नवीन लेखन...

साबणातील घटकद्रव्य

खेळून आल्यावर साबणाने हात-पाय स्वच्छ धू.’ असं संध्याकाळच्या वेळी प्रत्येक घरात आईचं हे वाक्य ऐकायला मिळतं. अस्वच्छ हात-पाय फक्त पाण्याने स्वच्छ होत नाहीत. त्यासाठी साबण वापरावा लागतो. कसं बरं तयार करतात साबण? अल्कली मोनोकार्बोक्सिलिक आम्ल (फॅटी अॅसिड) यामध्ये अभिक्रिया होऊन साबण आणि ग्लिसरीन तयार होतं. साबण तयार करण्याच्या प्रक्रियेला ‘साबणीकरण’ म्हणतात. सोडियम क्षार आणि असलेल्या अल्कलीमुळेसाबणाला कडकपणा येतो तर पोटॅशिअम क्षार असलेल्या अल्कलीपासून मृदू साबण तयार होतो. पोटॅशिअम साबण सोडिअम साबणापेक्षा अधिक पाण्यात विरघळतात. फॅटी अॅसिड म्हणून खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, पाम तेल अशा विविध तेलांचा वापर केला जातो.

अठराव्या शतकापर्यंत साबण घरगुती पातळीवर तयार करीत असत. त्यासाठी प्राण्यांपासून मिळणारी चरबी, ग्रीझ किंवा तेल म्हणजेच फॅटी अॅसिड, मीठ आणि राख याचा वापर केला जात असे. राखेत पोटॅशिअम कार्बोनेट असतं. अल्कली कार्बोनेटचं दाहक सोड्यात रूपांतर करण्यासाठी भिजवलेला चुना वापरत असत. १७९१ मध्ये मिठापासून धुण्याचा सोडा (सोडियम कार्बोनेट) तयार करण्याच्या स्वस्त पद्धतीचा शोध लागला. साबणीकरणात तयार होणारं ग्लिसरीन वेगळं करता येऊ लागल्यावर साबणनिर्मितीचा खर्च कमी झाला. साबण स्वस्त झाला, त्याचा वापर वाढला आणि साबणनिर्मितीचं उद्योगात परिवर्तन झालं.

साबणाची प्रक्षालनक्षमता (मळ वेगळं करण्याची क्षमता) वाढवण्यासाठी सोडियम सिलिकेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम पर्बोरेट यांसारख्या अल्कलींचा वापर केला जातो. पाणी मृदू करण्यासाठी पाण्यात विरघळणारं एथिलीन डाय-अमाइन टेट्रा-अॅसिटिक आम्ल (EDTA)nवापरलं जातं.

काही अपघर्षकांचा (घासून पृष्ठभाग स्वच्छ करणारा पदार्थ) वापरही साबणात करतात. साबण आकर्षक करण्यासाठी त्यात रंगद्रव्यं आणि सुगंधित द्रव्यंही वापरतात. साबणात घातलेले रंग व वास एकजीव होऊन साबण घट्ट व्हावा म्हणून काही वेळा त्यात पॉलिथिलीन ग्लुकॉल्स ही रसायनं घातली जातात.

अनघा वक्टे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..