नवीन लेखन...

कचरा आणि त्याचे दुष्परिणाम

आवश्यक नसलेल्या निरुपयोगी वस्तू म्हणजे कचरा. आपल्या दैनंदिन वापरात आपल्याला नको असलेल्या टाचणीपासून मोठमोठया यंत्रसामग्रीपर्यंत आणि उष्टया अन्नापासून ते नासलेल्या फळफळावळीपर्यंत आणि भाजीपाल्यापर्यंतच्या वस्तू असतात. जुने कपडे, धातुच्या वस्तू, काचेच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून ते निरनिराळ्या वस्तुंपर्यंत, फर्निचरपासून विद्युत वाहक तारा, संगणक, दूरदर्शन संच, पाडलेल्या बांधकामाचा कचरा (डेब्रीज), कारखान्यातला कचरा इत्यादी सर्व बाबींचा कचऱ्यात समावेश होतो. याशिवाय वैद्यकीय कचरा, इ-कचरा यांच्यासाठी सध्या वेगवेगळ्या स्वरूपाची नियमावली आहे.

कचरा गोळा करण्यासाठी आणि वाहून नेण्यासाठी वेगळी पद्धत घालून देण्यात आली आहे. या सगळ्या कचऱ्याचा समावेश घनकचऱ्यात होतो. कारखान्यातील प्रक्रियेनंतर वाहणारे पाणी, मलनिस्सारण, रासायनिक आणि औषधी कारखान्यातील पाणी, घरगुती वापराचे व शौचकुपातील पाणी याला द्रवरूप कचरा असे म्हणता येईल. तर लाकडाच्या चुली वापरून निर्माण होणारा धूर, कारखान्याच्या धुराडयातून बाहेर पडणारा धूर, विटाच्या भट्टयातून बाहेर पडणारा धूर हा वायुरूप कचरा होय.

या तिन्ही प्रकारच्या कचऱ्यामुळे प्रदुषणाशिवाय आपण निसर्गचक्रातही व्यत्यय आणत आहोत. याचा परिणाम मानवी जीवनावर होत असून हे चक्र असेच चालू राहिले तर पुढच्या पिढीला शुद्ध हवा-पाणी मिळणार नाही.

घनकचऱ्याची भरावभूमी (डंपिंग ग्राउंड) पूर्वी गावाच्या सीमेबाहेर आणि जलस्रोतापासूनही दूर असे. विटांच्या भट्टयाही गावाबाहेर असत. यामुळे प्रदुषणाचा त्रास गावाला होत नसे. लोकांचे आरोग्य नीट राही आणि नगरे स्वच्छ आणि सुंदर दिसत. लोकसंख्या वाढीमुळे गावे, नगरे आणि महानगरे जसजशी विस्तारत गेली तसतसे हे संतुलन राखणे कठीण जाऊ लागले.

कचऱ्याला कचऱ्यासारखे वागवणे ही झाली जुनी रीत. त्यामुळे उपद्रव अधिक होतो. याचे उदाहरण म्हणजे सुरत शहर. काही वर्षापूर्वी सुरतमध्ये झालेल्या प्लेगमुळे घरटी एक माणसाची आहुती पडली.. त्यामुळे जास्त कचरा निर्माणच कसा होणार नाही हे पाहायला हवे, जास्तीत जास्त कचऱ्याचा पुनर्वापर केला तर हा प्रश्न सुटणार आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..