नवीन लेखन...

हुंडा बळी – सद्यस्थिती आणि तरुणांची भूमिका

आदर्शवत भारतीय संस्कृतीला लागलेला एक काळपट डाग म्हणजे “हुंडा पद्धती” असे म्हणता येईल. परंपरेने चालत आलेला हा प्रकार आज २१व्या शतकात देखील तेवढ्याच भयानतेने भारतीय संस्कृतीवर आघात करतो आहे.कारण आज सद्यस्तिथीचे सामाजिक चित्रण पाहता आजदेखिल बऱ्याच ठिकाणी प्रत्येक्ष अप्रत्येक्ष पणे हुंडा पद्धतीचा अवलंब केला जात आहे. असे दिसून येते.भारतात हुंडा पद्धतीवर किंवा प्रथेवर आळा बसावा यासाठी शासनाने हुंडा विरोधात 1961 ला हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात आला. 1961 हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार कलम 3,कलम 4,अन्वये विविध शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.मात्र या कायद्याकडे दुर्लक्ष होऊन आज 21 व्या शतकात हुंडा पद्धत अबाधित आहे. हे खूप भयानक वास्तविक नाकारता येणार नाही. आणि याचे उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्यातील वघोली गावात सलग वर्षभरात हुंडा जाचाला कंटाळून मोहिनी आणि शीतल या नावाच्या दोन भगिनींनी आत्महत्या केली.यावरून ही भयाण वास्तविकता लक्षात येते.

आज भारतात हुंडाबळी प्रत्येक्ष अप्रत्यक्ष पने बळावत आहे.आज हुंडा पद्धतीचा परिनाम आज विशेष स्त्री जीवनावर एवढा झाला की ,आजच्या मुली आपल्या लग्नाला आपल्या वडिलांना वरपक्षाला हुंडा द्यावा लागणार आणि तो आपल्या वडिलांना शक्य नाही तसेच वडील कर्ज बाजारी होतील या भीतीने लग्ना अगोदरच आत्महत्या करताना दिसतात. हे भयाण वास्तव समाजजीवनावर दूषित परिणाम करते.हुंदबळीतूनच समाजात स्त्रीआत्महत्या,स्त्रीभ्रूण हत्या,आणि मुलीचा खून अशा घटनांमध्ये वाढ होऊन समाजात असमतोल अस्थिरता आणि अराजकता माजत आहे.

आज एकीकडे भारतात संविधानामार्फत स्त्री पुरुष समानतेची रुजवण करण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र हुंडापद्धती विस्तारत जीवन्त राहत आहे.आणि याचे मुख्य कारण आपली भारतीय पुरुष प्रधान संस्कृती.आज भारतात याच पुरुष प्रधान संस्कृतीमुळे लोकांची मानसिकता ही स्त्री विषयक अबला स्वरूपाची आहे.हुंडा पद्धतीमुळेच मुलीचा जन्माला नाकारण्यात येऊ लागले. खुळचट विचार बुद्धीच्या लोकांच्या मते जर मुलगी जन्मली तर ती वंशाचा दिवा होऊ शकत नाही.म्हणून तिला नाकारलं जात.तसेच काहींच्या मते हुंडा देने ही प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते.ही बाब सगळ्यात महत्त्वाची आहे.

तसेच याच दुसरं कारण म्हणजे भारतीय समाज रूढी पंरपरा,प्रथा यांचा बंधनात फार अडकलेला आहे आणि त्यामुळेच यासारख्या प्रथा वर्षनुवर्षं प्रतिबंध कायदे करून देखील जीवन्त आहेत. हुंडा प्रथेचा नेमका उगम केव्हा कसा झाला हे सांगता येत नाही कारण हुंडा प्रथा केव्हा सुरू झाली असा ठाम उल्लेख माझ्या वाचनात आढळला नाही.परंतु ब्रिटिश काळात भारताने ब्रिटिशांना हुंडा स्वरूपात काही भौतिक ठेवी दिल्या.कदाचीत त्यावेळेपासून ही प्रथा वेगळ्या स्वरूपाने प्रचलित असावी.आणि मग त्या प्रथेला अबला मानलेल्या स्त्री ला वेठीस बांधलं असावा.

आज हे हुंडाबळीचे भयाण वास्तव बदलण्यासाठी तरुणांचा सहभाग आणि परिवर्तनवादी समतावादी मानसिकता फार फार महत्वाची आहे.यामुळेच येणाऱ्या काळात हुंडाबळी सारख्या विविध विदारक प्रथांना आपण मूठमाती देऊ शकतो.आजचा स्तिथीला तरुणांच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात आशा जाचक रुढि परंपरा सनपविता येऊ शकतात.आज तरुणांनी समतावादी मानवतावादी सनविधांचा अभ्यास करावा.ते उपलब्ध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहचवावे.यात इंटरनेट चा फार मोठया प्रमाणात उपयोग होऊ शकतो.याचे कारण आज प्रत्येक तरुण मोबाईलचा माध्यमातून इंटरनेट शी जोडला गेला आहे आणि दिवसेंदिवस नावनवीण अपडेट तो मिळवत आहे.याचाच उपयोग करून सामाजिक भानेतून काही परिवर्तन घडविणारे उपक्रम राबविन्यात तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. आज तरुणांनी स्वतःच्या भावनेत मानसिकतेत बदल करून हुंडा प्रत्येक्ष अप्रत्येक्ष हुंडा पद्धतीला नाकारल तर नक्की येणाऱ्या काळात हुंडा प्रथा पुर्णतः संपुष्टात येऊ शकते यात शंका नाही.

आजच्या शिक्षित मुली मुलांनी हुंडा विषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात करावी.आज काही तरुण यात सक्रिय आहेत मात्र या लढ्यात तरुणांची संख्या आणि त्यांची सक्रियता आणखी व्यापक होत जावी आणि ती तरुणांनी करावी.आणि भारतीय संस्कृतीला लागलेला काळा डाग आजच्या या नवपिढीने पुसावा आणि येत्या काळात हुंडाबळी सारख्या जाचक प्रथेला समूळ नष्ट करावे.हुंडामुक्त चा नारा देऊन हुंडा विरोधी जबाबदारी सामाजिक जाणिवेतू प्रत्येक तरुणाने यशस्वीपणे पूर्ण करावी.तरच उद्याचा भारत हा “हुंडामुक्त” भारत होऊ शकतो.

— आयु.अमोल अनिता अशोक तांबे
मु /पो-वागदे ,ता.कणकवली,
जि. सिंधुदुर्ग,पिन -४१६६०२
मो.नं -९१३६८२२७१७.
इ मेल – tambeamol508@gmail.com

लेखकाचे नाव :
अमोल अशोक तांबे
लेखकाचा ई-मेल :
tambeamol508@gmail.com

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..