नवीन लेखन...

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Infertility in women from the perspective of ayurveda

• टॉर्च – (TORCH); आय.जी.जी. व आय.जी.एम.
विशिष्ट रोगांच्या समुच्चयाला टॉर्च संज्ञा दिली आहे. ह्या अंतर्गत खालील रोगांचा अंतर्भाव आहे –
T – TOXOPLASMOSIS
O – Other infections (Syphilis, Varicella Zoster, Parvovirus B-19, Listerosis & Coxsackie Virus)
R – RUBELLA
C – CYTOMEGALOVIRUS
H – HERPES SIMPLEX VIRUS – 2
मानवी शरीरातल्या अति महत्वाच्या यंत्रणा, रचना किंवा अवयव यांचे संरक्षण करण्यासाठी शरीराची स्वतंत्र यंत्रणा सतत राबत असते. त्या यंत्रणेचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी प्लासेन्टल बॅरियर हा एक उंबरठा आहे. गर्भाचे पोषण मातेच्या रक्तापासून होत असते. त्यामुळे मातेच्या रक्तात काही दोष असले तर त्याचा परिणाम गर्भावर होऊ नये म्हणून हे बॅरियर गर्भ रक्षणाचे काम करते. परंतु काही जीवाणू किंवा विषारी द्रव्य ह्या बॅरियर मधून पण पार होतात. त्यामुळे गर्भस्राव, गर्भपात, मृतगर्भ किंवा व्यंग असलेला गर्भ उत्पन्न होतो. हा विषय आधुनिक वैद्यक शास्त्रात TORCH म्हणून वर्णन केलेला आहे. गेल्या काही वर्षात टॉर्च इन्फेक्शन बद्दल बरीच चर्चा होतांना दिसते. त्याबद्दल थोडी पण महत्वाची माहिती असणे आवश्यक आहे.

संसर्गामुळे शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली कार्यान्वित होते व त्या त्या जंतूंच्या विरोधात प्रतिद्रव्ये (Antibodies) निर्माण होतात. ह्या प्रतिद्रव्यांचे मापन करून टॉर्च संसर्गाचे सामर्थ्य किती आहे हे ठरविता येते. ही प्रतिद्रव्ये दोन प्रकारची असतात, आय.जी.जी. व आय.जी.एम. भूतकाळात झालेल्या संसर्गामुळे आय.जी.जी. प्रकारची प्रतिद्रव्ये रक्तात आढळतात तर नजीकच्या काळात झालेल्या आशुकारी संसर्गामुळे आय.जी.एम. प्रकारची प्रतिद्रव्ये रक्तात आढळतात. आय.जी.जी. प्रतिद्रव्ये आढळणे हे स्त्री स्वास्थ्याच्या दृष्टीने अनुकूल असते कारण त्या जंतूंच्या संसर्गाची भीती गर्भावस्थेत उरत नाही. ह्याउलट आय.जी.एम. प्रकारची प्रतिद्रव्ये रक्तात आढळली तर त्याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते. आय.जी.एम. हे नुकत्याच झालेल्या संसर्गाचे द्योतक आहे व हे सूक्ष्म जंतु गर्भपोषणास अपाय करू शकतात. अयोग्य वाढ झाल्याने असा गर्भ मातेच्या उदरात टिकून रहात नाही. त्यामुळे गर्भस्राव, गर्भपात किंवा अकाली प्रसव होण्याची भीती राहते.

• गर्भधारणक्षमता खालावणे (AMH) –
अॅंटिम्युलेरियन हॉर्मोन चे प्रमाण बीजकोशाची प्रजनन क्षमता दर्शविते. पेशीविघातक परमाणुंच्या (Free radicals) आघातामुळे व वाढत्या वयामुळे हे प्रमाण खालावत जाते. १.० नॅनोग्रॅम/मि.ली. हे प्रमाण गर्भधारणेसाठी उत्तम समजले जाते. ०.७ ते ०.९ हे मध्यम व त्यापेक्षा कमी असणे हीन समजले जाते. PCOS विकारात मात्र हे प्रमाण विकृत स्वरुपात वाढलेले दिसते.

• बीजवाहिनी अंतर्गत गर्भधारणा (Ectopic pregnancy) –
स्त्रीबीज व शुक्रबीजाचे मिलन बीजवाहिनीत झाल्यावर अंडकोष (Zygote) फलित होतो. पुढे साधारणतः ८ ते १० दिवसांनी गर्भाशयात तो स्थानापन्न होतो. इस्ट्रोजेनमुळे बीजवाहिनीत ओलावा किंवा स्निग्धपणा येऊन ही क्रिया घडते. हे स्राव कमी प्रमाणात स्रावित झाले तर बीजवाहिनीत हा अंडकोष अडकून राहतो व बीजवाहिनी अंतर्गत गर्भधारणा होते.

• शल्यकर्माची विपरीत परिणिती (Postsurgical complication) –
वंक्षण किंवा उदराच्या अधोभागातील शल्यकर्मामुळे त्या ठिकाणी तंतुमय पेशी (Adhesions) उत्पन्न होतात. ह्यामुळे गर्भाशय व बीजवाहिनींवर दबाव वाढतो जो प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

• सहज विकार (Congenital Defects) –
क्वचित प्रसंगी गर्भाशय व इतर प्रजनन यंत्रणेची निर्मिती होत नाही, गर्भाशय मुख सुईप्रमाणे अतिशय लहान असते, गर्भाशयात पटल असते, गर्भाशये दोन असतात, पुरेशी वाढ होत नाही. अशा विकारांचे परिणाम वंध्यत्वास कारणीभूत होतात.

रोगनिदाना साठी काही प्रमुख चाचण्या :

सर्व्हायकल म्युकस टेस्ट – ह्यात गर्भाशयमुखाचा स्राव घेऊन परीक्षण करतात. हा स्राव इस्ट्रोजेन संप्रेरकाच्या प्रभावाने होत असतो. स्त्रीबीज परिपक्व झाले की हा स्राव हलका पिवळसर रंगाचा होतो व तसे न झाल्यास हा स्राव घट्ट व चिकट राहतो. स्राव घट्ट असता शुक्रबीज गर्भाशयात सहजतेने जाऊ शकत नाही. अशा वेळी गर्भधारणा होत नाही.

ट्यूबल पेटन्सी – बीजकोषात तयार झालेले स्त्रीबीज बीजवहन नलिकेत येऊन थांबते. त्याठिकाणी शुक्रबीज येऊन शुक्र आणि स्त्रीबीजाचे मीलन होते. त्याकरिता ह्या बिजवाहिनीचा मार्ग मोकळा असावा लागतो. मार्गात अडथळा असेल तर हे मीलन न झाल्याने गर्भधारणा होत नाही. ही नलिका तपासण्यासाठी काही पद्धती आहेत.

१. हिस्टोसालपिंजोग्राफी. ह्यात क्षकिरण यंत्राखाली रुग्णेला झोपविले जाते. क्षकिरण अपारदर्शक (X-ray opaque) द्रव्य गर्भाशयात प्रविष्ट करून ते बीजवाहिनीतून जाते किंवा नाही हे पाहिले जाते.

२. लॅप्रोस्कोपी – बेंबीजवळ लहानसा छेद करून सूक्ष्म दुर्बीण आत घातली जाते. गर्भाशय, बीजवाहिन्या आणि आसपासचे संपूर्ण भाग व त्यातील दोष ह्यातून स्पष्ट दिसतात व त्यांची चिकित्सा ह्याच दुर्बिणीच्या सहाय्याने करता येतो.

सोनोग्राफी – सोनोग्राफीच्या सहाय्याने गर्भधारणेसाठी योग्य काळ अगदी अचूकपणे कळू शकतो. बीजाची वाढ, परिपक्वता योग्यप्रकारे होते किंवा नाही हे स्पष्टपणे दिसते. गर्भाशय शोथ, एन्डोमेट्रिओसिस, बीजवाहिनी शोथ असल्यास तेही स्पष्ट दिसतात.

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदीय चिकित्सा सूत्रांचा संकलित विचार

वंध्यत्व आणि गर्भावस्थेतील समस्यांचे आधुनिक वैद्यक शास्त्रात केलेले वर्णन PCOS, PID, AMH, Endometriosis, TORCH, Ectopic pregnancy अशा निरनिराळ्या पारिभाषिक संज्ञा वापरून केले आहे. काळ व भाषेच्या भिन्नतेमुळे आयुर्वेदात ह्या परिभाषा नाहीत. तरीही हे सर्व रोग, लक्षणे आणि उपद्रव आयुर्वेदोक्त “ऋतु, क्षेत्र, अम्बु, बीज” ह्या चौकटीतच चपखल बसल्याचे आपल्या लक्षात येईल. स्त्रीरोग, वंध्यत्व, दहा महिन्यांच्या गर्भावस्थेतील प्रत्येक टप्प्यात होणारे बदल, गर्भ व गर्भिणीची पोषक घटकांची नेमकी गरज ओळखून त्या त्या अवस्थेची चोख भरपाई करणारे कल्प सादर करणारे आयुर्वेद हे जगातील एकमेव वैद्यक शास्त्र आहे.

आयुर्वेदात वर्णन केलेला चिकित्सा क्रम आणि कल्प ह्यावर नक्कीच लाभदायक ठरतात.

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

1 Comment on स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..