नवीन लेखन...

कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक्सचे दुष्परिणाम

Ill Effects of Caffeinated Energy Drinks

प्रथम आपण एनर्जी ड्रिंक्स म्हणजे काय हे जाणून घेऊया.

एनर्जी ड्रिंकची व्याख्या करता येत नाही पण कोणतेही नॉन अल्कोहोलीक ड्रिंक, ज्या मधे कॅफिन, टॉरिन (एक अमिनो असिड) आणि व्हिटॅमिन व बाकी इतर घटक असतात अशा ड्रिंकला एनर्जी ड्रिंक म्हणतात, शारीरिक व मानसिक परफॉर्मन्स सुधारण्यासाठी ही ड्रिंक्स मदत करतात अशा प्रकारे ह्यांचे मार्केटिंग केले जाते. उत्तेजनवर्धक म्हणून कॅफिन चा वापर बहुतेक ड्रिंक मध्ये केला जातो पण काही ड्रिंक्स मध्ये guarana आणि जिनसिंग चा वापर केला जातो.

कॅफिन हे बर्‍याच खाद्य पदार्थात आढळते तसेच ते सॉफ्ट ड्रिंक व एनर्जी ड्रिंक मध्ये ही आढळते. Substance Abuse and Mental Health Services Administration (SAMHSA) ह्यांच्या मते एनर्जी ड्रिंक च्या एका बाटलीत किंवा एका कॅनमध्ये ८० मिलीग्राम पासून ते ५०० मिलीग्राम पेक्षा जास्त कॅफिन असू शकते.

caffeine-contents-in-various-drinksएक कॅन कोला ड्रिंक मध्ये साधारणतः १० चहाचे चमचे साखर असते. वर्ल्ड हेल्थ ऑरगनाइजेशनच्या शिफारशी प्रमाणे दृश्य स्वरूपात दिवसाला फक्त ६ चहाचे चमचे साखर घेणेच योग्य आहे म्हणजेच फक्त एक कॅन कोला घेतल्यास शिफारशी पेक्षा कितीतरी जास्त साखर आपल्या पोटात जाते.

साखर युक्त ड्रिंक घेतल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हे जवळजवळ सगळ्यांच माहीत आहे. Harvard School of Public Health ह्यांच्यानुसार साखरयुक्त ड्रिंक चे १ ते २ कॅन चे सेवन दररोज केल्यास २६% लोकांमध्ये डायबेटिस होण्याची शक्यता बळावते आणि प्रतिवर्षी १८४,००० मृत्यू हे साखरयुक्त ड्रिंक घेतल्याने होतात असेही निदर्शनास आले आहे.

हेल्थ विषयीचे लिखाण करणार्‍या Wade Meredith ह्यांच्या संशोधनावर आधारित ब्रिटिश फारमसीस्ट निरज नाईक ह्यांनी एक infographic तयार केले आहे. यामध्ये त्यांनी ३३० मिलीलीटरचा एक कोकाकोलाचा कॅन घेतल्यावर १ तासात शरीरावर काय काय परिणाम होतो हे दाखवले आहे.

पहिल्या १० मिनीटातच : १० चमचे साखर शरीर प्रणाली (system) मध्ये जाते. याचाच अर्थ १००% शिफारशी पेक्षा जास्त साखर घेतली जाते, तरीही इतकी जास्त साखर जाऊनही लगेचच आपल्याला उलटी होत नाही कारण त्यात असलेल्या फॉस्फरिक अॅसिड मुळे. फॉस्फरस मुळे त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर कमी होतो त्यामुळेच एकदा ओठाला लावल्यावर बरेचदा आपण तो संपेपर्यंत खाली ठेवत नाही.

symptoms_of_Caffeine_overdose२० मिनीटे : रक्तातील साखरेमध्ये स्पाईक येतो (अचानक साखरेची पातळी वाढते) त्यामुळे इनसुलीनचा उद्रेक होतो. ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लिव्हर रक्तातील वाढलेल्या साखरेचे फॅट मध्ये रुपांतरीत करते.

४० मिनीटे : आत्तापर्यंत ड्रिंक मधील पूर्ण कॅफिन शरिरात शोषले जाते आणि त्यामुळे डोळ्यातील बाहूली (pupils) विस्फारित (डायलेट) होते, ब्लडप्रेशर वाढते. ह्यामुळे लिव्हर रक्तात जास्त साखर टाकते. ह्या वेळेस ब्रेन मधील adinosine receptors ब्लॉक झालेले असल्याने आपल्याला थकवा / ड्राऊझिनेस जाणवत नाही

६० मिनिटे: ड्रिंक मध्ये असलेले फॉस्फरिक अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि झिंक जे इनटेनस्टाईनच्या खालील भागात असते त्या बरोबर मिसळले जाते, मेटॅबोलिझम मध्ये आणखी वाढ होते. वाढलेली साखर व वाढलेले मेटॅबोलिझम ह्यामुळे शरीरातील कॅल्शियम लघवी वाटे बाहेर टाकले जाते.

६० मिनिटांनंतर : रक्तातील साखरेची पातळी कमी व्हायला सुरवात होते ज्यामुळे तुमची चिडचिड वाढते, तुम्हाला चैतन्यहिन वाटू लागते. ह्या वेळेस डायुरेटीक इफेक्ट आमलात येऊ लागतो. Bladder भरले असल्याने तुम्हाला लघवी करावी लागते. ह्याच लघवी वाटे फॉस्फरस बरोबर बांधले गेलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि झिंक – जे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते – बाहेर टाकले जाते, . याचबरोबर सोडियम, इलेकट्रोलाईट सुद्धा शरिराच्या बाहेर टाकले जातात. युरिनेशनमुळे ड्रिंक मध्ये असलेले पूर्ण पाणीही शरिराच्या बाहेर टाकले जाते.

सध्या अल्कोहोल बरोबर पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक, मुख्यत्वे करून कोक घेण्याची प्रथा प्रचलित होऊ लागली आहे. तरूण पिढी तर हे जास्तच करताना दिसतात. हे आणखीनच धोकादायक आहे.

सार्वजनिक आरोग्यावर याचा किती वाईट परिणाम होणार आहे हे तो एक विधाताच जाणो.

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..