नवीन लेखन...

इतिहास संशोधक सेतु माधवराव पगडी

इतिहास संशोधक, विचारवंत, लेखक सेतु माधवराव पगडी यांचा जन्म २७ ऑगस्ट १९१० रोजी झाला.

सेतुमाधवराव पगडी हे इतिहाससंशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि ’गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांनी यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. शिवाजी महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले आहे. इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, त्यांनी विपुल प्रमाणात स्फुट व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणले.

मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे गंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लनेर्ड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली. “मराठवाडा साहित्य परिषद“, “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“ आदी संस्थांचे अध्यक्षपद सेतुमाधवराव पगडींनी भूषविले आहे.

सेतु माधवराव पगडी हे १९६० ते १९६९ पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थान मध्ये सनदी अधिकारी होते. गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

सेतु माधवराव पगडी यांचे १४ ऑक्टोबर १९९४ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..