नवीन लेखन...

इन्फंट्री डे

२६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरचे तत्कालीन महाराज हरी सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणाच्या करारनाम्यावर सही केली खरी पण त्याआधीच पाक पुरस्कृत टोळीवाले श्रीनगरच्या दिशेने कूच करून येत होते आणि ते उरी पर्यंत पोचले देखील होते.

पाकिस्तानी सैन्याने ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच “ऑपरेशन गुलमर्ग” या नावाने कारवाई चालू केली होती. या कारवाईत त्यांनी टोळीवाल्यांना आणि लुटारूंना हाताशी धरले होते. या टोळीवाल्यांनी काश्मीरमध्ये नुसता उच्छाद मांडला होता. महाराज हरिसिंगांनी या कृत्याचा निषेध नोंदवला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आणि बघता-बघता पाकिस्तानी सैन्याने २० ऑक्टोबर १९४७ ला या टोळीवाल्यांची बाजू घेऊन काश्मीरवर हल्लाबोल केला.

जवळपास पाच हजार पाक पुरस्कृत टोळीवाल्यांनी अबोटाबाद मार्गे काश्मीर खोऱ्यावर आक्रमण केले. तो दिवस होता २२ ऑक्टोबर १९४७.

२६ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणावर महाराज हरिसिंगांनी स्वाक्षरी केली आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जाहीर केले. याच दिवशी भारताने काश्मीरवर झालेल्या हल्ल्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास मान्यता दिली.

भल्या पहाटे २७ ऑक्टोबर १९४७ साली, फस्ट शीख बटालीयन नवी दिल्लीहून श्रीनगरला विमानाने आणून उतरवले होते. हे सगळं कशासाठी तर, काश्मीर मध्ये घुसलेल्या, पाक पुरस्कृत टोळीवाल्यांना आणि घुसखोरांना हुसकावून लावायला!! ही संपूर्ण लष्करी कारवाई आपल्या सैनिकांनी (फक्त पायदळाने) चोख पार पाडली!! आपल्या सैन्याला दिल्लीमधून श्रीनगरला विमानाने आणण्याची जबाबदारी त्यावेळेसचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वैमानिकांवर टाकली. त्या काळात, आपल्या देशात अनेक लहान खाजगी विमान कंपन्या होत्या आणि या कंपन्यांवर त्यांच्या विमानांमधून लष्कर, त्यांची शस्त्र आणि अन्नसाठा श्रीनगरला पोचवण्याचे काम सोपवले होते. या नागरी वैमानिकांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला!! आणि श्रीनगरच्या तोकड्या धावपट्टीवर विमानं उतरवून सैनिकांची ने-आण केली. जगामध्ये कोणालाही अशक्य असा हा प्रयोग आपल्या वैमानिकांनी यशस्वी करून दाखवला!! या फस्ट शीख बटालीयनने पराक्रमाची पराकाष्ठा करत श्रीनगर आणि परिसर वाचवला!!!

आपल्या सैनिकांनी पराक्रम गाजवलेल्या या दिवसाला तेव्हापासून इन्फंट्री डे म्हणून ओळखले जाते. या दिवसाचं अजून एक महत्व म्हणजे आपण एक स्वतंत्र देश म्हणून आपल्यावर हल्ला केलेल्या देशाच्या विरोधात पहिल्यांदाच अशी सैनिकी कार्यवाही केली.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..