नवीन लेखन...

फेब्रुवारी १६ : कुजबुजणार्‍या मृत्युचा जन्म ! (मायकेल होल्डिंग)

…खुप दुर त्याची सुरुवात होई… फलंदाजाला पाठमोरा असणारा तो झपकन वळे आणी क्रिकेटच्या इतिहासाने पाहिलेल्या मोजक्या सुलतानी थाटाच्या एका रन-अपला प्रारम्भ होई… दणादण पाय आपटत यष्ट्यांकडे धावणार्‍यांपैकी एक तो कधिच नव्हता… अंतरंगातिल खळबळिचे कोणतेही चिन्ह बाहेर न दाखवता अलवारपणे तो धावत धावत येई…एखादा संतप्त सर्प तालासुरात फणा डोलवित

असावा तसे त्या धिप्पाड धुडाचे मस्तक तालात हले…चांगले फलंदाज शक्यतोवर त्याच्याकडे पाहणेच टाळत…त्याच्या आसपास उभ्या असणार्‍या जवळपास सर्वांनाच त्याचे कारनामे मात्र ठाउक होते…हळुवार येउन टाकलेले त्याचे चेंडू फलंदाजाचा नेमका गेम करित…त्याचे टोपणनावच आहे मुळी विस्परिंग डेथ – कुजबुजणारा मृत्यू !
मायकेल अ‍ॅंथनी होल्डिंग. जन्म १६ फेब्रुवारी १९५४ किंग्स्टन, जमैका. साठ कसोट्यांमधुन आलेल्या त्याच्या २४९ बळिंमध्ये चारच देशांचे फलंदाज होते. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणी न्युझिलंड हे ते देश. त्याच्या अंगातली कला मात्र स्थलबद्ध नव्हती. जगाच्या पोटावर कुठेही तो वेगवान चेंडू टाकू शकत असे. त्याच्या कसोटी कारकिर्दितिल एकुन तेरा पाचाळ्यांपैकी (डावात पाच बळी) ११ त्याच्या जन्मभुमिबाहेर घडल्या. सन १९७६ मध्ये फुलासारख्या मऊ असलेल्या ओवलच्या खेळपट्टिवर त्याने पहिल्या डावात ८ आणी दुसर्‍या डावात ६ बळी मिळवुन त्याने इंग्लंडचा चेंदामेंदा केला.
१९८०-८१ च्या हंगामात त्याने एक अविस्मरणिय षटक जेफ बॉयकॉटला टाकले. पहिल्या पाच हळुवार चेंडुंवर बॉयकॉटला त्याने झुलविले आणी अखेरच्या चेंडुवर जेफची ऑफस्टिक काही क्षणांपुरती गुरुत्वाकर्षणाच्या बंधनातुन मुक्त झाली. ह्या अद्भुत षटकाची क्षणचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
क्रिस ओल्ड या सामन्यात खेळाडू म्हणुन खेळत होता. विज्डेन क्रिकेट मंथली मध्ये म्हटल्यानुसार बॉयकॉटच्या या संघभावाच्या चेहर्‍यावर “नुकताच एखादा राक्षस पाहिल्यासारख्या” भावना होत्या. ७३ धावा हा मायकेलचा कसोट्यांमधिल सर्वोत्तम डाव. त्याच्या एकुण सहा कसोटी पन्नाशांपैकी चार इंग्लंडविरुद्ध आल्या.

मायकेल होल्डिंगची कारकिर्द६० कसोट्यांमधुन २४९ बळी. ९२ धावांमध्ये ८ बळी ही डावातिल सर्वोत्तम कामगिरी तर १४९ धावांमध्ये १४ ही सामन्यातिल.

१४-१४९ ही आजवरची कोणत्याही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाची सामन्यातिल सर्वोत्तम कामगिरी आहे.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..