नवीन लेखन...

फेब्रुवारी १३ : एडी पेन्टर … हॉस्पिटलमधून थेट मैदानात

हंगाम १९३२-३३. मैदान : ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊन्ड.
इंग्लन्ड-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या पाच कसोट्यान्च्या मालिकेतिल चौथा साम्न्याचा तिस्रा दिवस. सिड्नी आणि अ‍ॅडलेडमधिल कसोट्या इंग्लन्डने जिकलेल्या होत्या तर मेलबर्नमधिल कसोटी (मालिकेतिल दुसरी) ऑस्ट्रेलियाने जिंक्ली होती. सिड्नितिल कसोटीद्वारे पतौडिच्या नवाबांनी कसोटिपदार्पण केले होते आणी शतक नोंदवुन त्यान्नी ते गाजव्लेही होते.

तिस्र्या कसोटिसाठी इंग्लन्ड संघ जाहिर झाला त्यात नवाबान्चा समावेश नव्हता. कर्णधार डग्लस जार्डिन्च्या शरिरवेधी क्षेत्ररच्नेस त्यान्चा विरोध होता आणी त्यामुळे त्यान्ना संघातिल स्थान गमवावे लाग्ले. त्यान्च्या जागी संघात एडी पेन्टर्चा समावेश कर्ण्यात आला. खरेतर कांगारुन्च्या दौर्‍यावर जाणार्‍या संघात त्याचा समावेश होईल असे कुणाला वाटले नव्हते पण क्षेत्ररक्षणातील कौशल्यामुळे आणी फलन्दाजितिल गतिमुळे त्याला हा दौरा मिळाला होता.

पेन्टर्ने पहिल्या डावात ७७ धावा काढ्ल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावादर्म्यान सिमारेषेजवळ क्षेत्ररक्षण कर्ताना पेन्टर्चा घोटा दुखाव्ला होता. डॉक्टरान्चा सल्ला न जुमान्ता पेन्टर्ने दुस्र्या डावात दहाव्या क्रमांकावर फलन्दाजी केली होती आणि पन्धरा मिनिटांमध्ये एक धाव काढुन तो नाबाद राहिला होता. मालिकेतिल तिस्रा साम्ना १९ जानेवारिला सम्पला. इंग्लन्डने तो ३८८ धावान्नी जिंक्ला आणी मालिकेत २-१ अशी आघाडी घेत्ली. १० फेब्रुवारिला चौथी कसोटी सुरू होईस्तो पेन्टर तन्दुरुस्त झाला होता. ऑस्ट्रेलियाने या साम्न्यात नाणेकौल जिंकुन फलन्दाजी स्विकार्ली आणी पहिल्या दिवस-अखेर ३ बाद २५१ पर्यन्त मजल मार्ली. या दिवशी पेन्टर्ने क्षेत्ररक्षण केले पण तो ठिक्ठाक नव्हता. त्याला ताप आला होता. सन्ध्याकाळी डॉक्टरान्नी त्याला टॉन्सिलईटिस झाल्याचे निदान केले आणी एका रुग्णालयात त्याची भर्ती केली. ११ फेब्रुवारिला कांगारुन्चा डाव ३५६ वर सम्पुष्टात आला आणि दिवस-अखेर इंग्लन्डने बिनबाद ९९ धावा केल्या. १२ फेब्रुवारी हा रविवार असल्याने विश्रान्तिचा दिवस होता. त्या दिवशी खेळ होनार नव्हता ही गोष्ट एडिच्या पथ्यावर पड्ली. या दिव्शी कर्णधार जार्डिन एडिला भेटुन

गेला. जार्डिन्च्या म्हण्ण्यानुसार : “एडी सुधार्लेला दिसत होता आणी गरज भास्लिच तर आपण परिणामान्चा आणी डॉक्टरान्च्या सल्ल्याचा विचार न कर्ता फलन्दाजिस येऊ असे तो म्हणाला.” (गबी अ‍ॅलनच्या चरित्रात मात्र त्याच्या चरित्रलेखकाने जार्डिन्मुळेच पेन्टर्ला फलन्दाजिस यावे लाग्ले असे म्हट्ले आहे. “कन्दाहारवर आक्रमण कर्णार्‍या इंग्लिश सैनिकान्नाही ताप आला होता” असे काहीसे जार्डिन बोल्ला होता !)

सोम्वारी संघाच्या ११४ धावांवर जार्डिन बाद झाला, १५७ वर सट्क्लिफ परत्ला, १६५ वर वॉली हॅमन्ड परत्ला…पेन्टर अजुन इस्पितळातच होता. १८८ वर इंग्लन्डचा चौथा गडी बाद झाला. बिल वोस हा एडिचा संघभाऊ दुखापतिमुळे या कसोटित खेळत नव्हता. इंग्लन्डची स्थिती नाजुक अस्ल्याची बात्मी त्याने एडिला दिली. (तो इस्पितळात एडिसोबत थाम्बलेला होता आणि रेडिओवरून धाव्ते समालोचन ऐकत होता.) एडी उठला आणि निघाला…टॅक्सिने दोघे मैदानावर आले. ते मैदानावर आले तेव्हा मॉरिस लेलन्ड नुक्ताच बाद झालेला होता. इंग्लन्ड पाच बाद १९८. गबी अ‍ॅलन सहावा बाद झाला आणि पेन्टर मैदानात उतर्ला.

पेन्टर्समोर दोन फलन्दाज बाद झाले. दिवस-अखेर तो २४ धावांवर नबाद राहिला. रात्री तो पुन्हा इस्पितळात गेला. हेड्ली व्हेरिटिने चौथ्या सकाळिही पेन्टर्ला चांग्ली साथ दिली. अखेर पेन्टरच बाद झाला – तब्बल ८३ धावा काढल्यानन्तर. नवव्या जोडिसाठी त्याने तब्बल ९२ धावा जोड्ल्या होत्या. पेन्टर बाद झाला त्याच धावसंख्येवर इंग्लन्डचा डाव सम्पला (३५६). व्हेरिटी : १५७ चेन्डुन्मध्ये नाबाद २३ धावा. सोळा धावान्ची आघाडी इंग्लन्डला मिळाली. हॅरल्ड लार्वुडने या डावाबाबत “पेन्टर आजारी होताच. त्याचा चेहरा फार सुक्लेला होता” असे म्हटलेले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दुस्र्या डावात पेन्टर्ने क्शेत्ररक्शण केले नस्ते तर पटण्यासार्खे होते पण त्याने क्शेत्ररक्शण केले ! अवघ्या पावणेदोन्शे धावांवर यजमानान्चा दुस्रा डाव सम्पला आणी पाहुण्यान्ना विजयासाठी १६० धावान्चे माफक आव्हान मिळाले. पाठलागात १३८ धावांमध्ये चार गडी इंग्लन्डने गमाव्ले. खेळाच्या सहाव्या दिव्शी (१६ फेब्रुवारी – तो अनिश्चित काळापर्यन्त कसोट्या खेळविल्या जाण्याचा जमाना होता.) पेन्टर पुन्हा एक्दा फलन्दाजिस उतर्ला. या डावात त्याने एकुण १४ धावा काढल्या. बारा चेंडुंमध्ये आणी धावाधाव न कर्ता – दोन चौकार आणी एक षट्कार ! त्याने मार्लेला षट्कार (गोलन्दाज स्टॅन मॅक्केब) हा विजयी फटका होता !!

या कसोटिद्वारे एकुण चौघान्नी पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलियाच्या तिन पदार्पणविरांपैकी दोन होते : लेन “डार्लिंग” आणि हॅमी “लव्ह” (ही त्यान्ची खरिखुरी नावेच आहेत, लाडनावे नाहित !)

ब्रिस्बेनमध्ये नेमका याच दिवशी (१६ फेब्रुवारी) काळाने एका रुग्णालयात आर्ची जॅक्सन्च्या आयुष्याचा बळी घेत्ला होता.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..