नवीन लेखन...

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Infertility in Men - From the Perspective of Ayurveda

प्रजांकुर व अश्वमाह – शुक्रबीज निर्मिती, स्वास्थ्य व गर्भस्थापनेसाठी दोन परिपूर्ण पाठ

गेल्या २५ वर्षांपासून अक्षय उद्योग समूह आयुर्वेद व आरोग्य क्षेत्रात विक्रमी वाटचाल करीत आहे. वनौषधींची लागवड, आयुर्वेदीय औषधांची निर्मिती, विपणन, आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रकाशन, संशोधन व विकास अशा अनेक लोकोत्तर कार्यात मनाचे स्थान मिळविले आहे. वैद्यकीय, औषधनिर्मिती शास्त्र, कायदा, अर्थकारण अशा विविध क्षेत्रातील व्यासंगी तज्ञ ह्या उपक्रमात सहभागी आहेत.

पुरुष वंध्यत्व निवारणार्थ विविध शारीरिक व मानसिक भावांचा विचार करीत, औषधी घटकांचा सखोल अभ्यास करून पुरुषबीज समृद्धीसाठी अक्षय उद्योग समूहाने ‘प्रजांकुर नस्य’ व ‘अश्वमाह’ नावाची दोन अभिनव उत्पादने सादर केली आहेत. ह्यातील प्रत्येक औषधी द्रव्याच्या कार्मुकतेबद्दल आधुनिक वैद्यक शास्त्रात उपलब्ध झालेल्या संशोधनाचे सारांश स्वरुपात संदर्भ देऊन विषयाला परिपूर्णता दिली आहे.

प्रजांकुर नस्य चिकित्सा – विश्लेषण:

 मानवी शरीरात टेस्टोस्टेरॉन नामक संप्रेरक (हॉर्मोन) उत्पन्न होते. हे मुख्यतः वृषणकोषातून व अल्प प्रमाणात स्त्रियांच्या बीजकोशातून स्रावित होते. थोड्या प्रमाणात अॅड्रिनल ग्रंथीमधूनही ह्याची निर्मिती होते. हे एक धातुपोषक असे संप्रेरक आहे.

पुरुषांमध्ये प्रजनन यंत्रणा, वृषणग्रंथी, पौरुष ग्रंथी, मांसपोषण, अस्थिपोषण, जांघेतील ब खाकेतील केस, दाढी-मिशा ह्या सर्व बदलांमध्ये टेस्टोस्टेरॉन महत्वाची भूमिका बजावते. ह्याशिवाय अस्थिधातूचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरोसिस) काबूत ठेवण्यास हे हॉर्मोन समर्थ आहे.

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण स्त्रियांपेक्षा ७ ते ८ पट अधिक असते. पुरुषांमध्ये चयापचयात त्याचा अधिक वापर होत असल्याने निर्मितीची क्षमता सुमारे २० पट अधिक अशी निसर्गाने प्रदान केली आहे. ह्याची निर्मिती पियुशिका (पिट्युटरी) ग्रंथीच्या अधिपत्याखाली होते. ह्यातून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (FSH) व ल्युटिनायझिंग हॉर्मोन (LH) अशी दोन संप्रेरके उत्पन्न होतात.  ल्युटिनायझिंग हॉर्मोनमुळे टेस्टोस्टेरॉन निर्मितीस प्रेरणा मिळते तर दोहोंच्या एकत्रित प्रभावाने शुक्रबीज निर्मिती होते.

पुरुष वंध्यत्वाची चिकित्सा करतांना पियुशिका ग्रंथी आणि वृषणग्रंथी अशा दोन्ही स्तरांवर विचार करणे आवश्यक आहे. वृषणग्रंथी दोषांमध्ये गालगुंड (Mumps), व्हेरिकोसील, अनडिसेंडेड टेस्टीज, वृषणग्रंथी शोथ, हायड्रोसील, इपिडायडेमिस (शुक्रवहन नलिका) शोथ अशा विकारांचा समावेश होतो. त्यानुसार त्या त्या विकाराची चिकित्सा करावी लागते. पियुशिका ग्रंथीमध्ये दोष असेल तर त्याची चिकित्सा ‘नस्य’ रूपाने करता येते. रुग्णाच्या रक्ततपासणीतून टेस्टोस्टेरॉन मापन करता येते. ह्याची किमान पातळी ३०० ते १००० नॅनोग्राम प्रति डेसिलिटर एवढी असणे आवश्यक आहे. ही पातळी कमी असल्याचे आढळले तर पियुशिका ग्रंथीच्या चाचण्या करणे आवश्यक ठरते. ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे पियुशिका ग्रंथीच्या प्रभावाखाली सर्व प्रजनन यंत्रणा केंद्रित असते. म्हणूनच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नस्याचा उपयोग प्रजनन यंत्रणेवर हमखास लाभदायक ठरेल असा निष्कर्ष काढता येतो.

आधुनिक वैद्यक शास्त्रात टेस्टोस्टेरॉनची जेल स्वरुपात नासामार्गे चिकित्सालयीन चाचणी (Clinical Trial) घेण्यात आली. ह्या चाचणीत ३०६ रुग्णांवर ह्याचा प्रयोग केला. ३०० नॅनोग्राम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी असलेल्या रुग्णांवर ३ महिने रोज २ वेळा हे द्रव्य नस्य स्वरुपात प्रविष्ट करून त्यांच्या टेस्टोस्टेरॉन पातळीचे मापन केले असता ९०% रुग्णांची टेस्टोस्टेरॉन पातळी विहित प्रमाणात वाढली. ह्यावरून गर्भस्थापनेत नस्याचे महत्व सिद्ध होते.

वंध्यत्व व गर्भस्थापनेत नस्याची अशी उपयुक्तता आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी जाणली व उपयुक्त वनस्पतींचे पाठ ग्रंथात विषद केले आहेत. त्यांना नव्याने अभ्यासून व शास्त्राच्या चौकटीत बसवून “प्रजांकुर नस्य” म्हणून अक्षय उद्योग समूहाने सादर केले आहे.

चरक संहिता ह्या आद्य ग्रंथात महर्षी चरकाचार्यांनी काही विशिष्ट वनस्पतींचे वर्गीकरण गर्भस्थापक औषधी म्हणून केले आहे. ह्याचे समर्थन कश्यप संहिता, सुश्रुत संहिता अशा ग्रंथातही नमूद आहे. औषधी गर्भसंस्कारांचा आधार ग्रंथ “अष्टांगहृदय” ह्यामध्ये महर्षी वाग्भट ह्यांनी देखील त्याचे समर्थन करून औषध सेवनाचे विविध मार्ग व स्वरूप सांगितले आहे.ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याsमोघाsव्यथाशिवाsरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दाशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति l  . . . . . . . चरक, सूत्रस्थान ४/१८ (४९)

लक्ष्मणादिनस्यदानं गर्भस्थापनार्थं, स्थितगर्भायाश्चमासत्रयाल्पान्तरे पुत्रापत्यजननार्थं नस्यदानमिति ll

. . . . . . . सुश्रुत, शारीर २-३२

चरक संहिता वर्णित वनस्पतींचा सुयोग्य वापर करून अक्षय फार्मा रेमेडीजने सिद्ध घृत स्वरुपात “प्रजांकुर” नावाने सादर केले आहे. ह्याचा वापर नस्य स्वरुपात गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भधारणा निश्चिती पर्यंत करावयाचा आहे.

नस्याचे लाभ –

ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याऽमोघाऽव्यथाशिवाऽरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति   . . . .  चरक  सूत्रस्थान ४/१८ (४९)

ततः प्रजास्थापनाख्या दशौषधीः शिरसा दक्षिणेन च पाणिना धारयेत्। एताभिश्च सिद्धं पयो घृतं वा पिबेत्।

. . . . अष्टांगसंग्रह शारीर १ – ६२

“पिण्यासाठी व शिरोभागी धारण करण्यासाठी” सदर पाठाचा वापर करावा असा शास्त्रादेश आहे. शिरोभागी धारण करणे म्हणजेच ‘नस्य स्वरुपात वापर करणे’ असा अर्थ येथे शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. “नासाहि शिरसो द्वारं” ह्या प्रस्थापित संकल्पनेनुसार व आधुनिक वैद्यकानुसारही नस्य हे प्रजनन संस्थेवर उत्तम कार्य करते. म्हणून ‘प्रजांकुर घृत’ नस्य रूपानेही प्रभावी ठरते. शास्त्राधार व आप्तवचन ह्या दोन्ही दृष्टिकोनातून ह्याचा वापर नस्य स्वरुपात करणे योग्यच आहे. काही द्रव्यांचे शोषण नाकाच्या मार्गाने त्वरित होते. हीच द्रव्ये पोटात घेतल्याने त्यावर अनेक पाचक स्रावांची क्रिया घडते व ‘ब्लड ब्रेन बॅरियर’ यंत्रणेमुळे कार्यकारी घटकांचे शोषण शिरोभागात होण्यास अडथळे निर्माण होतात. नाकाच्या श्लेष्मल स्तरातून ही द्रव्ये मेंदूच्या संपर्कात येतात व रसरक्तातही त्यांचे शोषण त्वरित होते. सुमारे १५ ते ३० मिनिटांत नाकातून प्रविष्ट केलेले द्रव्य रक्तसंवहनात पसरते असे सिद्ध झाले आहे. इंजेक्शन द्वारा दिल्या गेलेल्या औषधाइतक्याच कमी वेळात ह्याचा परिणाम होतो असे संदर्भही मिळतात.

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

1 Comment on पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..