नवीन लेखन...

माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार

माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९४० रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर गावी झाला.

प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून अरविंद इनामदार यांची ख्याती होती. त्यांनी नेहमीच पोलीस दलातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत हल्ला चढवला होता. यामुळे ते नेहमीच चर्चेत असत.

अरविंद इनामदार १ ऑक्टोबर १९९७ ते ५ जानेवारी २००० या दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पोलिस खात्यातील सर्वोच्च पदावर काम करताना वेळप्रसंगी सरकारच्या निर्णयाला विरोध करत, एक वर्ष आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

अरविंद इनामदार यांनी नाशिकमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दीर्घकाळ काम केलं. त्यांच्या नेतृत्त्वात पोलिस दलात अनेक विद्यार्थी घडले. अरविंद इनामदार यांनी गाजलेल्या जळगाव सेक्स स्कँडल हे प्रकरण यशस्वीपणे हाताळले होते. अरविंद इनामदार यांना खोटे, आणि चुकीचे घडलेले कधीही खपत नसे. म्हणूनच त्यांनी आपली कारकिर्द पणाला लावून कायम पोलीस दलातील वाईट गोष्टींवर सतत बोट ठेवले. या सद्गुणांचा मोठा फटका आपल्याला बसल्याचेही ते वारंवार मुलाखतींमधून सांगत असत.

इनामदार हे पोलीस दलात कार्यरत असले तरी ते मनाने अतिशय संवेदनशील होते. त्यांच्यातील माणूस कायम जागा होता. म्हणून त्यांनी जपलेली मूल्ये आणि माणुसकीशी कधीही तडजोड केली नाही. लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते.

आपल्या भगवद्गीतेचा मोठा प्रभाव असल्याचे ते नेहमी सांगत. इनामदार साहित्य वर्तुळातही तितकेच लोकप्रिय होते. खुसखुशीत भाषा शैली, आणि विनोदबुद्दीमुळे ते ऐकणाऱ्यांच्या मनाची सहज पकड घेत असत.

अरविंद इनामदार यांचे निधन ८ नोव्हेंबर २०१९ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..