नवीन लेखन...

मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक स्टॅन ली

कॉमिक्स जगताचे महानायक, मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक आणि स्पायडर मॅन व हल्क यांसारख्या अनेक सुपरहिरोंचे जन्मदाते स्टॅन ली यांचा जन्म.२८ डिसेंबर १९२२ रोजी न्यूयॉर्क येथे झाला.

विसाव्या शतकात कॉमिक या संकल्पनेला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवण्यास कोणी जबाबबदार असेल तर ते म्हणजे एक नाव. ते नाव आहे, ज्येष्ठ कॉमिक लेखक स्टॅन ली यांचं. कॉमिक्स लेखक, संपादक, चित्रपट निर्माता, अभिनेता आणि प्रकाशक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले स्टॅन ली हे मार्वल कॉमिक्सचे बलस्थान होते. ली संपादक झाल्यानंतर मार्वलने कॉमिक्सच्या दुनियेत भरारी घेतली. १९६१ मध्ये ‘द फॅन्टास्टिक फोर’ हे सुपर हिरो असलेले कुटुंब ली यांनी वाचकांच्या हाती दिले. त्याला अफाट प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ली यांनी अनेक सुपरहिरोंना आपल्या लेखणीतून जन्म दिला.

वास्तवात सुपरहिरोचा वावर कसा असेल, हे ध्यानात ठेऊन ली यांनी पात्रं उभी केली. त्यातूनच स्पायडर मॅन, हल्क, एक्स मॅन, आयरन मॅन, ब्लॅक पँथर, कॅप्टन अमेरिका, अँट मॅन हे सुपरहिरो अवघ्या जगाला मिळाले. पनिशर, डेअरडेव्हिल हे अँटी सुपरहिरोही ली यांनी उभे केले. बदलत्या काळानुरूप ली यांचे सुपरहिरो चंदेरी दुनियेत दाखल झाले आणि या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. मार्वलनेच या सगळ्या सुपरहिरोंना मोठ्या पडद्यावर आणले. युद्धाच्या वातावरणात देशप्रेम जागवणारा ‘कॅप्टन अमेरिका’, कोल्ड वॉरच्या काळातला ‘आयर्नमॅन’, शक्तीचं मूर्तिमंत रूप ‘हल्क’, परक्या शक्तींविरोधात एकजूट झालेले सुपरहिरो ‘द फँटॅस्टिक फोर’ ही तत्कालीन अमेरिकेची मानसिकता दर्शवणारी व्यक्तिचित्रं आहेत. या सगळ्याच चित्रपटांत ली यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

स्टेन ली यांचे वैशिष्ट म्हणजे त्यांनी २०१३ मध्ये आपला ‘चक्र’ नामक पहिला भारतीय सुपरहिरोवरील चित्रपट बनवला. कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया आणि पाओ इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने तयार झालेला ‘चक्र : द इन्व्हिझिबल’ हा चित्रपट कार्टून नेटवर्कवर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात एक भारतीय तरुण राजू रायची गोष्ट आहे. जो मुंबईमध्ये राहतो. राजू आणि त्याचे मार्गदर्शक डॉ. सिंह एक असा तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक पोषाख तयार करतात ज्यामुळे शरीरातील रहस्यमयी चक्रे सक्रिय होत असतात. कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया तथा पाओ इंटरनॅशनलने संयुक्तपणे तो साकारला होता.

डोळ्यांचं तेज मंदावलं, तरी वयाच्या ९५व्या वर्षीही त्यांचा मेंदू तल्लख होता. शेवटच्या दिवसांत ते ‘डर्टमॅन’ नावाच्या नव्या सुपरहिरोवर काम करत होते.

स्टॅन ली यांचे निधन १३ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..