नवीन लेखन...

भेसळ

Food Adulteration

काल बायकोने ठाण्याहून खरवस मागवला होता… रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला.

“कसा मस्त आहे की नाही ?”

हो ….छान आहे.दुधात जिलेटिन घालून केलेला “चिक” व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चमच्यात ओळ्खला होता . पण बायको समोर हो ….छान आहे असे म्हणावे लागले.

आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस , नासकोणी , खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.

हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक “हाटेलात” पुरवतात.

आता विचार करा , २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा ,त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत, त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य वाट्ते…..एवढ्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.

थोडा विचार +विचारपुस करता ” जिलेटिन ” + दुध = खरवस हा फॉर्मुला समजला.

बाटली बंद ” लोणची ” आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून मला असाच संशय आला. गोडेतेलाची किंमत , लोणच्यामधील तेलाचे प्रमाण व लोणच्याची किंमत ह्याचा मेळ लागेना……

दोन चार ठिकाणी चाचपणी केली . मग उलगडा झाला. ” लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल ( शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी )आसते.

बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते “सायट्रिक acid ” ची . ब्लोटिंग पेपर + सायट्रिक acid= फक्कड लस्सी.

हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की “छास ” तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.

हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर ” पाणी-पुरी ” मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो …..भैय्याजी थोडा पानी और…..कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्षा खूप स्वस्त आहेत.

ऊसाचा रस ऊन्हाळ्यात चांगला . पण काही “कलाकार” ह्यामध्ये “सॅकरिन ” वापरतात्….. थोड्या रसात भरपूर पाणी +सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा.पण ह्याचा वापर एवढा सर्रास नाही.

टोमॅटो सॉस केवळ “भोपळ्या पासून ” बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो .

नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही…

ही थोडी झलक.

शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी .

तो पर्यन्त ” वडापावाच्या” लसूण चट्णीत ” नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.

– संकलीत लेख – WhatsApp वरुन.. 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..