मिळाली ?

नक्षत्र बागवे – मुख्य म्हणजे मी कोणतीही भूमिका साकारताना स्वत:ला कधीही “रेस्ट्रीकट” नाही केलं, ज्या कोणत्या भूमिका मी केल्या तेव्हा मी त्या भूमिकेचा विचार करुन केल्या होत्या. त्याशिवाय बहुतांश भूमिका या “माझ्या कम्युनिटी”साठी केल्यामुळे त्या प्रभावी ठरल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे “शॉर्टफिल्म्स” मधून पैसा कमवणे हे माझे ध्येय नसल्यामुळे मी त्या “फिल्मलेकर पॉइंट ऑफ व्ह्यू” मधून बनवल्यामुळे हे देखील यश मिळण्याचे सर्वात मोठं कारण आहे असं मला वाटतं.

(मुलाखत व संकलन – सागर मालाडकर)

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..