Web
Analytics
प्रसिद्ध लेखक, निर्माते आणि वितरक शरद पिळगावकर – Marathisrushti Articles

प्रसिद्ध लेखक, निर्माते आणि वितरक शरद पिळगावकर

शरद पिळगावकर यांचे गाव ‘पिळगाव’. मा.शरद पिळगावकर मुंबईत छोटामोठा ऑर्केस्ट्रा चालवायचे. यात ते स्वतःही गायचे आणि सचिनची आईदेखील. सचिन यांच्या जन्मानंतर पिळगावकरांचं संगीत क्षेत्रातील बस्तान चांगलंच बसत आलं होतं. चित्रपटसृष्टीमध्ये शरद पिळगावकरांची ब-यापैकी ओळख होवू लागली. कलागुणांना उत्तेजन देणारे आणि कलेचे व्यासंगी असलेल्या पिळगावकरांनी आपल्या मुलातील असलेली चुणुक ओळखली नसती तरच नवल. राजा परांजपे या आपल्या मित्राला त्यांनी सचिनबद्दल सहज म्हणुन सांगुन पाहिलं. ‘हा माझा मार्ग एकला’ ची तयारी तेव्हा सुरू होती. साडेचार वर्षाच्या सचिनला यात महत्त्वाची बालकलाकाराची भुमिका मिळाली, आणि या भुमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही. मा.शरद पिळगावकरांनी जेव्हा मराठीत चित्रपट करायचे ठरवले तेव्हा गाणी एन. दत्ताच करतील, असा निश्चय केला होता. त्याप्रमाणे पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांनी कथा ऐकवताच त्याला तात्काळ होकार दिला आणि अपराध हा माईल स्टोन चित्रपट निर्माण झाला,’अपराध मीच केला’ हे नाटक मा.शरद पिळगावकर यांनी मधुसुधन कालेलकरांना सुचविले होते, ज्याचा विषय होता ‘कमांडर नानावटी खटला’.

सव्वा शेर, चोरावर मोर जागृती, अपराध व अष्टविनायक हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यातील अष्टविनायक हा तर लोकांना आवडलेला सर्वात चित्रपट सांगली जिल्ह्यातल्या एका गणेश भक्त असलेल्या उद्योगपतीच्या जीवनात १९७५ साली घडलेल्या घटनेवर हा चित्रपट आधारित असल्याच चित्रपटाच्या सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे. मा.शरद पिळगावकर यांचे चिरंजीव सचिन पिळगावकर हे आज सुद्धा मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत.

शरद पिळगावकर यांचे १७ जून १९८३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेटसंजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 1758 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – करवंदे

'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...

कोकणचा मेवा – कोकम

आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

Loading…