नवीन लेखन...

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल

लहानथोरांच्या सर्व प्रकारच्या आजारांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बाहेरून येणा-या पदार्थांचा या संस्थेशी खूप संबंध येतो. दूषित अन्न, अयोग्य अन्न, दूषित पाणी या सर्वांशी संबंध आल्याने या संस्थेच्या आजारांचे प्रमाण जास्त आहे. अन्नपाण्याची योग्य खबरदारी घेतल्याने पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण खूप कमी होते. आपण जे खातो, ते अंगी लागले पाहिजे असे वाटत असेल, तर त्यासाठी योग्य आहार योग्य पद्धतीने पचला पाहिजे, असे घरातील आजी, मोठी माणसे सांगत असतात. कारण, आपण जे खातो ते नीट पचले, तरच शरीराचे पोषण होते. पोटाची काळजी घ्यायची असेल, तर भुकेपेक्षा दोन घास कमी अन्‍न खावे, असेही म्हटले जाते. आपण जे अन्‍न सेवन करतो, ते पचवण्याचे मुख्य काम पचनसंस्था करते. पचनसंस्था व्यवस्थित असेल, तर आहार पचून शरीरापर्यंत पोषणमूल्य पोहोचू शकते. थोडक्यात, पचनसंस्थेचे आरोग्य नीट, तर शरीराचे पोषण योग्य! त्यासाठी पचनसंस्था नीट राहण्यासाठी दैनंदिनीमध्ये काही गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत.

Image result for digestive system

पचनसंस्थेची काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे त्यासाठी रोजच्या आयुष्यात काय गोष्टी त्यासाठी करता येतील, याचा विचार करू या. त्यात काही गोष्टी पूर्वीपासून आपण घरातल्या ज्येष्ठांकडून आपण ऐकल्या असतील किंवा त्या गोष्टी ते नियमाने पाळतही असतील. पचनसंस्थेचे निरनिराळया प्रकारचे संसर्गदोष (जंतू, जंत, इ.) मोठया प्रमाणावर आढळतात. निरनिराळया प्रकारच्या हगवणी, कावीळ, विषमज्वर, पटकी, जंतविकार, इत्यादी महत्त्वाचे आजार यात येतात. नारू, पोलिओ या आजारांची सुरुवात पचनसंस्थेपासूनच होते. आम्लता, जठरव्रण, इत्यादी आजार देखील जंतूंमुळे होतात असे मानले जाते. आयुर्वेद परंपरेत तर पचनसंस्थेतच अनेकविध आजारांचे मूळ आहे, असे मानतात. काही प्रमाणात त्यात तथ्यही आहे. या काही आजारांशी पचनसंस्थेचा काय संबंध आहे याबद्दल आयुर्वेदाचे मतही मांडले आहे. या प्रकरणांमध्ये आपण या आजारांबद्दल साधे रोगनिदान व उपचार शिकणार आहोत. तसेच पचनसंस्थेच्या आजारांचे निराकरण सार्वजनिक आरोग्याच्या उपायांनी कसे करायचे, हे देखील या प्रकरणात आपण शिकणार आहोत.

  • रोज सकाळी उठल्यानंतर न चुकता उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे. त्यामुळे आतड्यांमधील घातक घटकांची स्वच्छता होते. नवीन रक्‍त निर्माण होते. वजन कमी करण्यासाठी, त्वचा चमकदार होण्यासाठी कोमट पाणी खूपच उपयुक्‍त असते.
  • दिवसातून एकदा नियमित पोट साफ होणे हा निसर्गनियम आहे. अन्नाचा पोटातला मुक्काम एवढाच असतो. एवढया वेळात अन्न पचून त्याचा चोथा टाकायला तयार होतो. पोटात हा मळ जास्त काळ राहिला तर त्याला दुर्गंध येतो. रोज पोट पूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. पोट साफ होण्यासाठी त्यात पालेभाज्या, कोंडा यांचे प्रमाण चांगले पाहिजे.
  • आम्लपित्त किंवा डिहायड्रेशनसाठी त्वरीत डॉक्टरांकडे धावण्यापेक्षा आधी साधे, घरगुती इलाज करणं केव्हाही फायदेशीर ठरतं. दुपारच्या वेळी उन्हात भटकणं टाळावं. प्रकृतीने थंड पदार्थ खावेत. घरगुती इलाजांनी फरक पडला नाही, तर मात्र डॉक्टरी सल्ला घ्यावा.
  • पॅकेज्ड फूड, शिळं, बाहेरचं अन्न किंवा उघड्यावर मटण, चिकन, मासे आदीसोबतच काही शाकाहारी पदार्थही खाण्याचा मोह आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये आवरता येत नाही. परंतु, उघड्यावरचं खाल्ल्यानं कोणत्याही ऋतूत शरीराला तोटाच होतो. चिरलेलं अन्न बराच काळ उघडे ठेवल्याने त्यातलं सत्व निघून जातं व त्यावर जंतूंचा मारा होतो. परिणामी, अशा अन्नातून विषबाधा होण्याची भीती जास्त असते. ही विषबाधा प्राणघातकही ठरू शकते, त्यामुळे योग्य वेळीच काळजी घेणं रुग्णांच्या हाती असते.
  • अनेकांना जेवण केल्यानंतर लगेचच चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते; मात्र पचनाच्या दृष्टीने ही सवय नक्‍कीच घातक ठरते. कारण, चहा किंवा कॉफी सेवन केल्याने आहारातील लोहाचे पचन होण्यात बाधा निर्माण होते. तसेच जेवल्या जेवल्या लगेच झोप दाटून येते, तरीही लगेचच झोपू नये. कारण, जेवण पचवण्यासाठी पोटात जे आम्ल तयार झालेले असते, ते पुन्हा उलट अन्‍ननलिकेत येते. त्यामुळेच छातीत जळजळ होते. तसेच जेवताना प्रत्येक घास चावून खावा जेणेकरून तोंडात निर्माण झालेली लाळ जेवणात मिसळते आणि ते पचण्यास मदत होते. आरोग्यासाठी फळे सेवन करणे महत्त्वाचे असते; पण फळांचे रस सेवन करण्यापेक्षाही फळे कापून खाल्ल्यास पचनसंस्थेसाठी अधिक उपयुक्‍त ठरते. कारण, फळांमधील तंतुमय घटक पचनासाठी मदत करतात. त्यामुळे रस पिण्यापेक्षाही फळे कापून खाणे अधिक चांगले. जेवणामध्ये पाणी पिण्याऐवजी जेवणापूर्वी आणि जेवणानंतर अर्धा तास अंतर ठेवून पाणी प्यावे.

शरीराचे पोषण करण्यासाठी पचनसंस्था निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे. वरील गोष्टींच्या मदतीने पचनसंस्था निरोगी राहण्यास जरूर मदतच होते. दैनंदिन आयुष्यात या गोष्टी अंगीकारल्या तर त्याचा फायदा निश्‍चित होऊ शकतो.

Sanket

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..