नवीन लेखन...

एकटेपणा आरोग्यास हानिकारक

‘व्यक्ती एकटा असला म्हणजे हरवतो’, असे प्रसिध्द लेखक वपु काळे यांनी त्यांच्या ‘पार्टनर’ पुस्तकात म्हटले आहे. मनाला शांती मिळावी म्हणून आपण एकांतात राहणे पसंत करतो. परंतु आपल्याला काही दिवसातच त्या एकांताची सवय जडते. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे, हे आपल्याला ठाऊकच असेल. एका ताज्या निरिक्षणात असे आढळून आले आहे की, एकटेपणा आपल्या शरीर व मनाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवतो. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर इतक्या भयंकर प्रमाणात होतो की आपल्याला आयुष्यातून उठण्याची वेळ येते.

एकाकीपणा हा आपल्याला दु:खाशिवाय काहीच देऊ शकत नाही. एवढेच नाही तर त्याचा आपल्या मेंदूवर वाईट प्रभाव पडत असतो. एकाकीपणामुळे रक्तदाब वाढून मोठा तणाव निर्माण होत असतो. त्यामुळे आपला स्वभाव चिडचिडा होतो. काही अंशी तर वेडेपणा ओढवून घेण्यासही एकाकीपणाच कारणीभूत असतो.

एकटेपणा आपल्या इच्छाशक्तीवर आघात करत असते. परिणामी आपला आत्मविश्वास कमी डगमगतो. स्वाभाविक आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.

आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर एक धूम्रपान करणारी व्यक्ती व धूम्रपान न करणारी व्यक्ती यांच्या जो फरक असतो, तोच फरक एकाकी राहणे पसंत करणारा व्यक्त व गर्दीत वारणारा व्यक्ती यांच्यात आहे.

एकाकीपणा हा केवळ आपल्या मनावरच नाहीतर तर त्याच्या शरीरावरही आघात करत असतो. शरीरात रक्त संचारावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे आपण नेहमी चारचौघात राहिले पाहिजे. मनातील विचार मनात न ठेवता ते इतराजवळ बोलून दाखवले पाहिजे. त्यामुळे मन हलकं होतं आणि तणावही कमी होतो.

— संदीप रमेश पारोळेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..